AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cricket Retirement : उस्मान ख्वाजानंतर आणखी 3 खेळाडू लवकरच निवृत्त होणार! टीम इंडियाच्या एकाचा समावेश, कोण आहे तो?

Cricketer Retirement in 2026 : ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज उस्मान ख्वाजा याने नववर्षातील दुसऱ्याच दिवशी निवृत्त होणार असल्याचं जाहीर केलं. तसेच या वर्षात असे 3 खेळाडू आहेत जे निवृत्ती जाहीर करु शकतात.

Cricket Retirement : उस्मान ख्वाजानंतर आणखी 3 खेळाडू लवकरच निवृत्त होणार! टीम इंडियाच्या एकाचा समावेश, कोण आहे तो?
Usman Khawaja Cricket RetirementImage Credit source: Philip Brown/Getty Images
| Updated on: Jan 02, 2026 | 8:26 PM
Share

क्रिकेट चाहत्यांसाठी 2025 हे वर्ष खास राहिलं. अनेक संघांनी आणि खेळाडूंनी 2025 वर्षात चमकदार कामगिरी केली. आता 2026 चाहत्यांसाठी आणखी खास असणार आहे. फेब्रुवारीपासून टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार रंगणार आहे. तसेच अनेक द्विपक्षीय मालिका खेळवण्यात येणार आहे. मात्र त्याआधी नववर्षाच्या दुसऱ्याच दिवशी एका अनुभवी फलंदाजाने निवृत्ती जाहीर केली. ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) याने निवृत्त होणार असल्याचं जाहीर केलंय. ऑस्ट्रेलिया सध्या मायदेशात इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना हा 4 जानेवारीपासून सिडनी क्रिकेट ग्राउंडमध्ये खेळवण्यात येणार आहे. उस्मानचा हा त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील शेवटचा सामना असणार आहे. उस्मानने या सामन्यानंतर निवृत्त होणार असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे उस्मान शेवटच्या सामन्यात कशी कामगिरी करतो? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

तसेच या 2026 वर्षात आणखी काही खेळाडू निवृत्ती घेऊ शकतात. या वर्षात 3 खेळाडू वयाच्या मुद्द्याचा विचार करता निवृत्ती घेण्याची शक्यता अधिक आहे. त्या 3 खेळाडूंमध्ये भारताच्या एकाचा समावेश आहे. ते तिघे कोण आहेत? हे जाणून घेऊयात.

मोहम्मद नबी

अफगाणिस्तानचा अनुभवी ऑलराउंडर मोहम्मद नबी याने 2019 साली कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. तसेच नबीने 2023 मधील वर्ल्ड कप कारकीर्दीतील अखेरची स्पर्धा असेल, असं सांगितलेलं. मात्र नबीने त्यानंतर खेळणं सुरु ठेवलेलं. तसेच नबीने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 नंतर 1 वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार असल्याचं सांगितलेलं. त्यानुसार, नबीसाठी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धा अखेरची असेल, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

शाकिब अल हसन

बांगलादेशचा अनुभवी ऑलराउंडर शाकिब अल हसन याने काही महिन्यांपूर्वी कसोटी आणि टी 20i क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. मात्र शाकिबने हा निर्णय बदलला. शाकिब ऑक्टोबर 2024 पासून टीममधून बाहेर आहे. त्यामुळे शाकिबने निवृत्ती घेतल्यास क्रिकेट चाहत्यांना आश्चर्य वाटणार नाही.

युझवेंद्र चहल

टीम इंडियाचा अनुभवी फिरकीपटू युझवेंद्र चहल गेल्या अनेक महिन्यांपासून संधीच्या प्रतिक्षेत आहे. तसेच चहलला जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्याचा प्लेइंग ईलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला नाही. चहलने ऑगस्ट 2023 मध्ये अखेरचा सामना खेळला होता. चहलला निवड समितीकडून सातत्याने वगळण्यात येत आहे. त्यामुळे चहलचं कमबॅकही अवघड होत चाललंय. त्यामुळे चहलने निवृत्ती घेतल्यास चाहत्यांनाही आश्चर्य वाटणार नाही.

उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर घणाघात, सूर्याजी पिसाळशी केली गद्दारीची तुलना
उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर घणाघात, सूर्याजी पिसाळशी केली गद्दारीची तुलना.
आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात बंड कायम; उमेदवारानं अर्ज मागे नाहीच
आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात बंड कायम; उमेदवारानं अर्ज मागे नाहीच.
'तपोवनमधील झाडं तोडणार, असं बोलणाऱ्या मंत्र्याचा माज उतरवायचाय...'
'तपोवनमधील झाडं तोडणार, असं बोलणाऱ्या मंत्र्याचा माज उतरवायचाय...'.
अर्ज गिळणाऱ्या उमेदवाराची माघार, उमेदवाराला अश्रू अनावर; शिंदे म्हणाले
अर्ज गिळणाऱ्या उमेदवाराची माघार, उमेदवाराला अश्रू अनावर; शिंदे म्हणाले.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीला ऊत
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीला ऊत.
हरिभाऊ राठोड यांच्यासोबत वाद अन् व्हायरल व्हिडीओवर नार्वेकरांचा खुलासा
हरिभाऊ राठोड यांच्यासोबत वाद अन् व्हायरल व्हिडीओवर नार्वेकरांचा खुलासा.
नाशकात हायव्होल्टेज ड्रामा, बंडखोर उमेदवाराला कार्यकर्त्यांनी कोंडलं
नाशकात हायव्होल्टेज ड्रामा, बंडखोर उमेदवाराला कार्यकर्त्यांनी कोंडलं.
तो बदनाम माणूस, त्याला मतदान करू नका, इच्छुक नाराज उमेदवारांचा गोंधळ
तो बदनाम माणूस, त्याला मतदान करू नका, इच्छुक नाराज उमेदवारांचा गोंधळ.
राहुल नार्वेकर-हरिभाऊ राठोड यांच्यात बाचाबाची, कारण काय? Video व्हायरल
राहुल नार्वेकर-हरिभाऊ राठोड यांच्यात बाचाबाची, कारण काय? Video व्हायरल.
कल्याण-डोंबिवलीत महायुतीचे 9 उमेदवार नगरसेवक, कोणाचे किती बिनविरोध?
कल्याण-डोंबिवलीत महायुतीचे 9 उमेदवार नगरसेवक, कोणाचे किती बिनविरोध?.