AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mohammad rizwan | टीम इंडियाकडून हरल्यानंतर मोहम्मद रिजवानने सरळ सांगितलं, पाकिस्तानच काय चुकतय

Mohammad rizwan | आपल्याच टीमबद्दल मोहम्मद रिजवान काय म्हणाला?. पाकिस्तान टीमची पोल-खोल. वर्ल्ड कप 2023 मध्ये पाकिस्तानी टीमला भारताने दणका दिला. त्यांच्या कमतरता उघडल्या पडल्या.

Mohammad rizwan | टीम इंडियाकडून हरल्यानंतर मोहम्मद रिजवानने सरळ सांगितलं, पाकिस्तानच काय चुकतय
mohammad rizwan Image Credit source: PTI
| Updated on: Oct 19, 2023 | 2:11 PM
Share

नवी दिल्ली : वर्ल्ड कप 2023 मध्ये पाकिस्तानने दोन विजयासह सुरुवात केली. पण तिसऱ्या सामन्यात त्यांचा पराभव झाला. तिसऱ्या सामन्यात त्यांची टक्कर टीम इंडिया बरोबर होती. या मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. अहमदाबादमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानवर एकतर्फी विजय मिळवला. या पराभवानंतर पाकिस्तानी टीमचे फलंदाज, गोलंदाज आणि फिल्डर्सबद्दल प्रश्न उपस्थित होतायत. पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंनी बाबर आजमला कॅप्टनशिपवरुन हटवण्याची मागणी केलीय. आपल्या टीममध्ये बऱ्याच कमतरता आहेत, हे विकेटकीपर मोहम्मद रिजवानला सुद्धा मान्य आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध मॅचआधी त्याने मोठ वक्तव्य केलय.

पाकिस्तानी टीमला कुठे मेहनत घ्यायची आवश्यकता आहे, त्याबद्दल मोहम्मज रिजवानने पीसीबीच्या व्हिडिओमध्ये भाष्य केलय. मोहम्मज रिजवानच्या मते, पाकिस्तानी टीमला परिस्थितीरुप खेळण्याची आवश्यकता आहे. त्याशिवाय फिल्डिंगमध्ये सुधारणेला बराच वाव आहे. वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानी फिल्डिंगला खूपच खराब रेटिंद आहे. फिल्डिंग असो किंवा कॅचिंग दोन्ही ठिकाणी त्यांच्या प्लेयर्सनी सरासरी प्रदर्शन केलय.

स्पिनर्सची समस्या

पाकिस्तानी स्पिनर्स मिडिल ओवर्समध्ये विकेट घेऊ शकत नाहीयत, हे रिजवानने मान्य केलय. गोलंदाजी चांगली करतायत, असं सांगून त्याने स्पिनर्सचा बचाव केला. रिझवान कदाचित ओपनिंग बॉलिंग तसच पावरप्लेमध्ये गोलंदाजाच्या प्रदर्शनाबद्दल उल्लेख करायला तो विसरला असावा. इमाम उल हक, फखर जमाँ बऱ्याच काळापासून वनडे फॉर्मेटमध्ये चांगलं प्रदर्शन करु शकलेले नाहीत. अब्दुल्लाह शफीकने या वर्ल्ड कपमध्ये जरुर शतक झळकवलय पण कामगिरीत सातत्य नाहीय. ते तिघे अपयशी

शाहीन शाह आफ्रिदी पाकिस्तानचा स्ट्राइक बॉलर आहे. पण या वर्ल्ड कपमध्ये तो मार खातोय. हॅरिस रौफची पण तीच हालत आहे. पाकिस्तानी टीमला नसीम शाहची उणीव जाणवतेय. हसन अलीने पुनरागमन केल्यानंतर चांगलं प्रदर्शन केलय.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?