AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 world Cup 2021: विराट कोहलीचे 2 एक्के, तरीही टीम इंडियात स्थान नाहीच!

भारताने टी-20 विश्वचषकासाठी निवडलेल्या संघात गोलंदाजाचा विचार करता तीन मुख्य वेगवान गोलंदाज तर पाच फिरकीपटू आहेत. पण विशेष म्हणजे यामध्ये कर्णधार विराटच्या दोन महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एकही नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

T20 world Cup 2021: विराट कोहलीचे 2 एक्के, तरीही टीम इंडियात स्थान नाहीच!
सिराज आणि चहल
| Edited By: | Updated on: Sep 09, 2021 | 12:22 PM
Share

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) बुधवारी (8 सप्टेंबर) टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर केला. यावेळी 15 मुख्य खेळाडूंसह 3 राखीव खेळाडूंची नावं जाहीर करण्यात आली. यामध्ये घेण्यात आलेल्या काही खेळाडूंच्या संघात असण्यावर जितकी चर्चा आहे तितकीच काही खेळाडूंना संधी न देण्यात आल्याने देखील आहे. यातीलच दोन खेळाडू हे तर कर्णधार विराट कोहलीचे (Virat Kohli) हुकुमी एक्के आहेत. विराटच्या आरसीबी संघातील मुख्य गोलंदाज असणाऱ्या या दोघांनाही टी-20 संघात स्थान मिळालेलं नाही. इतकं सांगितल्यानंतर तुम्हाला कळालचं असेल आम्ही कुणाबद्दल बोलतोय. होय हे दोन खेळाडू म्हणजे अनुभवी फिरकीपटू युझवेंद्र चहल (Yuzvendra chahal) आणि युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj).

टी-20 विश्वचषकासाठीच्या भारतीय संघात मुख्य 15 खेळाडूंमध्ये  5 फिरकीपटूंचा समावेश आहे. तर 3 प्रमुख गोलंदाज असून 6 प्रमुख फलंदाजांसह हार्दिक पंड्या चौथा वेगवान गोलंदाज आणि सातवा फलंदाज म्हणून खेळणार आहे. दरम्यान यामध्ये फिरकीपटूंच्या ताफ्यात अनुभवी चहलच्या जागी नवख्या राहुल चाहरला (Rahul Chahar) संधी देण्यात आली आहे. तर तीनच वेगवान गोलंदाज असणाऱ्यांमध्ये अनुभवी दिग्गजांमध्ये सिराज जागा मिळवू शकलेला नाही. आता यामागील कारणं अशी असू शकतात…

चहलचा विरुद्ध चहर

संघात युझवेंद्र चहलच्या जागी राहुल चहरला स्थान देण्यात आलं असून यामागे दोघांची अलीकडील आयपीएलमधील कामगिरी हे सर्वात मोठं कारण असू शकतं. आरसीबी संघातील मुख्य फिरकीपटू चहल हा विकेट्स मिळवण्यात यशस्वी ठरतो. पण सोबतच त्याला भरपूर धावा ठोकल्या जातात. त्यातच मुंबई इंडियन्सचा राहुल चहर हा एक मुंबईकडून महत्त्वाच्या क्षणी विकेट तर घेतोच आहे. सोबतच अत्यंत कमी धावा ओव्हरमध्ये देण्यासाठी त्याला ओळखलं जात. दरम्यान या निवडीवर अनेकजण आपलं मत देत असून प्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्षा भोगले याने देखील चहलला न घेता राहुल चहरला संधी हे एक मोठं पाऊल असल्याचं म्हटलं आहे.

तर आकाश चोप्राने चहल हा जगातील सर्वोत्कृष्ट फिरकीपटूंपैकी एक असूनही संघात पाच फिरकीपटूंना संधी देताना त्याला न घेण्यावर आश्चर्य व्यक्त केलं आहे. त्याने तसं ट्विटही केलं आहे.

दिग्गजांच्या गर्दीत सिराजला स्थान नाही

चहलनंतरचा एक धक्कादायक निर्णय म्हणजे युवा गोलंदाज मोहम्मद सिराजला संघात स्थान मिळालेलं नाही. यामागे कारण म्हणजे सामने होत असलेले दुबई, शारजाह आणि अबुधाबीची मैदानं फिरकीपटूंसाठी काही तुलनेत अधिक फायद्याची आहेत. त्यातच आतापर्यंतच्या क्रिकेट इतिहासात या मैदानात वेगवान गोलंदाजाना खास फायदा झालेला नाही. त्यामुळे अधिक फिरकीपटू घेण्यात आले आहेत. त्यामुळे बुमराह, शमी आणि भुवनेश्वर हे तीनच वेगवान गोलंदाज घेतले असून हे तिघेही सिराजच्या तुलनेत अनुभवी आण दिग्गज असल्याने सिराजचा पत्ता कट झाला आहे.

टी- 20 विश्वचषकासाठी भारतीय संघ – 

भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), के एल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन, अक्सार पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी

राखीव: श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर आणि दिपक चहर

हे ही वाचा :

T20 world Cup 2021: भारतीय संघात 5 फिरकी गोलंदाज, इतके फिरकीपटू घेण्यामागे ‘हे’ आहे कारण

T 20 World Cup : टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा, अश्विनला संधी, शार्दूल ठाकूर रिजर्वमध्ये, धोनी मेंटरच्या भूमिकेत

गब्बरच्या आयुष्यातलं वादळ शमेना, पहिल्यांदा घटस्फोट आता BCCI कडून शिखर धवनला मोठा झटका

(Mohammed siraj and yuzvendra chahal didnt took place in team india for t20 world cup everyone shocks with this decision)

Follow Us
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस.

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस

मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला.

मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला

सर्वात मोठी बातमी ! शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?.

सर्वात मोठी बातमी ! शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?

Manoj jaragne patil : मनोज जरांगे पाटील कॉकरोच जनता पार्टीच्या स्टेजवर, अभिजीत दीपकेंबरोबर चर्चा.

Manoj jaragne patil : मनोज जरांगे पाटील कॉकरोच जनता पार्टीच्या स्टेजवर, अभिजीत दीपकेंबरोबर चर्चा

Sharad Pawar Meet PM Modi : शरद पवार दिल्लीत पंतप्रधान मोदींना का भेटले? राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया.

Sharad Pawar Meet PM Modi : शरद पवार दिल्लीत पंतप्रधान मोदींना का भेटले? राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

आमच्याकडे व्हिडीओ पाहायला वेळ नाही, सुप्रीम कोर्टाचा पोलीस कारवाईच्या विरोधात तात्काळ सुनावणीला नकार.

आमच्याकडे व्हिडीओ पाहायला वेळ नाही, सुप्रीम कोर्टाचा पोलीस कारवाईच्या विरोधात तात्काळ सुनावणीला नकार