AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MPL 2026 : एमपीएलचा तिसऱ्याच वर्षी देशातील सर्वात मोठी लीग म्हणून दबदबा, महानआर्यमन सिंधिया यांची प्रतिक्रिया

MPCA Mahanaryaman Scindia On MPL : यंदा 3 ऐवजी 5 महिला संघांमध्ये एका ट्रॉफीसाठी एमपीएल (Madhya Pradesh League) स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेबाबत एमपीसीएचे अध्यक्ष काय म्हणाले? जाणून घ्या.

MPL 2026 : एमपीएलचा तिसऱ्याच वर्षी देशातील सर्वात मोठी लीग म्हणून दबदबा, महानआर्यमन सिंधिया यांची प्रतिक्रिया
MPCA Mahanaryaman Scindia On MPLImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Apr 30, 2026 | 10:55 PM
Share

आयपीएल स्पर्धा यशस्वी ठरल्यानंतर जगभरात टी 20 क्रिकेटची चलती पाहायला मिळत आहे. देशभरातही प्रत्येक कानाकोपऱ्यात क्रिकेट स्पर्धेचा थरार पाहायला मिळतो. तसेच बीसीसीआयसह संलग्न असलेल्या राज्य क्रिकेट बोर्डाकडूनही टी 20 लीग स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून एमपीएल स्पर्धा खेळवण्यात येते. आता काही दिवसांनी शेजारच्या राज्यात अर्थात मध्य प्रदेशमध्ये महिला टी 20 लीग स्पर्धेचा थरार पाहायला मिळणार आहे. या मध्ये प्रदेश क्रिकेट लीग (MPL) स्पर्धेसाठी गुरुवारी 30 एप्रिल रोजी ग्वाल्हेरमधील इम्पीरियल गोल्फ रिसोर्टमध्ये टीम ड्राफ्ट पार पडलं.

एमपीएल वुमन्स स्पर्धेसाठीच्या टीम ड्राफ्टमध्ये बोर्डाचे अध्यक्ष महानआर्यमन सिंधिया यांच्या उपस्थितीत टीम ड्राफ्ट पार पडलं. या कार्यक्रमासाठी माजी क्रिकेटपटू सबा करीम आणि शिखर धवन हे प्रमुख पाहुणे होते. शिखर धवन याने महाआर्यमन यांच्या कामाचं कौतुक केलं. तर सबा करीम यांनी माधवराव सिंधिया यांनी केलेल्या कामाबाबत आठवणींना उजाळा दिला.

महानआर्यमन सिंधिया काय म्हणाले?

एमपीसीएचे अध्यक्ष महानआर्यमन सिंधिया यांच्या भाषणाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यांनी एमपीएल स्पर्धेबाबत भाष्य केलं. “एमपीएल स्पर्धेने तिसऱ्याच वर्षी देशातील सर्वात मोठी लीग म्हणून स्थान निर्माण केलंय. एमपीएलने आता देशातील सर्वात यशस्वी लीगमध्ये आपले स्थान पक्क केलंय”, असं एमपीसीएचे अध्यक्ष म्हणाले.

खेळाडूंचं कौतुक

महानआर्यमन सिंधिया यांनी एमपीएल स्पर्धेबाबत बोलताना खेळाडूंचं कौतुक केलं. “आज एमपीएल स्पर्धेशी संबंधित खेळाडू आयपीएल आणि इतर प्रमुख लीग्समध्ये आपली छाप पाडत आहेत”, असं महानआर्यमन सिंधिया यांनी नमूद केलं.

या स्पर्धेत एकूण 5 संघ सहभागी होणार आहेत. या 5 संघांच्या मालकांबाबतही महाआर्यमन यांनी भाष्य केलं. “मध्य प्रदेशमधील क्रिकेटच्या विकासासाठी हे सर्वजण महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत”, असं महानआर्यमन सिंधिया यांनी म्हटलं.

शिखर धवन काय म्हणाला?

“मध्य प्रदेश क्रिकेटमध्ये गेल्या 2 ते 3 वर्षांत लक्षणीय आणि सकारात्मक बदल दिसून आले आहे. एमपीएल सुरू करून राज्यातील खेळाडूंना एक मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे”, अशा शब्दात शिखर धवनने महानआर्यमन सिंधिया यांची प्रशंसा केली. शिखर या कार्यक्रमाला त्याची पत्नी सोफीसह उपस्थित होता.

सबा करीम यांची प्रतिक्रिया

वुमन्स लीग स्पर्धेसाठी असलेला उत्साह पाहून माजी भारतीय क्रिकेटपटू सबा करीम यांनी आनंद व्यक्त केला. सबा करीम यांनी महानआर्यमन सिंधिया यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच माधवराव सिंधिया यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या कामांना उजाळा दिला. “माधवराव यांच्या कार्यकाळात बीसीसीआयमध्ये अनेक सकारात्मक बदल झाले. भारतीय क्रिकेटच्या विकासात माधवराव यांचं योगदान आहे”, असं सबा करीम यांनी नमूद केलं.

दरम्यान एमपीएल स्पर्धेसाठी ड्राफ्टमधून 303 महिला खेळाडूंची नावं अंतिम करण्यात आली. त्यानुसार एकूण 5 संघांनी गरजेनुसार खेळाडूंची निवड केली. यंदा या स्पर्धेत संघांची संख्या 2 ने वाढवून 3 वरुन 5 करण्यात आली आहे. या स्पर्धेला 3 जूनपासून सुरुवात होणार आहे. तर एकूण 28 दिवस 5 संघात चुरस पाहायला मिळणार आहे. एमपीएल स्पर्धेतील सर्व सामने हे इंदूरमध्ये होणार आहेत.

स्पर्धेतील सहभागी 5 संघांची नावं

चंबल घडीयाल ग्वालियर शेरनी रॉयल निमाड ईगल्स भोपाळ वूल्व्स बुदेलखंड बुल्स

Follow Us
ठाकरेंच्या गटात फटाफुटीच्या चर्चांदरम्यान खासदाराचं सर्वात मोठं विधान,
ठाकरेंच्या गटात फटाफुटीच्या चर्चांदरम्यान खासदाराचं मोठं विधान, मी दिल्लीला...
हे काय? भाजप नेत्याने चालवली बस, स्टेअरिंग हातात घेताच मोठा अपघात...
हे काय? भाजप नेत्याने चालवली बस, स्टेअरिंग हातात घेताच मोठा अपघात... पहा VIDEO
ठाकरेंचे खासदार तळ्यात की मळ्यात आदित्य ठाकरेंच्या त्या विधानची सगळीकड
ठाकरेंचे खासदार तळ्यात की मळ्यात आदित्य ठाकरेंच्या त्या विधानची सगळीकडे चर्चा!
उद्धव ठाकरेंचा आमदारांना थेट आदेश, खासदार बंडखोरीच्या चर्चेनंतर घेतला
उद्धव ठाकरेंचा आमदारांना थेट आदेश, खासदार बंडखोरीच्या चर्चेनंतर घेतला मोठा निर्णय, 22 तारखेला...
पुन्हा 14 जून! सुशांतने जीवन संपवलं त्याच दिवशी संचिता गेली... भावानेच
पुन्हा 14 जून! सुशांतने जीवन संपवलं त्याच दिवशी संचिता गेली... भावानेच केला धक्कादायक खुलासा
खासदारांनी साथ सोडली की नाही? उद्धव ठाकरेंच्या प्रतिक्रियेवरून सगळंच
खासदारांनी साथ सोडली की नाही? उद्धव ठाकरेंच्या प्रतिक्रियेवरून सगळंच समजलं, पहा...
पहिले कानाखाली मारली, नंतर कॉलर खेचली, अभिजीत दिपकेसोबत काय घडलं?Video
पहिले कानाखाली मारली, नंतर कॉलर खेचली, अभिजीत दिपकेसोबत काय घडलं? पहिला Video समोर
ठाकरे गटात फूट की अफवा?; संजय राऊतांनी दिलं सर्वात मोठं उत्तर, म्हणाले
ठाकरे गटात फूट की अफवा?; संजय राऊतांनी दिलं सर्वात मोठं उत्तर, म्हणाले....
खासदार संजय देशमुखांचा ठाकरेंना फोन; प्रतापराव जाधवांच्या भेटीबाबत...
मोठी बातमी! खासदार संजय देशमुखांचा ठाकरेंना फोन; प्रतापराव जाधवांच्या भेटीबाबत सांगितलं अन्... काय घडलं?
ठाकरे गटाला मोठा धक्का? फुटीच्या चर्चेत मुनगंटीवारांचे मोठे विधान!
Sudhir Mungantiwar On Thackeray | ठाकरे गटाला मोठा धक्का? खासदारांच्या फुटीच्या चर्चेत मुनगंटीवारांचे मोठे विधान!