MS Dhoni: धोनीच्या शेतात सेल्फी पॉईंट, 43 एकरमध्ये काय पीकवलं? जाणून घ्या….

MS Dhoni: धोनीच्या शेतात सेल्फी पॉईंट, 43 एकरमध्ये काय पीकवलं? जाणून घ्या....

कॅप्टन असताना धोनीने भारताला महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये विजय मिळवून दिलेत. पण त्याचवेळी त्याने भविष्यासाठी युवा खेळाडूदेखील घडवलेत.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 22, 2022 | 4:31 PM

रांची: एमएस धोनी (MS Dhoni) भारताचा अव्वल कर्णधार आहे. कॅप्टन असताना धोनीने भारताला महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये विजय मिळवून दिलेत. पण त्याचवेळी त्याने भविष्यासाठी युवा खेळाडूदेखील घडवलेत. धोनीने आता क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय, आता तो शेतकरी (Farmer) बनलाय. शेतकरी बनल्यानंतरही धोनी स्वस्थ बसलेला नाही. धोनीने शेतीकामामध्ये जी मेहनत घेतली, त्याचे परिणाम आता दिसतायत. धोनीच्या शेतात पीक तयार झालं आहे.
धोनीच्या फार्महाऊसमधला एक फोटो वेगाने व्हायरल होतोय. ज्यात तो वाऱ्यावर डोलणाऱ्या मोहरीच्या शेतात उभा आहे. मोहरीच पीक आल्यानंतर समोर आलेला धोनीचा हा पहिला फोटो आहे. मोहरीच पीक शेतात उगवलं, त्याचा आनंद धोनीच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसतो.

मोहरीच पीकं आणि धोनीचा फोटो
धोनीच्या फार्महाऊसवर पीक घेणारी शेती 43 एकरमध्ये पसरली आहे. पेरणीसह इतर शेती कामांसाठी धोनीला त्याचे कृषी सल्लागार कोचिंग देतायत. व्हायरल होणाऱ्या या फोटोमध्ये तुम्ही धोनीसोबत रोशनलाही बघू शकता.

फार्म हाऊसवर पिकवल्या जातात हिरव्यागार भाज्या
धोनीने इंटरक्रॉपिंग पद्धतीने मोहरीचं पीक आपल्या फार्महाऊसवर घेतलय, असं धोनीचा कृषी सल्लागार रोशनने सांगितलं. धोनीने त्याच्या 43 एकर जमिनीमध्ये मोहरीशिवाय अन्य पीक सुद्धा घेतली आहेत. आलं, शिमला मिर्ची सुद्धा आहे. धोनीला भाज्या आवडतात. रांचीमध्ये असताना धोनीला आपल्या फार्म हाऊसवर पीकलेल्या भाज्या जेवणामध्ये हव्या असतात. या भाज्या रांचीच्या स्थानिक बाजारातही विकल्या जातात.

धोनीचं शेत बनलं सेल्फी पॉईंट
धोनीचं हे मोहरीचं शेत आता सेल्फी पॉईंट बनत चालला आहे. स्वत: धोनीने इथे आपला फोटो काढला आहे. इथे काम करणाऱ्यांना सुद्धा स्वत:चा फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही.

 

ms dhonis ranchi farmhouse flourished with mustard crop see pictures

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें