AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL स्पर्धेतील रटाळ सामना म्हणून मुंबई इंडियन्स आणि आरसीबी सामन्याची चर्चा, झालं असं की..

आयपीएल 2026 स्पर्धेतील 20वा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात पार पडला. हा सामना आरसीबीने 18 धावांनी जिंकला. पण हा सामना खूपच रटाळ झाल्याची चर्चा क्रीडाप्रेमींमध्ये रंगली आहे.

IPL स्पर्धेतील रटाळ सामना म्हणून मुंबई इंडियन्स आणि आरसीबी सामन्याची चर्चा, झालं असं की..
IPL स्पर्धेतील रटाळ सामना म्हणून मुंबई इंडियन्स आणि आरसीबी सामन्याची चर्चा, झालं असं की..Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 13, 2026 | 5:52 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धा प्रत्येक सामन्यानंतर पुढे सरकत आहे. गुणतालिकेत जय पराजयानंतर उलथापालथ होत आहे. त्यामुळे या स्पर्धेची रंगत आणखी वाढत जाणार आहे. असं असताना आयपीएल स्पर्धेतील सर्वात रटाळ सामना म्हणून मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामन्याची नोंद झाली आहे. हा सामना पाहताना कंटाळा आला, अशा प्रतिक्रिया क्रीडाप्रेमींनी सोशल मीडियावर दिल्या आहेत. वानखेडे स्टेडियमवर 12 एप्रिल 2026, रविवारी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना पार पडला. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 18 धावांनी जिंकला. पण हा सामना पाहताना अक्षरश: कंटाळा आला. कारण आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील हा सर्वात वेळखाऊ सामना ठरला. या सामन्यात पाऊस किंवा सुपर ओव्हर असं काही घडलं नाही. तरी हा सामना पूर्ण होण्यासाठी 4 तास आणि 22 मिनिटांचा अवधी लागला. खरं तर हा सामना तीन तासात संपायला हवा होता. पण दीड तासांचा अतिरिक्त अवधी लागला.

बॉलिवूड चित्रपटांचा विक्रम या आयपीएल सामन्याने मोडल्याची चर्चा आता सोशल मीडियावर रंगली आहे. नुकताच प्रदर्शित झालेला धूरंदर: द रिव्हेंज हा बॉलिवूड सिनेमा तीन तास आणि 50 मिनिटांचा आहे. पण या सामन्याने हा विक्रम मोडीत काढला आणि 4 तास 22 मिनिटे घेतली. संध्याकाळी 7.30 वाजता सुरू झाला आणि रात्री 11.52 ला संपला. या सामन्यात खेळाडूंच्या दुखापती, गोलंदाजांची रणनिती, वाइड रिव्ह्यू आणि बरंच काही घडलं. त्यामुळे हा सामना क्रीडाप्रेमींच्या दृष्टीने रटाळ झाला.  या सामन्यात स्लो ओव्हर रेटसाठी मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला दंड ठोठावण्यात आला आहे.

यापूर्वी कोणता सामना दीर्घकाळ चालला?

आयपीएल 2020 मध्ये मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स सामना पाच तास चालला होता. पण तेव्हा दोन सुपर ओव्हर्स टाकण्याची वेळ आली होती. त्यामुळे हा सामना संपण्यासाठी 5 तासांचा अवधी लागला. तर आयपीएल 2023 मधील अंतिम सामना पावसामुळे राखीव दिवशी खेळला गेला. तेव्हा हा सामना राखीव दिवशी तीन तासाच संपला. पण मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामन्यात तसा कोणताच अडथळा नव्हता. पण सर्वात वेळखाऊ ठरल्याने चर्चा होत आहे. आता आयपीएल स्पर्धेच्या सर्वात लांब चाललेला सामना म्हणून या सामन्याची नोंद झाली आहे. खरं तर टी20 हा झटपट खेळला जाणारा क्रिकेट फॉर्मेट आहे. मात्र या सामन्याने क्रीडाप्रेमींना कसोटीचा अनुभव दिला.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...