AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hardik Pandya : सूर्या की रोहित? हार्दिकने विजयाचं श्रेय कुणाला दिलं? जाणून घ्या

Rajasthan Royals vs Mumbai Indians IPL 2025 : मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सवर एकतर्फी आणि धमाकेदार विजय मिळवला. पहिल्या 4 फलंदाजांनी धुव्वादार बॅटिंग केल्यानंतर पलटणच्या गोलंदाजांनी त्यांची भूमिका चोखपणे पार पाडली. मुंबईच्या या विजयानंतर कर्णधार हार्दिक पंड्या खूप आनंदी होता.

Hardik Pandya : सूर्या की रोहित? हार्दिकने विजयाचं श्रेय कुणाला दिलं? जाणून घ्या
Hardik Pandya Post Match RR vs MI IPL 2025Image Credit source: Social Media
| Updated on: May 02, 2025 | 2:26 AM
Share

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 50 व्या सामन्यात गुरुवारी 1 मे रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने होते. हा सामना जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. मात्र घरच्या मैदानात राजस्थान रॉयल्सने पाहुण्या मुंबई इंडियन्ससमोर शरणागती पत्कारली. राजस्थानने टॉस जिंकून फिल्डंगचा निर्णय घेत मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. मुंबईने या संधीचं सोनं केलं. मुंबईने 200 पार धावा केल्या. मुंबईने 20 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 217 धावा केल्या. मुंबईसाठी ओपनर रायन रिकेल्टन याने सर्वाधिक 61 धावांचं योगदान दिलं. तर रोहित शर्मा याने 53 रन्स केल्या.

राजस्थान रॉयल्सचं पॅकअप

प्रत्युत्तरात राजस्थानला विजय मिळवणं सोडा, 20 ओव्हरही पूर्ण खेळता आलं नाही. मुंबईच्या गोलंदाजांनी राजस्थानला 16.1 ओव्हरमध्ये 117 धावांवर गुंडाळलं. भेदक आणि धारदार बॉलिंगच्या जोरावर मुंबईने हा सामना 100 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. मुंबईने अशाप्रकारे पहिल्या 5 पैकी 4 सामने गमावल्यानंतर सलग सहावं यश मिळवलं आणि पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप घेतली. मुंबईने या हंगामात 11 पैकी 7 सामने जिंकले आहेत.

कर्णधार हार्दिक पंड्या आनंदी

मुंबईच्या या विजयानंतर बोलताना कर्णधार हार्दिक पंड्या याने पलटणच्या फलंदाजांचं कौतुक केलं. “टीमने ज्या पद्धतीने बॅटिंग केली ते कौतुकास्पद आहे. मात्र आम्ही आणखी 15 धावा जोडू शकलो असतो. मात्र एकंदरीत फलंदाजांनी शानदार कामगिरी केली”, असं हार्दिकने म्हटलं.

मुंबईच्या फंलदाजांचा धमाका, पहिल्यांदाच असं घडलं

आयपीएलच्या इतिहासात मुंबईच्या पहिल्या 4 फलंदाजांनी 40 पेक्षा अधिक धावा करण्याची ही पहिली वेळ ठरली. रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन या सलामी जोडीने 116 धावांची भागीदारी केली. मात्र रायन आणि रोहित झटपट आऊट झाले. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या या दोघांनी प्रत्येकी 48 धावा करत तिसऱ्या विकेटसाठी नॉट आऊट 94 रन्सची पार्टनरशीप केली. या भागीदारीदरम्यान सूर्यकुमारसह काय संवाद सुरु होता? याबाबतही हार्दिकने सामन्यानंतर सांगितलं.

तोडफोड मित्र मंडळ

“क्रिकेटिंग शॉट्स खेळायचे, यावर आम्ही दोघे सहमत होतो. अर्थात जोखीम न घेता, समजुतीने फटकेबाजी करायची. शॉट्सचा खरा फायदा तेव्हा होतो जेव्हा तुम्ही योग्य दिशेला खेळता”,असंही हार्दिकने नमूद केलं.

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.