MI vs CSK Score Updates and Highlights, IPL 2026 : चेन्नईचा जबरदस्त विजय, मुंबईचा 103 धावांनी धुव्वा
Mumbai Indians vs Chennai Super Kings Indian Premier League 2026 Score Updates and Highlights In Marathi : अकील होसेन आणि संजू सॅमसन या जोडीने मुंबई इंडियन्सचा वानखेडे स्टेडियममध्ये करेक्ट कार्यक्रम केला. अकीलने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर त्याआधी संजूने नाबाद 101 धावांची खेळी केली.

चेन्नई सुपर किंग्स टीमने गुरुवारी 23 एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियममध्ये ऐतिहासिक विजय मिळवत मुंबईला तब्बल 103 धावांनी पराभूत केलं. मुंबई टीमला चेन्नईच्या एकट्या संजू सॅमसन याच्यापेक्षा फक्त 3 धावाच जास्त करता आल्या. संजू सॅमसन याने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर चेन्नईने मुंबईसमोर 208 धावांचं आव्हान ठेवलं होतं. चेन्नईला 207 धावांपर्यंत पोहचवण्यात संजू सॅमसन याने सर्वाधिक योगदान दिलं. संजूने नाबाद 101 धावा केल्या. तर चेन्नईने मुंबईला 19 ओव्हरमध्ये 104 रन्सवर ऑलआऊट केलं. चेन्नईने यासह मुंबईला पराभूत करत या स्पर्धेच्या इतिहासातील धावांबाबत सर्वात मोठा विजय मिळवला. चेन्नईचा हा या 19 व्या मोसमातील तिसरा विजय ठरला. चेन्नईने या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये थेट पाचव्या स्थानी झेप घेतली.
LIVE Cricket Score & Updates
-
MI vs CSK IPL 2026 Live Score Updates : चेन्नईचा जबरदस्त विजय, मुंबईचा 103 धावांनी धुव्वा
चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सचा 103 धावांच्या फरकाने धुव्वा उडवला आहे. चेन्नईने मुंबईसमोर 208 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र मुंबईला 20 ओव्हरही खेळता आलं नाही. चेन्नईने मुंबईला 19 ओव्हरमध्ये 104 रन्सवर गुंडाळलं. चेन्नईने अशाप्रकारे सामना आपल्या नावावर केला.
-
MI vs CSK IPL 2026 Live Score Updates : सूर्यकुमार यादव आऊट, मुंबईला सातवा धक्का, चेन्नई विजयाच्या दिशेने
अकील हौसेन याने पुन्हा एकदा मुंबईला झटका दिला आहे. अकीलने सेट सूर्यकुमार यादव याला आऊट करत मुंबईला सातवा झटका दिला आहे. सूर्याने 30 धावा केल्या. त्यामुळे मुंबईची आता 13.1 ओव्हरनंर 7 आऊट 87 अशी स्थिती झाली आहे.
-
-
MI vs CSK IPL 2026 Live Score Updates : नूर अहमदचा दणका, मुंबईला सलग 2 झटके
नूर अहमद याने मुंबईला सलग 2 झटके दिले आहेत. नूरने आधी कॅप्टन हार्दिक पंड्या याला 1 धावेवर आऊट केलं. त्यानंतर नूरने शेरफेन रुदरर्फोड याला पहिल्याच बॉलवर मैदानाबाहेरचा रस्त दाखवला.
-
MI vs CSK IPL 2026 Live Score Updates : तिलक वर्मा आऊट, अकीलकडून शिकार, मुंबईला चौथा झटका
इम्पॅक्ट प्लेअर अकील हुसैन याने मुंबई इंडियन्सला आणखी एक झटका दिला आहे. अकीलने सूर्यकुमार यादव-तिलक वर्मा ही सेट जोडी फोडून मुंबईला चौथा झटका दिला आहे. तिलकने 37 धावा केल्या.
-
MI vs CSK IPL 2026 Live Score Updates : मुंबईच्या 11 ओव्हरनंतर 78 धावा, सूर्या-तिलकवर मोठी जबाबदारी
मुंबईने 11 ओव्हरनंतर 208 धावांचा पाठलाग करताना 3 विकेट्स गमावून 78 धावा केल्या आहेत. सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा ही जोडी जमली आहे. मुंबईला हा सामना जिंकायचा असेल तर या जोडीला मोठी भागीदारी करावी लागणार आहे.
-
MI vs CSK IPL 2026 Live Score Updates : सूर्या-तिलकने मुंबईला सावरलं, पलटणला मोठ्या भागीदारीची गरज
चेन्नईे मुंबईला झटपट 3 झटके दिले. त्यानंतर तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव या जोडीने मुंबईला सावरलं आहे. तिलक आणि सूर्याने मुंबईला 8 ओव्हरनंतर 3 आऊट 46 धावांपर्यंत पोहचवलं आहे.
-
MI vs CSK IPL 2026 Live Score Updates : काय चाललंय हे? मुंबईला तिसरा झटका, नमन धीर डक
अकील हौसेन याने मुंबईला त्याच्या कोट्यातील दुसऱ्या ओव्हरमध्ये दुसरा झटका दिला आहे. अकीलने त्याच्या कोट्यातील आणि डावातील पहिल्या ओव्हरमध्ये दानिश मालेवार याला झिरोवर आऊट केलं. त्यानंतर अकीलने तिसऱ्या ओव्हरमध्ये नमन धीर यालाही झिरोवर आऊट केलं. त्यामुळे मुंबईची 3 ओव्हरनंतर 3 आऊट 11 अशी स्थिती झाली आहे.
-
MI vs CSK IPL 2026 Live Score Updates : मुंबईला मोठा झटका, क्विंटन डी कॉक आऊट
मुकेश चौधरी याने आपल्या कोट्यातील पहिल्याच ओव्हरमध्ये सलग 4 डॉट बॉल टाकले. त्यानंतर पाचव्या बॉलवर क्विंटन डी कॉक याला आऊट केलं. डी कॉक 7 रन्सवर बोल्ड झाला.
-
MI vs CSK IPL 2026 Live Score Updates : दानिश मालेवार सलग दुसऱ्या सामन्यात ढेर, मुंबईची फ्लॉप सुरुवात
मुंबईची निराशाजनक सुरुवात झाली आहे. ओपनर दानिश मालेवार भोपळा फोडण्यात अपयशी ठरला आहे. अकील हौसेन याने दानिशला विकेटकीपर संजू सॅमसन याच्या हाती कॅच आऊट केलं.
-
MI vs CSK IPL 2026 Live Score Updates : मुंबईच्या बॅटिंगला सुरुवात, क्विंटन-दानिश मैदानात, 208 धावांचं आव्हान
मुंबईच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. मुंबईकडून क्विंटन डी कॉक आणि दानिश मालेवार सलामी जोडी मैदानात आली आहे. चेन्नईने मुंबईसमोर 208 धावांचं आव्हान ठेवलं आहे.
-
MI vs CSK IPL 2026 Live Score Updates : संजूचा शतकी दणका, वानखेडेत मुंबईसमोर 208 धावांचं आव्हान
संजू सॅमसन याने केलेल्या नाबाद शतकी खेळीेच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्ससमोर 208 धावांचं आव्हान ठेवलं आहे. चेन्नईने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 207 धावा केल्या. संजूने नाबाद 101 धावा केल्या. तर कॅप्टन ऋतुराज गायकवाड याने 22 तर डेवाल्ड ब्रेव्हीस याने 21 धावा जोडल्या. आता मुंबई हे आव्हान पूर्ण करते का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
-
MI vs CSK IPL 2026 Live Score Updates : जेमी ओव्हरटन आऊट, अश्वनीला दुसरी विकेट, चेन्नईचा स्कोअर दाबला
अश्वनी कुमार याने आपल्या कोट्यातील चौथ्या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर जेमी ओव्हरटन याला आऊट करतदुसरी विकेट मिळवली आहे. जेमीन 7 बॉलमध्ये 15 रन्स केल्या. चेन्नईच्या 18 ओव्हरनंतर 6 आऊट 181 धावा झाल्या आहेत.
-
MI vs CSK IPL 2026 Live Score Updates : कार्तिक शर्मा आऊट, चेन्नईला पाचवा धक्का
जसप्रीत बुमराह याने चेन्नईच्या कार्तिक शर्मा याला 18 रन्सवर आऊट केलं आहे. चेन्नईने कार्तिकच्या रुपात पाचवी विकेट गमावली आहे. कार्तिक आऊट झाल्यानंतर चेन्नईचा स्कोअर16.5 ओव्हरमध्ये 5 आऊट 165 असा झाला आहे.
-
MI vs CSK IPL 2026 Live Score Updates : संजू-कार्तिक जोडी जमली, चेन्नईच्या किती धावा?
कार्तिक शर्मा याने संजू सॅमसन याच्यासह मैदानात पाय रोवले आहेत. संजू आणि कार्तिक या दोघांनी चेन्नईला 15 ओव्हरनंतर 4 आऊट 149 धावांपर्यंत पोहचवलं आहे. संजू 62 आणि कार्तिक 18 धावांवर नाबाद खेळत आहेत.
-
MI vs CSK IPL 2026 Live Score Updates : संजूच्या अर्धशतकानंतर डेवाल्ड ब्रेव्हीस आऊट, चेन्नईला चौथा धक्का
अश्वनी कुमार याने विस्फोटक फलंदाज डेवाल्ड ब्रेव्हीस याला जसप्रीत बुमराह याच्या हाती कॅच आऊट करत चेन्नईला चौथा झटका दिला आहे. डेवाल्डने 11 बॉलमध्ये 21 रन्स केल्या आणि डगआऊटचा रस्ता धरला.
-
MI vs CSK IPL 2026 Live Score Updates : अल्लाह गजनफरकडून शिवमची शिकार, चेन्नईला तिसरा झटका
अल्लाह गजनफर याने ऋतुराज गायकवाड याच्यानंतर शिवम दुबे याला आऊट केलं आहे. अल्लाहने शिवमला 5 रन्सवर आऊट केलं. चेन्नईने अशाप्रकारे तिसरी विकेट गमावली. तर अल्लाहची दुसरी वैयक्तिक विकेट ठरली.
-
MI vs CSK IPL 2026 Live Score Updates : चेन्नईला दुसरा झटका, सर्फराज खान आऊट
मिचेल सँटनर याने लोकल बॉय सर्फराज खान याला बोल्ड केलं आहे. सर्फराजने 8 बॉलमध्ये 14 रन्स केल्या. सर्फराजने 14 पैकी 12 धावा या चौकारांच्या मदतीने केल्या. चेन्नईने 6 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 73 धावा केल्या. संजू सॅमनस आणि शिवम दुबे दोघे खेळत आहेत.
-
MI vs CSK IPL 2026 Live Score Updates : चेन्नईला पहिला झटका, कॅप्टन ऋतुराज गायकवाड आऊट
अल्लाह गजनफर याने चेन्नई सुपर किंग्सला पहिलाच आणि मोठा झटका दिला आहे. अल्लाहने सीएसकेचा कॅप्टन आणि ओपनर ऋतराज गायकवाड याला तिलक वर्मा याच्या हाती कॅच आऊट केलं. ऋतुराजने 14 बॉलमध्ये 22 रन्स केल्या.
-
MI vs CSK IPL 2026 Live Score Updates : सामन्याला सुरुवात, चेन्नईची बॅटिंग, संजू-ऋतुराज सलामी जोडी मैदानात
मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामन्याला सुरुवात झाली आहे. मुंबईने टॉस जिंकून चेन्नईला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. चेन्नईकडून कॅप्टन ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसन ही सलामी जोडी मैदानात आली आहे.
-
MI vs CSK IPL 2026 Live Updates : चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग ईलेव्हन
चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग ईलेव्हन : संजू सॅमसन (विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), सर्फराज खान, डेवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, कार्तिक शर्मा, जेमी ओव्हरटन, नूर अहमद, अंशुल कंबोज, गुरजनप्रीत सिंग आणि मुकेश चौधरी.
-
MI vs CSK IPL 2026 Live Updates : मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : दानिश मालेवार, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), नमन धीर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (कर्णधार), तिलक वर्मा, शेरफेन रदरफोर्ड, मिचेल सँटनर, क्रिश भगत, जसप्रीत बुमराह, अल्लाह गझनफर.
-
MI vs CSK IPL 2026 Live Updates : मुंबईने टॉस जिंकला, कॅप्टन हार्दिकचा निर्णय काय?
मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात टॉस जिंकला आहे. मुंबईचा कॅप्टन हार्दिक पंड्या याने फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. मुंबईने टीममध्ये कोणताही बदल केलेला नाही. तर चेन्नईने काही बदल केलेत. मात्र महेंद्रसिंह धोनीचं कमबॅक झालेलं नाही. त्यामुळे चाहत्यांची काही प्रमाणात निराशा झाली आहे.
-
MI vs CSK IPL 2026 Live Updates : मुंबई-चेन्नईत टफ फाईट, वानखेडेत थोड्याच वेळात टॉस
मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये 7 वाजता टॉस होणार आहे. आता टॉसचा कॉल कुणाच्या बाजूने लागतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
-
MI vs CSK IPL 2026 Live Updates : चेन्नई सुपर किंग्स टीम
चेन्नई सुपर किंग्स टीम : संजू सॅमसन (विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), मॅथ्यू शॉर्ट, सर्फराज खान, डेवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, जेमी ओव्हरटन, अंशुल कंबोज, नूर अहमद, मुकेश चौधरी, गुरजपनीत सिंग, कार्तिक शर्मा, प्रशांत वीर, रामकृष्ण घोष, मॅट हेन्री, एमएस धोनी, अकेल होसेन, श्रेयस गोपाल, राहुल चहर, स्पेन्सर जॉन्सन, उर्विल पटेल, अमन खान आणि झॅक्री फॉल्क्स.
-
MI vs CSK IPL 2026 Live Updates : मुंबई इंडियन्स टीम
क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), दानिश मालेवार, नमन धीर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कॅप्टन), शेरफेन रदरफोर्ड, मिचेल सँटनर, क्रिश भगत, जसप्रीत बुमराह, अल्लाह गझनफर, अश्वनी कुमार, राज बावा, कॉर्बिन बॉश, मयंक रावत, रघु शर्मा, रोहित शर्मा, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, शार्दुल ठाकुर, विल जॅक्स, मयंक मार्कंडे, रायन रिकेल्टन, रॉबिन मिंज आणि मोहम्मद सलाहुद्दीन इझार.
-
MI vs CSK IPL 2026 Live Updates : मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स महामुकाबला
आयपीएल 2026 च्या 32 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने आहेत. हा सामना वानखेडे स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्यातून रोहित शर्मा आणि महेंद्रसिंह धोनी ही अनुभवी जोडी कमबॅक करणार का? याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.