4 वर्षात धोनीने फक्त त्याला 7 मॅच खेळवल्या, आता त्याने वनडेमध्ये मोडला World Record

धोनीने ज्याला बेंचवर बसवून ठेवलं, त्या बॅट्समनने भारतीय क्रिकेटमध्ये आपल्या बॅटिंगने सर्वांनाच थक्क करुन सोडलय.

4 वर्षात धोनीने फक्त त्याला 7 मॅच खेळवल्या, आता त्याने वनडेमध्ये मोडला World Record
csk Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Nov 21, 2022 | 2:03 PM

नवी दिल्ली: आयपीएलमध्ये मागच्या चार वर्षात त्याला फक्त 7 मॅच खेळण्याची संधी मिळाली. धोनीने त्याला मैदानाऐवजी बेंचवर बसवून ठेवलं. त्याला चेन्नई सुपर किंग्जने आपल्या टीममधून रिलीज केलं. आता त्या खेळाडूने संपूर्ण क्रिकेट विश्वात आपल्या फलंदाजीने सनसनाटी निर्माण केलीय. त्याच नाव आहे, एन. जगदीशन. तामिळनाडूचा हा ओपनर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत अरुणाचल प्रदेश विरुद्ध 141 चेंडूत 277 धावांची इनिंग खेळला. जगदीशन वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा फटकावणारा पहिला फलंदाज बनला आहे.

सरेच्या फलंदाजाचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला

जगदीशनने आधी रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला. रोहितने आंतरराष्ट्रीय सामन्यात 264 धावा फटकावल्या आहेत. त्यानंतर जगदीशनने वर्ल्ड रेकॉर्ड रचणाऱ्या एलिस्टर ब्राऊनला मागे सोडलं. सरेचा हा फलंदाज 2002 मध्ये 268 धावांची इनिंग खेळला होता. आता जगदीशन त्याच्या पुढे निघून गेला आहे.

जगदीशनचा वर्ल्ड रेकॉर्ड

जगदीशनने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत शतकांची रांग लावली आहे. त्याने आता द्विशतक ठोकलय. अरुणाचल प्रदेश विरुद्ध या खेळाडूने 76 चेंडूत शतक झळकावलं. त्यानंतर 114 चेंडूत त्याने डबल सेंच्युरी झळकावली. जगदीशनने वनडे क्रिकेट मॅचमध्ये एकूण 277 धावा फटकावल्या.

जगदीशनच्या आधी कोणी इतकी शतकं झळकावलीयत?

जगदीशनने या इनिंगसह अनेक वर्ल्ड रेकॉर्ड मोडले आहेत. जगदीशन लिस्ट ए क्रिकेटमध्ये सलग पाच शतक झळकावणारा पहिला क्रिकेटर आहे. त्याच्याआधी चार फलंदाजांनी सलग चार शतक ठोकली आहेत. श्रीलंकेच्या संगकाराने वर्ल्ड कप 2015 मध्ये सलग चार शतक झळकावली. त्यानंतर एलेविरो पीटरसनने 2015-16 मध्ये हा कारनामा केला. 2020-21 विजय हजारे ट्रॉफीमध्ये देवदत्त पडिक्कलने सलग चार शतकं झळकावली होती.

400 पेक्षा जास्त धावांची पार्ट्नरशिप

जगदीशनने फक्त डबल सेंच्युरी ठोकली नाही, तर साई सुदर्शनसोबत 416 धावांची पार्टनरशिप करुन वर्ल्ड रेकॉर्ड रचला. लिस्ट ए मध्ये पहिल्यांदाच कुठल्या जोडीने 400 पेक्षा जास्त धावांची भागीदारी केलीय. याआधी ख्रिस गेल आणि मार्लोन सॅम्युल्सच्या नावावर 372 धावांच्या पार्टनरशिपचा रेकॉर्ड होता. 2015 मध्ये त्यांनी हा रेकॉर्ड केला होता. जगदीशनशिवाय सुदर्शनने 102 चेंडूत 154 धावा फटकावल्या. तामिळनाडूने अरुणाचल विरुद्ध 500 पेक्षा जास्त धावांचा डोंगर उभारला.

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.