पाकिस्तानविरोधात खुन्नस काढली, एकाच मॅचमध्ये 9 फलंदाजांना तंबूचा रस्ता, या अंपायरची अनोखी स्टोरी माहितीय?

पाकिस्तानच्या संघात मोठ-मोठे दिग्गज फलंदाज असताना हा कारनामा करण्यात आला होता. विकेट्ससोबतच या गोलंदाजाने त्या सामन्यात 22 मेडन ओव्हरही टाकल्या होत्या.

पाकिस्तानविरोधात खुन्नस काढली, एकाच मॅचमध्ये 9 फलंदाजांना तंबूचा रस्ता, या अंपायरची अनोखी स्टोरी माहितीय?
Follow us
| Updated on: Jun 01, 2021 | 5:04 PM

वेलिंग्टन : क्रिकेटच्या इतिहासांत अनेक धुरंदर गोलंदाज झाले. कमीच सामन्यांत खेळूनही या दिग्गजांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती, न्यूझीलंडचे गोलंदाज फ्रँक कैमरॉन (Frank Cameron) यातीलच एक. आजच्याच दिवशी 1 जून 1932 रोजी फ्रँक यांचा न्यूझीलंडच्या ओटागो येथे जन्म झाला होता. जन्मानंतर 32 वर्षांनी फ्रँक यांनी एक तुफान कामगिरी करत एकाच सामन्यात पाकिस्तानच्या 9 फलंदाजाना तंबूचा रस्ता दाखवला होता. (New Zealand Bowler Frank Cameron took Nine batsmans Wicket in one Match)

frank_cameron

फ्रँक कॅमरॉन

1964 साली न्यूझीलंड आणि पाकिस्‍तान (New Zealand vs Pakistan) यांच्यात ऑकलंड (Auckland Test) येथे कसोटी सामना आयोजित करण्यात आला होता. सामन्यात फ्रँक यांनी न्यूझीलंडकडून भेदक गोलंदाजी करत 49 षटक टाकली ज्यातील 22 षटक ही निर्धाव होती. तसंच उर्वरीत षटकांत केवळ 70 धावांच त्यांनी दिल्या. सोबत त्यांनी पाकिस्तानच्या दोन नाही तीन नाही तर 9 खेळाडूंना बाद केले. त्यांच्या कारकिर्दीतील ही सर्वांत भारी कामगिरी ठरली.

फ्रँक कॅमरॉन यांची कारकिर्द

न्यूझीलंड संघात 6० च्या दशकात खेळलेले अप्रतिम वेगवान गोलंदाज म्हणजे फ्रँक कॅमरॉन. फ्रँक यांनी न्यूझीलंडसाठी 19 कसोटी सामने खेळले. या सामन्यांत त्यांनी 62 विकेट्स घेतल्या. त्यासोबतच त्यांनी 119 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये तब्बल 447 विकेट्स आपल्या नावे केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी 21 हून अधिकवेळा एका डावांत पाच विकेट्सचा बहुमान मिळवला आहे. निवृत्तीनंतर फ्रँक हे न्यूझीलंड क्रिकेटमध्ये सिलेक्टर आणि नंतर अंपायर देखील राहिले आहेत.

हे ही वाचा :

त्रिनिदादमध्ये जन्म, अर्थशास्त्रात पदवी, भारतीय संघाचा ऑलराऊंडर, फिल्डिंगमध्ये याचा हात कुणीच धरला नाही!

WTC Final : भारत विरुद्ध न्यूझीलंड मॅचमध्ये कोण वरचढ ठरणार?, ब्रँडन मॅक्यूलमचा मोठा दावा

ऑस्ट्रेलियन दिग्गज मायदेशी परतताच गर्लफ्रेंडकडून गोड बातमी, म्हणते ‘कुणी तरी येणार येणार गं…!’

(New Zealand Bowler Frank Cameron took Nine batsmans Wicket in one Match)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.