T20 मध्ये 3 शतकं, तरीही वर्ल्ड कपसाठी निवड नाही, स्फोटक फलंदाज निवृत्तीच्या तयारीत

टी-20 विश्वचषक यंदा 17 ऑक्टोबर 14 नोव्हेंबर दरम्यान पार पडणार आहे. स्पर्धेला अजून बराच वेळ असतानाही न्यूझीलंडने आपला संघ जाहीर केला आहे.

T20 मध्ये 3 शतकं, तरीही वर्ल्ड कपसाठी निवड नाही, स्फोटक फलंदाज निवृत्तीच्या तयारीत
कोलीन मनरो
Follow us
| Updated on: Aug 11, 2021 | 5:19 PM

वेलिंग्टन : जगभरातील क्रिकेट रसिक आतुरतेने वाट पाहत असलेल्या टी-20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) काही महिन्यातच सुरुवात होणार आहे. स्पर्धेच्या दोन महिने आधीच न्यूझीलंड संघाने (New Zealand Cricket Team) त्यांचा विश्वषकाचा संघही जाहीर केला आहे. संघात काही जुन्या तर काही नवीन खेळाडूंना संधी देत केन विल्यमसनकडे कर्णधार पद सोपवलं आहे. दरम्यान स्फोटक सलामीवीर कोलिन मनरोला (Colin Munro) संघात स्थान न दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. न्यूझीलंडने कोलिनला पाकिस्तान, बांग्लादेश आणि भारत दौऱ्यावरील संघातही स्थान दिलेलं नाही. यावर प्रतिक्रिया देताना कोलिनने टी-20 वर्ल्ड कप खेळण्याची इच्छा दर्शवली.

कोलिन मनरोने एका इन्स्टाग्राम पोस्टमधून आपलं मत मांडलं. त्याने लिहिलं, ‘मला संघात स्थान न मिळाल्याने मी निराश आहे. टी-20 विश्वचषक संघात स्थान मिळवणं हे माझं लक्ष्य होतं. पण आता वाटतंय मी संघाकडून शेवटचा सामना खेळून झालो आहे. ’ कोलिन फेब्रुवारी, 2020 मध्ये शेवटचा सामना खेळला होता. त्यानंतर संघाने त्याला कॉन्ट्रेक्टही दिलेलं नाही. त्याने आंतरराष्ट्री टी-20 क्रिकेटमध्ये  1 हजार 724 धावा केल्या असून तब्बल तीन टी-20 शतकं ही ठोकली आहेत. तसेच जगभराती टी20 लीग म्हणजेच पाकिस्तान सुपर लीग, कॅरेबियन प्रीमियर लीग आणि बिग बॅश लीगमध्येही त्याने चांगली खेळी केली आहे.

प्रशिक्षकाचं म्हणणं काय?

कोलिनला संघात स्थान न दिल्यानंतर न्यूजीलंडचा प्रशिक्षक गॅरी स्टीडने यावर आपली प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, ‘कोलिन हा केवळ टी-20 विश्वचषकासाठी उपलब्ध होता. इतर दौऱ्यांसाठी तो उपलब्ध नसल्याने आम्ही या गोष्टीवर योग्य विचार केला. ज्यानंतर मागील 6 महिन्यात चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचीच निवड केली.

टी 20 विश्वचषकासाठी न्यूझीलंडचा संघ-

केन विलियमसन (कर्णधार), मार्टिन गप्टिल, डेवन कॉन्वे, टिम साउदी, ट्रेंट बोल्ट, टिम सीफर्ट (यष्टीरक्षक), मिचेल सँटनर, ईश सोढ़ी, ग्लेन फिलिप्स, जिम्मी नीशम, डेरिल मिचेल, काइल जेमिसन, लॉकी फर्ग्यूसन, मार्क चेपमॅन आणि टॉड एस्टल.

हे ही वाचा – 

T20 World Cup 2021 साठी दोन महिन्यांपूर्वीच न्यूझीलंडचा संघ जाहीर, ‘या’ दिग्गज खेळाडूला विश्रांती

T20 World Cup 2021 चे ग्रुप जाहीर, भारतासोबत गटात ‘हे’ संघ, भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबाबत मोठी माहिती समोर

IPL 2021 साठी नियमांमध्ये बदल, बीसीसीआयकडून नवी नियमावली जाहीर

(New Zealand Cricketer colin munro indicates retirement after not getting in new zealand team for t20 world cup)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.