AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2024 सुरू होण्याआधी पंड्यासाठी कॅप्टन्सीबाबत वाईट बातमी, टीम मॅनेजमेंटच्या निर्णयाने मोठा झटका

आयपीएल 2024 आधी अखेर ज्याची भाती होती तेच घडलं आहे. कोणालाही वाटलं नव्हतं की टीम मॅनेजमेंट अशा प्रकारचा निर्णय घेईल, पण टीम मॅनेजमेंटच्या या निर्णयाने पंड्या दुखावला गेला असणार आहे. नेमका काय आहे तो निर्णय जाणून घ्या.

IPL 2024 सुरू होण्याआधी पंड्यासाठी कॅप्टन्सीबाबत वाईट बातमी, टीम मॅनेजमेंटच्या निर्णयाने मोठा झटका
| Updated on: Feb 29, 2024 | 4:55 PM
Share

मुंबई : आयपीएल 2024 मोसमाला २२ मार्चपासून सुरूवात होत आहे. त्याआधी सर्व आयपीएल फ्रँचायझींनी आपला संघ मजबूत करणायवर भर दिला. मुंबई इंडियन्सने ट्रेडिंग विन्डोमधून हार्दिक पंड्या याला आपल्या ताफ्यात घेतलं. गुजरात टायटन्स संघाचं कर्णधारपद सोडून त्याने मुंबईमध्ये जाण्याचा मोठा निर्णय घेतला होता. रोहित शर्मा आता मुंबईमध्ये फक्त खेळाडू म्हणून खेळणार आहे. हार्दिकला कॅप्टन केल्याने मुंबईचे चाहते नाराज झालेले दिसले. हार्दिक पंड्या यंदाच्या मोसमात मुंबई इंडियन्स संघाकडून कॅप्टन म्हणून मैदानात उतरणार आहे. अशातच पंड्या बंधूंपैकी एकासाठी वाईट बातमी समोर आली आहे.

टीम मॅनेजमेंटचा धक्कादायक निर्णय

टीम मॅनेजमेंटने हार्दिक पंड्या याचा भाऊ कृणाल पंड्या याला उपकर्णधारपदावरून काढलं आहे. कृणाल पंड्या याने मागील सीझनमध्ये के.एल. राहुल दुखापती झाल्यावर त्याच्या जागी संघाची धुरा सांभाळली होती. आता लखनऊ सुपर जायंट्स संघाने उपकर्णधार म्हणून आता निकोलस पूरन याची निवड केली आहे. कर्णधार के.एल.राहुल संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळत आहे. परंतु तो आता दुखापती असल्याने त्याच्या जागी निकोलस पूरन कर्णधार म्हणून मैदानात उतरू शकतो.

कृणाल पंड्या याने राहुल दुखपती झाल्यावर कर्णधार म्हणून जबाबदारी पार पाडली होती. मात्र प्लेऑफमध्ये लखनऊचा प्रवास संपला होता. तसं पाहायला गेलं तर लखनऊ संघाची कामगिरी ठिकठाक राहिली आहे. साखळी फेरीत 14 पैकी 8 सामने जिंकले होते आणि 5 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता.

एलएसजी पूर्ण संघ: के.एल. राहुल (कर्णधार), निकोलस पूरन, क्विंटन डी कॉक, आयुष बडोनी, काइल मेयर्स, मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, देवदत्त पडिककल, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, क्रुणाल पंड्या, युधवीर सिंग, प्रेरक मंकड. , यश ठाकूर, अमित मिश्रा, मार्क वुड, मयंक यादव, मोहसीन खान, के गौतम, शिवम मावी, अर्शिन कुलकर्णी, एम सिद्धार्थ, ॲश्टन टर्नर, डेव्हिड विली, मोहम्मद अर्शद खान.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.