‘ब्रेक घेण्यात काहीच चुकीचं नाही, पण…’, कोहलीच्या सुट्टीवर अझरुद्दीनचं रोखठोक मत

जानेवारी महिन्यात कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्यासाठी कोहलीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (BCCI) ब्रेक मागितला आहे. कोहलीच्या मुलीचा जानेवारी मध्ये वाढदिवस आहे.

'ब्रेक घेण्यात काहीच चुकीचं नाही, पण...', कोहलीच्या सुट्टीवर अझरुद्दीनचं रोखठोक मत
रोहीत शर्माच्या निवडीवर दिलीप वेंगसरकर यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिलीय
Follow us
| Updated on: Dec 14, 2021 | 5:04 PM

नवी दिल्ली: “ब्रेक घेण्यात काहीच चुकीचं नाही, पण वेळ योग्य असली पाहिजे” असं मत भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने (Mohammed Azharuddin) व्यक्त केलं आहे. विराट कोहलीने (Virat kohli) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) होणाऱ्या एकदिवसीय मालिकेतून माघार घेतली आहे. त्या पार्श्वभूमीवर अझरुद्दीनने हे मत व्यक्त केलं आहे. जानेवारीमहिन्यात कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्यासाठी कोहलीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (BCCI) ब्रेक मागितला आहे.

कोहलीच्या मुलीचा वाढदिवस 

कोहलीच्या मुलीचा जानेवारी मध्ये वाढदिवस आहे. विराट आणि अनुष्काची मुलगी वामिका येत्या ११ जानेवारीला एक वर्षाची होणार आहे. कोहलीची माघार हा भारतासाठी दुहेरी झटका आहे. कारण आधीच रोहित शर्मा दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळणार नाहीय. येत्या २६ डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे.

…म्हणून मतभेदांच्या चर्चांना बळकटी मिळते 

“एकदिवसीय मालिकेसाठी उपलब्ध नसल्याचं विराट कोहलीने कळवलं आहे. रोहित शर्मा सुद्धा कसोटीमध्ये खेळणार नाहीय. ब्रेक घेण्यात काहीच चुकीचं नाही. पण वेळ योग्य असली पाहिजे. या अशा घडामोडी मतभेदांच्या चर्चांना अधिक बळकटी देणाऱ्या आहेत” असं मोहम्मद अझरुद्दीनने आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.

टी-२०, वनडे आणि कसोटी संघाचे कर्णधारपद विराट कोहलीकडे होते. पण कोहलीकडे आता कसोटी संघाचे कर्णधारपद आहे. टी-२० आणि वनडेच्या कर्णधारपदी रोहित शर्माची निवड करण्यात आली आहे. विराट आणि रोहित दोघेही भारतीय क्रिकेट संघाचे आधारस्तंभ आहेत. आतापर्यंत दोघांनी अनेक सामने एकहाती जिंकून दिले आहेत. अनेक विक्रम दोघांच्या नावावर आहेत. पण या दोन्ही प्रतिभावन खेळाडूंमध्ये मतभेद असल्याच्या चर्चा वारंवार सुरु असतात.

आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेमुळे पुन्हा एकदा या चर्चांनी जोर पकडला आहे. कोहलीने बीसीसीआयकडे जानेवारीत छोटा ब्रेक मागितल्याचे सूत्रांनी एएनआयला सांगितले. दुखापतीमुळे रोहित शर्मा कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. सराव करताना रोहित शर्माच्या हाताला दुखापत झाली होती. स्पेशालिस्ट रघूचा चेंडू रोहित शर्माला लागला होता. रोहितच्या जागी कसोटी मालिकेसाठी प्रियांक पांचाळची संघात निवड झाली आहे.

संबंधित बातम्या 

Priyank Panchal : रोहित शर्माची जागा घेणारा प्रियांक पांचाळ नेमका कोण? दक्षिण आफ्रिकेचं तिकीट मिळण्याचं कारण काय?

Kuldeep Yadav : टीम इंडियाचा चायनामन कुलदीप यादव निघालेला आत्महत्या करायला? नेमकं कारण काय?

IndvsSA : दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी टीम इंडियाला धक्के सुरुच; कोहलीची माघार, रोहित शर्माबद्दल संभ्रम, नेतृत्व कुणाकडे?

Non Stop LIVE Update
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.