AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Priyank Panchal : रोहित शर्माची जागा घेणारा प्रियांक पांचाळ नेमका कोण? दक्षिण आफ्रिकेचं तिकीट मिळण्याचं कारण काय?

रोहित शर्माच्या जागी दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध चमकदार कामगिरी करणाऱ्या प्रियांक पांचाळचा कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे.

Priyank Panchal : रोहित शर्माची जागा घेणारा प्रियांक पांचाळ नेमका कोण? दक्षिण आफ्रिकेचं तिकीट मिळण्याचं कारण काय?
Priyank Panchal
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Dec 14, 2021 | 8:48 AM
Share

मुंबई: टीम इंडियाला (Team India) ला दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यापूर्वी मोठा धक्का बसला. भारताच्या एकदिवसीय आणि टी-20 संघाचा नवा कर्णधार आणि कसोटी संघाचा उपकर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) दुखापत झाली आहे. सराव करताना रोहित शर्माच्या हाताला दुखापत झाली होती. स्पेशालिस्ट रघूचा चेंडू रोहित शर्माला लागला होता. रोहित शर्माच्या जागेवर प्रियांक पांचाळ (Priyank Panchal) याला संधी देण्यात आली आहे. प्रियांक पांचाळनं दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध चांगली कामगिरी केली होती, त्यामुळं त्याची निवड करण्यात आली आहे.

कोण आहे प्रियांक पांचाळ?

प्रियांक पाचाळ हा भारतातील देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ठ सलामीवीर आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यानं 100 मॅचेस खेळल्या आहेत. पांचाळनं 7 हजार धावा केल्या असून त्यानं 24 शतकं केली असून 50 अर्धशतक त्याच्या नावावर आहेत. देशांतर्गत प्रथमश्रेणी सामन्यामध्ये त्याची नाबाद 314 ही सर्वोत्कृष्ट धावसंख्या आहे.

मध्यमगती गोलंदाजीची क्षमता

प्रियांक पाचाळनं त्याच्या नेतृत्त्वात गुजरातला 2016-17 मध्ये पहिल्यांदा रणजी ट्रॉफीचं विजेतेपद मिळवून दिलं होतं. प्रियांक पांचाळ मध्यमगती गोलंदाजी देखील करतो. त्यानं 22 विकेटस देखील घेतल्या आहेत.पांचाळनं 2016-17 च्या रणजी ट्रॉफीमध्ये 542 धावा केल्या होत्या. तर, 2018-19 मध्ये 898 धावा केल्या होत्या. विजय हजारे ट्रॉफीमध्ये देखील त्यानं चांगली कामगिरी केली होती. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी टीम इंडियात निवड होण्यापूर्वी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत देखील त्यानं महाराष्ट्र, केरळ, रेल्वे कडून चांगली कामगिरी केली होती. प्रियांक पांचाळनं भारत अ संघाकडून खेळताना न्यूझीलंड, श्रीलंका संघाविरुद्ध सेंच्युरी केली होती. प्रियांक पांचाळ शिवाय टीम इंडियाकडे के.एल.राहुल आणि मंयक अग्रवाल हे सलामीवीर आहेत.

इतर बातम्या:

IND VS SA : दुखापतग्रस्त रोहित शर्मा कसोटी मालिकेतून बाहेर, प्रियांक पांचाळला संधी, हिटमॅनच्या ODI खेळण्यावरही प्रश्नचिन्ह

मुंबईला 3 वेळा चॅम्पियन बनवणाऱ्या जयवर्धनेकडे श्रीलंकेला टी-20 वर्ल्ड कप जिंकवून देण्याची जबाबदारी

Priyank Panchal who replaces injured Rohit Sharma in India Test squad in IND VS SA series know about him

Follow Us
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश