IND VS SA : दुखापतग्रस्त रोहित शर्मा कसोटी मालिकेतून बाहेर, प्रियांक पांचाळला संधी, हिटमॅनच्या ODI खेळण्यावरही प्रश्नचिन्ह

IND VS SA : दुखापतग्रस्त रोहित शर्मा कसोटी मालिकेतून बाहेर, प्रियांक पांचाळला संधी, हिटमॅनच्या ODI खेळण्यावरही प्रश्नचिन्ह
Priyank Panchal - Rohit Sharma

भारतीय संघ या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया या दौऱ्यावर कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिकेचा दौरा हा अत्यंत महत्वपूर्ण दौरा मानला जात आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अक्षय चोरगे

Dec 13, 2021 | 11:34 PM

मुंबई : भारतीय संघ या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया या दौऱ्यावर कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिकेचा दौरा हा अत्यंत महत्वपूर्ण दौरा मानला जात आहे. मात्र या दौऱ्याआधी टीमची चिंता वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे भारताच्या एकदिवसी आणि टी-20 संघाचा नवा कर्णधार आणि कसोटी संघाचा उपकर्णधार रोहित शर्माला दुखापत झाली आहे. (Priyank Panchal replaces injured Rohit Sharma in India’s Test squad in IND VS SA series)

दुखापतीमुळे रोहित शर्मा कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. सराव करताना रोहित शर्माच्या हाताला दुखापत झाली होती. स्पेशालिस्ट रघूचा चेंडू रोहित शर्माला लागला होता. क्रिकबझच्या अहवालानुसार, तो आगामी तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळू शकणार नाही. रोहित शर्माच्या जागी दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध चमकदार कामगिरी करणाऱ्या प्रियांक पांचाळचा कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. रोहित शर्माला कसोटी उपकर्णधार बनवण्यात आलं होतं, पण आता त्याच्या दुखापतीनंतर उपकर्णधार कोण असेल हाही महत्त्वाचा प्रश्न आहे.

दुखापत कशी झाली?

रोहित शर्मा गेल्या आठवडाभरापासून मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये फलंदाजीचा सराव करत होता. सराव खेळपट्टी दक्षिण आफ्रिकेतील परिस्थितीप्रमाणेच बनवण्यात आली होती जिथे थ्रो-डाउन स्पेशालिस्ट रघू रोहितकडून उसळत्या चेंडूंसह सराव करुन घेत होता. रघूचा एक चेंडू रोहित शर्माला लागला आणि ज्यामुळे त्याला दुखापत झाली आहे. या दुखापतीमुळे आता तो कसोटी मालिकेतून बाहेर पडला. रोहित शर्मा वनडे मालिका खेळणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. रोहित शर्माला नुकतेच एकदिवसीय संघाचे कर्णधार बनवण्यात आले आहे.

दरम्यान, बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, दक्षिण आफ्रिका अ विरुद्धच्या कसोटी सामन्यात 96 धावा करणाऱ्या प्रियांक पांचाळला रोहित शर्माच्या जागी कव्हर म्हणून बोलावण्यात आले आहे. पांचाळला आज रात्री मुंबईतील टीम हॉटेलमध्ये पोहोचण्यास सांगितले आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. प्रियाक नुकताच दक्षिण आफ्रिकेला गेला होता आणि तिथे त्यानी चांगली फलंदाजी केली होती. त्यामुळे त्याला संघात सामील होण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, मयंक अग्रवाल के. एल. राहुलसह सलामीला मैदानात उतरणार आहे.

इतर बातम्या

मुंबईला 3 वेळा चॅम्पियन बनवणाऱ्या जयवर्धनेकडे श्रीलंकेला टी-20 वर्ल्ड कप जिंकवून देण्याची जबाबदारी

Team india : टीम इंडिया 9 वर्षांचा दुष्काळ लवकरच संपवणार, या दिग्गजाने केली मोठी भविष्यवाणी

Eng vs Aus test : फलंदाज म्हणून जबरदस्त पण कर्णधार सुमार, पराभवानंतर जो रुटवर टीका

(Priyank Panchal replaces injured Rohit Sharma in India’s Test squad in IND VS SA series)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें