IndvsSA : दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी टीम इंडियाला धक्के सुरुच; कोहलीची माघार, रोहित शर्माबद्दल संभ्रम, नेतृत्व कुणाकडे?

टीम इंडियाला (Team India) ला दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यापूर्वी मोठा धक्का बसला. वनडेचा माजी कर्णधार विराट कोहलीनं वैयक्तिक कारणामुळं वनडे मालिकेतून माघार घेतली आहे.

IndvsSA : दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी टीम इंडियाला धक्के सुरुच; कोहलीची माघार, रोहित शर्माबद्दल संभ्रम, नेतृत्व कुणाकडे?
Rohit Sharma Virat Kohli
Follow us
| Updated on: Dec 14, 2021 | 1:29 PM

मुंबई: टीम इंडियाला (Team India) ला दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यापूर्वी मोठा धक्का बसला. वनडेचा माजी कर्णधार विराट कोहलीनं (Virat Kohli) वैयक्तिक कारणामुळं वनडे मालिकेतून माघार घेतली आहे. तर, रोहित शर्मा (Rohit Sharma) जखमी झाल्यानं कसोटी मालिकेत तो खेळू शकणार नाहीय. सराव करताना रोहित शर्माच्या हाताला दुखापत झाली होती. स्पेशालिस्ट रघूचा चेंडू रोहित शर्माला लागला होता. रोहित शर्मा वनडे मालिकेपूर्वी फिट होणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. जर, रोहित शर्मा फिट झाला नाही तर कॅप्टन कोण असणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.

रोहित शर्मा फिट नसल्यास कुणाला संधी

विराट कोहलीनं एकदिवसीय मालिकेतून माघार घेतली आहे. रोहित शर्माला झालेल्या दुखापतीतून तो बरा झाला नाही तर त्याच्या जागेवर कुणाला संधी मिळणार हे पाहावं लागणार आहे. के.एल.राहुल, श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत यांच्या पैकी एकाला संधी मिळू शकते.

विराट कोहलीनं माघार का घेतली?

विराट कोहलीची मुलगी वामिका हिचा पहिला वाढदिवस असल्यानं त्यानं एकदिवसीय मालिकेतून माघार घेतली आहे.

रोहित शर्माच्या जागी प्रियांक पांचाळला संधी

रोहित शर्माच्या जागी प्रिंयांक पांचाळची निवड करण्यात आली आहे. प्रियांक पांचाळ हा भारतातील देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ठ सलामीवीर आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यानं 100 मॅचेस खेळल्या आहेत. पांचाळनं 7 हजार धावा केल्या असून त्यानं 24 शतकं केली असून 50 अर्धशतक त्याच्या नावावर आहेत. देशांतर्गत प्रथमश्रेणी सामन्यामध्ये त्याची नाबाद 314 ही सर्वोत्कृष्ट धावसंख्या आहे.

इतर बातम्या:

Priyank Panchal : रोहित शर्माची जागा घेणारा प्रियांक पांचाळ नेमका कोण? दक्षिण आफ्रिकेचं तिकीट मिळण्याचं कारण काय?

IND VS SA : दुखापतग्रस्त रोहित शर्मा कसोटी मालिकेतून बाहेर, प्रियांक पांचाळला संधी, हिटमॅनच्या ODI खेळण्यावरही प्रश्नचिन्ह

India vs South Africa Virat Kohli withdraw name from odi match Rohit Sharma injured who will new captain

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.