AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Prithvi Shaw : 15 बॉलमध्ये 66 रन्स, पृथ्वी शॉ याची सूर्यकुमार यादवच्या टीम विरुद्ध वादळी खेळी

North Mumbai Panthers vs Triumphs Knights MNE : पृथ्वी शॉ याने टी 20 मुंबई लीग स्पर्धेत वादळी खेळी करत 75 धावा केल्या. पृथ्वीने या खेळीसह टीमला 200 पार पोहचवण्यात निर्णायक भूमिका बजावली.

Prithvi Shaw : 15 बॉलमध्ये 66 रन्स, पृथ्वी शॉ याची सूर्यकुमार यादवच्या टीम विरुद्ध वादळी खेळी
Prithvi Shaw T20 Mumbai 2025Image Credit source: Social Media
| Updated on: Jun 08, 2025 | 8:17 PM
Share

क्रिकेटर पृथ्वी शॉ गेल्या अनेक वर्षांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. पृथ्वी शॉ याने त्याच्या नेतृत्वात टीम इंडियाला अंडर 19 वर्ल्ड कप जिंकून दिला. तसेच पृथ्वीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही दणक्यात सुरुवात केली. त्यामुळे पृथ्वीची दिग्गज सचिन तेंडुलकर याच्यासह तुलना करण्यात आली. मात्र पृथ्वीला ते स्टारडम टिकवता आलं नाही. पृथ्वीला त्याच्या निराशाजनक कामगिरीमुळे टीम इंडियानंतर मुंबई टीममधूनही बाहेर व्हावं लागलं. पृथ्वीला त्याच्या कामगिरीवरुन आणि फिटनेसवरुन ट्रोल करण्यात आलं. पृथ्वीला आतापर्यंत धावांसाठी संघर्ष करावा लागला. इतकंच काय पृथ्वीला टी 20 मुंबई लीगमध्येही संघर्ष करावा लागला. त्यामुळे पृथ्वी टीकेचा धनी ठरला. मात्र अखेर पृथ्वीला सूर गवसला आहे.

कर्णधार पृथ्वीने टी 20 मुंबई स्पर्धेतील 19 व्या सामन्यात नॉर्थ मुंबई पँथर्स टीमकडून खेळताना ट्रायम्फ्स नाईट्स एमएनई विरुद्ध तडाखेदार अर्धशतक झळकावलं. पृथ्वीने केलेल्या अर्धशतकामुळे नॉर्थ मुंबई पँथर्सला 200 पार मजल मारता आली. पृथ्वीने या सामन्यातील पहिल्या डावात स्फोटक खेळी केली.

कर्णधार पृथ्वीने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. पृथ्वीने या संधीचा चांगलाच फायदा घेत 75 धावांची वादळी खेळी केली. पृथ्वी ज्या वेगाने खेळत होता त्यानुसार त्याला सहज शतक करण्याची संधी होती. मात्र तसं होऊ शकलं नाही. पृथ्वी 10 व्या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर आऊट झाला. सूर्यांश शेंडगे याने पृथ्वीला पार्थ नाईक याच्या हाती कॅच आऊट केलं.

पृथ्वीने 34 बॉलमध्ये 220.59 च्या स्ट्राईक रेटने 75 रन्स केल्या. पृथ्वीने त्यापैकी 66 धावा या फक्त 15 चेंडूत केल्या. पृथ्वीने या 66 धावा चौकार आणि षटकारांच्या मदतीने केल्या. पृथ्वीने या खेळीत 3 षटकार आणि 12 चौकार लगावले.

पृथ्वी व्यतिरिक्त हर्षल जाधव याने संघासाठी सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. हर्षलने 30 चेंडूत 46 रन्स केल्या. तसेच इतरांनीही योगदान दिलं. त्यामुळे नॉर्थ मुंबई पँथर्सला 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 207 रन्स करता आल्या. आता पृथ्वीच्या नेतृत्वात टीम जिंकते का? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

नॉर्थ मुंबई पँथर्स प्लेइंग ईलेव्हन : पृथ्वी शॉ (कर्णधार), दिव्यांश सक्सेना (विकेटकीपर), अर्जून जैस्वाल, हर्षल जाधव, आयुष वर्तक, सौरभ सिंग, गौरव जठार, प्रवेश पाल, राहुल सावंत, प्रिन्स बडियानी आणि प्रतीक मिश्रा.

ट्रायम्फ्स नाईट्स एमएनई प्लेइंग ईलेव्हन : सिद्धांत अद्धटराव, परीक्षित वळसंगकर, सूर्यकुमार यादव (कर्णधार), सूर्यांश शेडगे, पार्थ कुणाल नाईक, शिखर ठाकुर (विकेटकीपर), मकरंद गिरीश पाटील, मिनाद मांजरेकर, जय संजय जैन, श्रेयस गुरव आणि हृषीकेश भूषण गोरे.

मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.