Video : ट्रेंट बोल्टचा बाउंड्रीवर चमत्कार! पकडला असा कॅच की नेदरलँडचा फलंदाजही आश्चर्यचकीत
World Cup 2023, NZ vs NED : न्यूझीलंड विरुद्ध नेदरलँड यांच्यात स्पर्धेतील सहावा सामना रंगला. हा दोन्ही संघांचा दुसरा सामना होता. या सामन्यात न्यूझीलंडने 99 धावांनी विजय मिळवला. असं असलं तरी ट्रेंट बोल्टचा झेल चर्चेत राहिला.

मुंबई : वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या सहाव्या सामन्यात न्यूझीलंडने नेदरलँडवर दणदणीत विजय मिळवला. नेदरलँडने नाणेफेकीचा कौल जिंकत न्यूझीलंडला फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी संधीचं सोनं केलं आणि 7 गडी गमवून 322 धावा केल्या आणि विजयासाठी 323 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान नेदरलँडला काही पेलवता आलं नाही. नेदरलँडचा संपूर्ण संघ 223 धावांवर बाद झाला. न्यूझीलंडने नेदरलँडवर 99 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात ट्रेंट बोल्ट पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. यावेळी गोलंदाजी नाही तर क्षेत्ररक्षणात जबरदस्त कमाल दाखवली. सीमारेषेवर असा झेल घेतला की सर्वच आवाक् झाले. हा झेल योग्य आहे की नाही यासाठी तिसऱ्या पंचांना वारंवार रिप्ले पाहावा लागला. अखेर बाद असल्याचं घोषित करण्यात आलं.
बोल्टचा जबरदस्त झेल
न्यूझीलंड संघाचं 17 वं टाकण्याची जबाबदारी रचिन रविंद्र याच्याकडे देण्यात आली. त्याने आपल्या गोलंदाजीच्या चौथ्या चेंडूवर बास डे लीड याला तंबूचा रस्ता दाखवला. लीडने उत्तुंग शॉट मारत चेंडू सीमारेषेवर मारला. सर्वांना वाटलं हा षटकारच आहे. पण सीमेवर ट्रेंट बोल्ट उभा होता. तो असताना हा षटकार कसा जाईल. त्याने चेंडू योग्य पद्धतीने जज केला आणि झेल घेतला. पण त्याला बॅलन्स करणं कठीण झालं आणि सीमारेषे बाहेर गेला. पण त्याने आपली चलाखी दाखवत हवेतच झेल घेतला आणि सीमारेषेच्या आत आला.
intha manchivaru ah roju endhuku ala miss chesaru unkil @trentboult pic.twitter.com/AfN2H4fThE
— 🧘♂️ (@FrontfootPunch_) October 9, 2023
बोल्टचा हा झेल पाहून लीड देखील आश्चर्यचकीत झाला. कारण त्याला बाद झालो असल्यावर विश्वासच बसत नव्हता. न्यूझीलंडची टीमही आवाक् झाली होती. बोल्टने या पद्धतीचे काही झेल या आधीही पकडले आहेत. लीडने 25 चेंडूत 18 धावा केल्या.
दोन्ही संघांचे खेळाडू
न्यूझीलंड प्लेईंग ईलेव्हन | डेव्होन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डेरिल मिचेल, टॉम लॅथम (कॅप्टन आणि विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमॅन, मिचेल सेंटनर, मॅट हेनरी, लॉकी फर्ग्यूसन आणि ट्रेन्ट बोल्ट.
नेदरलँड्स प्लेईंग ईलेव्हन | स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार आणि विकेटकीपर), विक्रमजीत सिंह, मॅक्स ओ’डॉउड, कॉलिन एकरमॅन, बास डी लीडे, तेजा निदामानुरु, सायब्रँड एंगेलब्रेक्ट, रूलोफ वॅन डेर मेरवे, रयान क्लेन, आर्यन दत्त आणि पॉल वॅन मीकेरेन.
