Cricket : 1 मालिका आणि 15 खेळाडू, टी 20I सीरिजसाठी संघाची घोषणा, कॅप्टन कोण?
Cricket News : निवड समितीने मायदेशात होणाऱ्या टी 20i मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. निवड समितीने 15 खेळाडूंची निवड केली आहे. जाणून घ्या.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेची सांगता झाली आहे. भारतीय क्रिकेट संघाने अंतिम सामन्यात दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये न्यूझीलंडवर मात केली आणि ट्रॉफीवर नाव कोरलं. टीम इंडियाने या विजयासह 2000 सालच्या पराभवाची परतफेड केली. टीम इंडियाची ही चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची तिसरी वेळ ठरली. तर दुसऱ्या बाजूला न्यूझीलंडला उपविजेता म्हणून मायदेशी परतावं लागलं आहे. त्यानंतर आता न्यूझीलंड क्रिकेट टीम मायदेशात चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचे यजमान पाकिस्तानविरुद्ध भिडणार आहे.
न्यूझीलंड मायदेशात पाकिस्तानविरुद्ध 5 सामन्यांची टी 20i आणि 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. न्यूझीलंडने मंगळवारी 11 मार्चला टी 20i मालिकेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. मायकल ब्रेसवेल हा न्यूझीलंडचं नेतृत्व करणार आहे. निवड समितीने काही खेळाडूंची सर्व तर काही क्रिकेटपटूंची मोजक्याच सामन्यांसाठी निवड केली आहे.
तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानने काही दिवसांपूर्वीच न्यूझीलंड दौऱ्यातील टी 20i आणि एकदिवसीय मालिकेसाठी संघ जाहीर केला. त्यानुसार, पीसीबीने टी 20i संघांचा कर्णधार बदलला. मोहम्मद रिझवान याच्या जागी सलमान अली आगा याला नेतृत्वाची सूत्र देण्यात आली. त्यामुळे न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान या टी 20i मालिकेत दोन्ही कर्णधारांच्या कामगिरीकडेही क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
टी 20i मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना, 16 मार्च, ख्राईस्टर्चच
दुसरा सामना, 18 मार्च, डुनेडीन, यूनिव्हर्सिटी ओव्हल
तिसरा सामना, 21 मार्च, ऑकलँड
चौथा सामना, 23 मार्च, माउंट मौंगानुई
पाचवा सामना, 26 मार्च, वेलिंग्टन
टी 20i मालिकेसाठी पाकिस्तान टीम : सलमान अली आगा (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), अब्दुल समद, अबरार अहमद, हारिस रौफ, हसन नवाज, जहंदाद खान, खुशदिल शाह, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद अली, मोहम्मद हारिस, मुहम्मद इरफान खान, ओमेर बिन युसुफ, शाहीन शाह आफ्रिदी, सुफियान मुकीम आणि उस्मान खान.
टी 20i मालिकेसाठी न्यूझीलंड टीम : मायकल ब्रेसवेल (कॅप्टन), फिन एलन, मार्क चॅपमॅन, जॅकब डफी, जॅक फाउलकेस (शेवटच्या 2 सामन्यांसाठी), मिच हे, मॅट हेनरी (शेवटच्या 2 सामन्यांसाठी), कायल जेमीसन (पहिल्या 3 सामन्यांसाठी), डेरिल मिचेल, जेम्स नीशम, विल ओ’रुर्के (पहिल्या 3 सामन्यांसाठी), टीम रॉबिन्सन, बेन सियर्स, टीम सायफर्ट आणि ईश सोढी.
