NZ vs SA : न्यूझीलंडच्या बाजूने नाणेफेकीचा कौल, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बॉलिंगचा निर्णय, प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण?
New Zealand vs South Africa 2nd ODI Match Toss : त्रिसदस्यीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेसमोर न्यूझीलंडचं आव्हान आहे. न्यूझीलंडने या मालिकेत यजमान पाकिस्तानचा धुव्वा उडवत विजयी सुरुवात केली आहे.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचं पाकिस्तानकडे यजमानपद आहे. या महत्त्वाच्या स्पर्धेआधी पाकिस्तानमध्ये त्रिसदस्यीय एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेत पाकिस्तान, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका आमनेसामने आहेत. या मालिकेला 8 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. न्यूझीलंडने पाकिस्तानला पराभूत करत विजयी सलामी दिली. तर या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका आमनेसामने आहेत. या सामन्याचं आयोजन हे लाहोरमधील गद्दाफी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार 10 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 9 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. न्यूझीलंडने टॉस जिंकला. कॅप्टन मिचेल सँटरन याने फिल्डिंगचा निर्णय घेत दक्षिण आफ्रिकेला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.
दक्षिण आफ्रिकेसमोर न्यूझीलंडला रोखण्याचं आव्हान
चॅम्पियन्स ट्रॉफीआधी या मालिकेचं महत्त्व फार जास्त आहे. त्यात ही मालिका पाकिस्तानमध्ये होत आहे. त्यामुळे यजमानांसह पाहुण्या दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांसाठी ही मालिका रंगीत तालीम आहे, असं म्हटलं तर चूक ठरणार नाही. न्यूझीलंडने शनिवारी 8 फेब्रुवारीला पाकिस्तानवर 78 धावांनी विजय मिळवत शानदार सुरुवात केली. तर आता न्यूझीलंड या मालिकेतील दुसरा सामना दक्षिण आफ्रिकेसमोर खेळत आहेत. दक्षिण आफ्रिकेचा हा या मालिकेतील पहिलाच सामना आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेसमोर या सलामीच्या सामन्यात न्यूझीलंडला रोखण्याचं आव्हान असणार आहे. त्यासाठी दक्षिण आफ्रिकेला मोठी धावसंख्या उभारावी लागणार आहे. त्यामुळे आता न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज किती धावांपर्यंत मजल मारतात? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
न्यूझीलंडने टॉस जिंकला, दक्षिण आफ्रिकेची बॅटिंग
🚨 TOSS ALERT 🚨
New Zealand win the toss and opt to bowl first in Lahore 🏏#3Nations1Trophy | #NZvSA pic.twitter.com/qia60RRHJb
— Pakistan Cricket (@TheRealPCB) February 10, 2025
दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन : टेम्बा बावुमा (कर्णधार), मॅथ्यू ब्रीट्झके, जेसन स्मिथ, वियान मुल्डर, काइल व्हेरेन (विकेटकीपर), मिहलाली मपोंगवाना, सेनुरन मुथुसामी, एथन बॉश, ज्युनियर डाला, लुंगी एनगिडी आणि तबरेज शम्सी.
न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन : मिचेल सँटनर (कॅप्टन), विल यंग, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, डॅरिल मिचेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मॅट हेन्री, बेन सियर्स आणि विल्यम ओरुर्के.
