AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ODI World Cup 2027 फॉर्मेटमध्ये बदल, आता सुपर-7 आणि पहिल्या फेरीतून 2 संघ होणार आऊट

आयसीसी वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धा पुढच्या वर्षी होणार आहे. पण या स्पर्धेपूर्वी फॉर्मेटमध्ये बदल केला जाणार आहे. एका रिपोर्टनुसार, या स्पर्धेत 14 ऐवजी 12 संघ खेळणार आहे. पण त्यासाठी आयसीसी संघांची संख्या कमी करणार नाही तर एक नव्या फॉर्मेटने 12वा संघ ठरणार आहे.

ODI World Cup 2027 फॉर्मेटमध्ये बदल, आता सुपर-7 आणि पहिल्या फेरीतून 2 संघ होणार आऊट
ODI World Cup 2027 फॉर्मेटमध्ये बदल, आता सुपर-7 आणि पहिल्या फेरीतून 2 संघ होणार आऊटImage Credit source: Money 9 वरून
| Updated on: Jul 15, 2026 | 6:01 PM
Share

आयसीसी वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेला अजून एका वर्षांचा अवधी शिल्लक असूनही जोरदार तयारी सुरू आहे. या स्पर्धेसाठी आयसीसीने मोठा बदल करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे येणाऱ्या वर्ल्डकप स्पर्धेत नवा फॉर्मेट पाहायला मिळणार आहे. यापूर्वी अशा पद्धतीने कधीच स्पर्धेचं आयोजन केलं गेलं नव्हतं. त्यामुळे क्रीडाप्रेमींमध्ये या फॉर्मेटबाबत प्रचंड उत्सुकता आहे. आयसीसीने 15 जुलैला नव्या फॉर्मेटची घोषणा केली आहे. या स्पर्धेत एकूण 14 संघ भाग घेणार आहेत. मात्र नव्या फॉर्मेटमुळे मुख्य राउंडमध्ये फक्त 12 संघ भाग घेतील. तसेच पहिल्यांदाच सुपर 7 राउंड खेळवला जाणार आहे. त्यातून उपांत्य फेरीचे चार संघ ठरणार आहेत. आयसीसीने वार्षिक सर्वसाधारण बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं आहे.

आयसीसीने काय बदल केला?

वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत एकूण 14 संघ असतील याबाबतची घोषणा आधीच झाली होती. पण त्यानंतर 12 संघच खेळतील असा दावा करणारा मिडिया रिपोर्ट आला. त्यामुळे क्रीडाविश्वात संभ्रम निर्माण झाला होता. कारण 14 संघ भाग घेणार तर 7-7 चे दोन गट असतील. त्यानंतर सुपर 6 फेरी होईल आणि त्यातून उपांत्य फेरीचे चार संघ ठरतील. असंच सर्व क्रीडाप्रेमींना वाटलं होतं. कारण 2003 वर्ल्डकप अशाच पद्धतीने खेळला गेला होता. यात 14 संघांनी भागा घेतला होता. पण यावेळी आयसीसीने यात बदल केला आहे. पहिल्यांदाच सुपर सीरिज आणि सुपर 7 फेरीचा समावेश केला आहे. म्हणजेच या स्पर्धेत 14 संघ खेळतील. ग्रुप स्टेजमधून दोन संघ आधीच बाद होतील. कसं काय ते समजून घेऊयात..

असा असेल वनडे वर्ल्डकप 2027 चा फॉर्मेट

  • राउंड 1- वर्ल्डकप 2027 स्पर्धेत एकूण 14 संघ पात्र ठरतील. पण यापैकी 12व्या, 13व्या आणि 14व्या स्थानावर असलेल्या संघांना सुपर सीरिज खेळावी लागेल. म्हणजेच या तीन संघांना राउंड रॉबिन पद्धतीने सामना खेळावा लागेल. प्रत्येकी दोन सामने या फेरीत होतील. यातील विजेत्या संघाला दुसऱ्या फेरीत संधी मिळेल. तर दोन संघ आऊट होतील.
  • राउंड 2- खऱ्या अर्थाने 12 संघांमध्ये ही स्पर्धा सुरू होईल. हे 12 संघ 6-6 असे दोन गटात विभागले जातील. प्रत्येक गटात राउंड रॉबिन पद्धतीने सामने खेळले जातील. म्हणजेच प्रत्येकाच्या वाटेला 5 सामने येतील. दोन गटातील टॉप 3 संघ पुढच्या फेरीत पात्र ठरतील. पण यावेळी सुपर 7 फेरी आहे. त्यामुळे सातवा संघ दोन्ही गटातील बेस्ट संघ असणार आहे. या फेरीत एकूण 30 सामने होतील.
  • राउंड 3- सुपर 7 मध्ये सात संघांमध्ये राउंड रॉबिन पद्धतीने सामने खेळले जातील. म्हणजेच प्रत्येक संघ एकूण सहा सामने खेळणार आहे. यातील टॉप 4 संघांना उपांत्य फेरीचं तिकीट मिळेल. या फेरीत एकूण 21 सामने होतील.

उपांत्य फेरीत राउंड 7 मध्ये पहिल्या स्थानावर असलेला संघ चौथ्या स्थानावरील संघाशी लढेल. तर दुसरा उपांत्य फेरीच्या सामन्यात दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावरील संघ आमनेसामने असतील. त्यानंतर विजयी संघांमध्ये अंतिम सामना होईल.

Follow Us
सुनील तटकरेंनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट; कोणत्या गोष्टींवर....
Sunil Tatkare | सुनील तटकरेंनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट; नेमक्या कोणत्या गोष्टींवर झाली चर्चा?
अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार; दिवाळीपूर्वी प्रत्येक सेविकेला...
Anganwadi Sevika Bhaubeej Gift : अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार; दिवाळीपूर्वी प्रत्येक सेविकेला मिळणार एवढे पैसे
पुणे शिक्षक मतदारसंघात शिंदे गटाची भाजपला धक्का देणारी खेळी....
Shivsena : पुणे शिक्षक मतदारसंघात शिंदे गटाची भाजपला धक्का देणारी खेळी; नेमकं काय घडतंय? 
तीन समन्सनंतरही हनी सिंग गैरहजर? महाराष्ट्र सायबर सेलने पुन्हा बजावलं
Yo Yo Honey Singh : तीन समन्सनंतरही हनी सिंग गैरहजर? महाराष्ट्र सायबर सेलने पुन्हा बजावलं समन्स; पुढे काय होणार?
काशी विश्वनाथ मंदिराच्या कळसावरील सोने गायब; मंदिर व्यवस्थापनाने....
Kashi Vishwanath Temple : काशी विश्वनाथ मंदिराच्या कळसावरील सोने गायब; वकिलांचा गंभीर आरोप, मंदिर व्यवस्थापनाने काय दिलं उत्तर?
मुंबईच्या धारावीमधील प्रसिद्ध तेरेसा हॉटेलवर FDA ची कारवाई
Mumbai FDA : मुंबईच्या धारावीमधील प्रसिद्ध तेरेसा हॉटेलवर FDA ची कारवाई
5 हजार रुपये म्हणजे...; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
Vijay Wadettiwar : 5 हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
Abhijeet Dipke : तिरंगा फडकवणं गुन्हा नाही; CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, अभिजीत दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे; अनेक गोष्टी समजल्या...
दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला
Bonus For Railway Employees : दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय, तब्बल....