AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mohammed Siraj | विजयीवीर मोहम्मद सिराज विमानतळावरुन थेट कब्रस्तानात, वडिलांच्या आठवणीने भावूक!

टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना सिराजचे वडिल मोहम्मद गौस यांचं 20 नोव्हेंबरला निधन झालं होतं.

Mohammed Siraj | विजयीवीर मोहम्मद सिराज विमानतळावरुन थेट कब्रस्तानात, वडिलांच्या आठवणीने भावूक!
सिराज भारतात परतल्यानंतर विमानतळावरुन थेट कब्रस्तानात वडिलांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गेला.
| Updated on: Jan 21, 2021 | 7:10 PM
Share

हैदराबाद : ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर टीम इंडियाचे (Team India) शिलेदार भारतात परतले. देशातील विविध शहरांमधील विमानतळावर तसेच त्यांच्या राहत्या घरी या खेळाडूंचे शानदार स्वागत करण्यात आले. गोलंदाज मोहम्मद सिराज हैदराबाद विमानतळावर पोहचला. सिराज विमानतळावरुन घरी न जाता परस्पर आपल्या वडिलांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कब्रस्तानात पोहचला. यावेळेस तो भावूक झाला. (On his return from Australia Mohammed Siraj paid his respects to his father at the Kabrstan in hyderabad)

सिराज सकाळी 9 च्या दरम्यान हैदराबादमधील कब्रस्तानात पोहचला. सिराजने आपल्या वडिलांच्या कबरीवर फुले वाहून श्रद्धांजली अर्पण केली. तसेच त्याने नमाज अदा केली. वडिलांना श्रद्धांजली वाहताना सिराज भावूक झाला होता. त्याचे हे फोटो व्हायरल होत आहेत. टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना सिराजचे वडिल मोहम्मद गौस यांचं 20 नोव्हेंबरला निधन झालं. त्यांना फुप्फुसाचा आजार होता. भारतीय संघ कोरोना नियमांनुसार बायोबबलमध्ये होता. बीसीसीआयने सिराजला भारतात जाण्यासाठी क्वारंटाईन नियमांमधून सवलत दिली. पण सिराजने अशा भावनिकप्रसंगी राष्ट्राला प्राधान्य दिलं. सिराजच्या या निर्णयाचं कौतुक करण्यात आलं.

“अब्बु का सपना पुरा करना”

सिराजला वडिलांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहता आले नाही. पण सिराजने फोनवरुन आई आणि भावासोबत संवाद साधला. यावेळेस “आपल्या वडिलाचं स्वप्न पूर्ण कर”, असा सल्ला आईने दिल्याचं सिराजने सांगितलं. “मला घरच्यांनी प्रेरणा दिली, धीर दिला. या पाठिंब्यामुळे मला बर्‍याच मानसिक शक्ती मिळाल्याचं सिराज म्हणाला. “आपल्या मुलाने देशाचं प्रतिनिधित्व करावं. त्याला खेळताना जगाने पहावे, अशी वडिलांची इच्छा होती. ते आज असते तर त्यांना आनंद झाला असता. वडिलांच्या आशिर्वादामुळेच मी 5 विकेट्स घेऊ शकलो. यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजतो. भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत”, असं सिराज म्हणाला.

मोहम्मद शमी दुखापतग्रस्त झाल्याने मोहम्मद सिराजला ऑस्ट्रेलियाविरोधातील दुसऱ्या कसोटीतून पदार्पण करण्याची संधी मिळाली. मोहम्मद सिराजला अनुभवी फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने कॅप देऊन टीम इंडियाच्या प्लेइंग इलव्हेनमध्ये स्वागत केलं. सिराज हा टीम इंडियाकडून कसोटी पदार्पण करणारा 298 वा खेळाडू ठरला. पदार्पणातील सामन्यात त्याने 5 विकेट्स घेतल्या.

राष्ट्रगीतादरम्यान अश्रू अनावर

तिसऱ्या कसोटी सामन्याआधी राष्ट्रगीतादरम्यान सिराजला अश्रू अनावर झाले. यावेळेस संघ सहकाऱ्यांनी तसेच भारतीयांनी सिराजला भावनिक दाद दिली. मला राष्ट्रगीतावेळेस वडिलांची आठवण आली. यामुळे मला रडू कोसळल्याचं सिराजने सांगितलं.

कसोटी मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज

सिराज ऑस्ट्रेलियाविरोधातील कसोटी मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. सिराजने या 4 सामन्यातील मालिकेतील 3 सामन्यांमध्ये एकूण 13 विकेट्स घेतल्या. दरम्यान आता टीम इंडिया इंग्लंडविरोधात एकूण 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. यातील पहिल्या 2 कसोटींमध्ये सिराजची निवड करण्यात आली आहे. सिराज या इंग्लंडविरोधातील 2 कसोटींमध्ये कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.

संबंधित बातम्या :

टीम इंडियाचा शिलेदार मोहम्मद सिराजच्या वडिलांचं निधन, कोरोनाच्या नियमांमुळे अंत्यसंस्कारांना मुकणार

AUS vs IND 3rd Test | राष्ट्रगीत सुरु झालं अन् मोहम्मद सिराजच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले

(On his return from Australia Mohammed Siraj paid his respects to his father at the Kabrstan in hyderabad)

इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.