AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PAK vs AUS : कसोटी निवृत्तीच्या शेवटच्या टप्प्यात डेविड वॉर्नरच्या नावावर विक्रम, शतकी खेळीसह विरोधकांची तोंड केली बंद

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. ही कसोटी मालिका डेविड वॉर्नरच्या क्रिकेट कारकिर्दिचा शेवट असणार आहे. या मालिकेसाठी त्याच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं. पण पहिल्याच डावात शतकी खेळी करत त्याने विरोधकांची तोंडं बंद केली आहेत.

PAK vs AUS : कसोटी निवृत्तीच्या शेवटच्या टप्प्यात डेविड वॉर्नरच्या नावावर विक्रम, शतकी खेळीसह विरोधकांची तोंड केली बंद
PAK vs AUS : डेविड वॉर्नरने शेवटच्या कसोटी मालिकेत करून दाखवलं, पहिल्याच डावात नव्या विक्रमासह ठोकलं शतक Image Credit source: Twitter
| Updated on: Dec 14, 2023 | 4:50 PM
Share

मुंबई : पाकिस्तान विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात डेविड वॉर्नरची बॅट चांगलीच तळपळी. पर्थमध्ये पाकिस्तान विरुद्ध शतकी खेळी करत २६ वं शतक ठोकलं. जवळपास एक वर्षानंतर डेविड वॉर्नरला शतकी खेळी करण्यात यश आलं आहे. डेविड वॉर्नरने २५ वं कसोटी शतक दक्षिण अफ्रिकेविरुद्ध २७ डिसेंबरला मारलं होतं. त्यात त्याने २०० धावांची खेळी केली होती. २०२२ मध्ये डेविड वॉर्नरने ३०.०५ च्या सरासरीने ५७१ धावा केल्या होत्या. यात एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश होता. आता पाकिस्तानविरुद्ध ३५२ दिवासांनी शतक ठोकलं आहे. डावखुऱ्या डेविड वॉर्नरने ४३ व्या षटकात चौकार मारत कसोटीतील २६ वं शतक ठोकलं आहे. यासाठी १२५ चेंडूंचा सामना केला.

डेविड वॉर्नरने शतकी खेळीसह पाकिस्तानचा माजी कर्णधार इंजमाम उल हकला मागे सोडलं आहे. तर वेस्ट इंडिजचा दिग्गज क्रिकेटपटू गॅरी सोबर्स याची बरोबरी केली आहे. इंजमाम उल हकने कसोटीत २५, तर गॅरी सोबर्सने २६ शतकं ठोकली आहेत. वॉर्नरने ११० व्या कसोटी सामन्यात हा पल्ला गाठला आहे. तर इंजमामने यासाठी १२० सामने खेळले होते. तर गॅरी सोबर्सने ९३ व्या कसोटी सामन्यात २६ वं षटक ठोकलं होतं. आता वॉर्नरच्या निशाण्यावर एलन बॉर्डरचा रेकॉर्ड असून त्याने १५६ कसोटीत २७ शतकं ठोकली आहेत.

दुसरीकडे, वॉर्नरने शतक ठोकत विरोधकांची तोंडं बंद केली आहेत. शतकी खेळीनंतर हवेत उडी घेत किस केलं. वॉर्नरचे चाहते हा व्हिडीओ पोस्ट करत आहेत. वॉर्नरने टी ब्रेक दरम्यान सांगितलं की, “येथे येणं आणि धावा करणं माझं काम आहे. शतकी खेळी करणं एक चांगली अनुभूती आहे. विरोधकांची तोंड बंद करण्यासाठी यापेक्षा चांगला मार्ग नाही.”

डेविड वॉर्नर आपल्या कसोटी कारकिर्दितील शेवटचा सामना खेळत आहे. तीन सामन्याती शेवटचा कसोटी सामना सिडनीमध्ये होणार आहे. यानंतर कसोटी क्रिकेटला रामराम ठोकणार आहे. वॉर्नरने ही कसोटी मालिका शेवटची असेल असं जाहीर केलं आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.