AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PAK vs CAN: आरोन जॉनसनची एकाकी झुंज, पाकिस्तानसमोर 107 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?

Pakistan vs Canada 1st Innings Highlights: पाकिस्तानच्या गोलंदाजांना झोडत आरोन जॉनसन याने शानदार अर्धशतकी खेळी केली.

PAK vs CAN: आरोन जॉनसनची एकाकी झुंज, पाकिस्तानसमोर 107 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?
Aaron Johnson fifty pak vs can
| Updated on: Jun 11, 2024 | 10:32 PM
Share

आरोन जॉनसन याने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर कॅनडा क्रिकेट टीमने पाकिस्तानसमोर विजयासाठी 107 धावांचं आव्हान ठेवलं आहे.आरोन जोन्स याने दिलेल्या एकाकी झुंजीमुळे कॅनडाला 100 पार मजल मारता आली. आरोनने कॅनडाकडून सर्वाधिक धावा केल्या. आरोनने 44 बॉलमध्ये 4 फोर आणि 4 सिक्सच्या मदतीने 52 धावांची खेळी केली. कॅप्टन साद बिन झफर याने 10 धावांचं योगदान दिलं. कलीम सना याने 13 रन्स जोडल्या. मात्र इतरांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. पाकिस्तानकडून मोहम्मद आमिर आणि हरीस रौफ या दोघांनी सर्वाधिक 2-2 विकेट्स घेतल्या.  कॅनडाकडून नवनीत धालिवाल याने 4, प्रगत सिंह 2, निकोलस कीर्तोन 1, श्रेयस मोव्वा 2 आणि डिलन हेलिगर याने नाबाद 9 धावा केल्या. तर रवींद्र पॉल याला भोपळाही फोडता आला नाही. पाकिस्तानसाठी आमिर आणि हरीस रौफ या दोघांव्यतिरिक्त शाहिन आफ्रिदी आणि नसीम शाह या दोघांनी 1-1 विकेट घेतली.

हारिस रौफ याचं शतक

दरम्यान पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफ याने कॅनडा विरुद्धच्या सामन्यात इतिहास रचला. हारिसने कॅनडा विरुद्ध 2 विकेट्स घेतल्या. हारिसने यासह टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 विकेट्सचा टप्पा पूर्ण केला. हारिस पाकिस्तानकडून 100 विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज ठरला.

कॅनडा उलटफेर करणार?

दरम्यान पाकिस्तानसाठी हा करो या मरो असा सामना आहे. पाकिस्तानने सलग 2 सामने गमावले आहेत. त्यामुळे कॅनडा विरुद्ध कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानला हा सामना जिंकावा लागणार आहे. त्यामुळे आता पाकिस्तान विजय मिळवणार की कॅनडा 106 धावांचा बचाव करणा? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

पाकिस्तानला विजयासाठी 107 धावांचं आव्हान

कॅनडा प्लेइंग ईलेव्हन : साद बिन जफर (कॅप्टन), श्रेयस मोव्वा (विकेटकीपर), आरोन जॉन्सन, नवनीत धालीवाल, परगट सिंग, निकोलस किर्टन, रविंदरपाल सिंग, डिलन हेलिगर, कलीम सना, जुनैद सिद्दीकी आणि जेरेमी गॉर्डन.

पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन: बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सॅम अयुब, फखर जमान, उस्मान खान, शादाब खान, इमाद वसीम, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ आणि मोहम्मद अमीर.

देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.
पंकजा मुंडे यांना मोठा झटका, बीड धारुरमध्ये भाजपचे सर्व उमेदवार हरले
पंकजा मुंडे यांना मोठा झटका, बीड धारुरमध्ये भाजपचे सर्व उमेदवार हरले.
30 वर्षांचा वनवास संपला अन् विकास कामांचा... सरोज अहिरेंची प्रतिक्रिया
30 वर्षांचा वनवास संपला अन् विकास कामांचा... सरोज अहिरेंची प्रतिक्रिया.
शिंदे सेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांना मोठा धक्का, जळगावात मविआचा विजय
शिंदे सेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांना मोठा धक्का, जळगावात मविआचा विजय.
काय तो विजय... सगळं कसं ओक्के! शहाजीबापू पाटलांनी सांगोल्यात राखला गड
काय तो विजय... सगळं कसं ओक्के! शहाजीबापू पाटलांनी सांगोल्यात राखला गड.
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?.