AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PAK vs NZ: रावळपिंडीमध्ये होऊ घातलेल्या पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामन्याला आधी विलंब, मग संपूर्ण दौराच रद्द!

रावळपिंडी : क्रिकेट जगतात गुरुवारी विराट कोहलीने टी-20 संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर आजही (17 सप्टेंबर) एक मोठी घडामोड घडली आहे.  न्यूझीलंडचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर असून पाकिस्तान आणि न्यूझीलंड (Pakistan vs New Zealand) यांच्यातील सामना सुरु होण्यासाठी काही मिनिटं शिल्लक राहिले असतानाच सामनाच नाही तर संपूर्ण दौराच रद्द करण्यात आला आहे. रावळपिंडीमध्ये (Rawalpindi) होणारा पहिला […]

PAK vs NZ: रावळपिंडीमध्ये होऊ घातलेल्या पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामन्याला आधी विलंब, मग संपूर्ण दौराच रद्द!
Pakistan vs New Zealand tour
| Edited By: | Updated on: Sep 17, 2021 | 5:00 PM
Share

रावळपिंडी : क्रिकेट जगतात गुरुवारी विराट कोहलीने टी-20 संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर आजही (17 सप्टेंबर) एक मोठी घडामोड घडली आहे.  न्यूझीलंडचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर असून पाकिस्तान आणि न्यूझीलंड (Pakistan vs New Zealand) यांच्यातील सामना सुरु होण्यासाठी काही मिनिटं शिल्लक राहिले असतानाच सामनाच नाही तर संपूर्ण दौराच रद्द करण्यात आला आहे. रावळपिंडीमध्ये (Rawalpindi) होणारा पहिला एकदिवसीय सामना आधी काही वेळासाठी पुढे ढकलण्यात आला. सामन्याला काहीसा उशीर झाल्यानंतर काही वेळातच सामन्यासह संपूर्ण दौराच रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली.

न्यूझीलंडच्या पाकिस्तान दौऱ्यात 3 वनडे आणि 5 टी-ट्वेंटी सामने खेळवण्यात येणार होते. वनडे सीरिजने या दौऱ्याला सुरुवात होणार होती. त्यातील पहिला वनडे सामना आज (17 सप्टेंबर) खेळवण्यात येणार होता. मात्र, पहिल्याच सामन्याच्या टॉस होण्याच्या 20 मिनिटांआधीच हा सामना रद्द करण्यात आला. सुरक्षेच्या कारणास्तव हा सामना रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान सामना रद्द होण्याआधी सामन्याला विलंब देखील झाला होता.

खेळाडूंना हॉटेलमधून बाहेर न पडण्याच्या सूचना

सर्वात आधी सामना सुरु होण्यापूर्वी खेळाडू मैदानाच्या दिशेने निघण्यापूर्वीच रावळपिंडीमधील तणावपूर्ण वातावरणामुळे खेळाडूंना हॉटेल रुममध्येच थांबण्याचा सल्ला देण्यात आला. दुसरीकडे प्रेक्षकांनाही मैदानात सोडण्यात आले नव्हते. त्यावेळी सामन्याला काहीसा उशीर होणार असल्याची बातमी येत होती. पण सामन्याला अवघी 20 मिनिटं शिल्लक असताना सामना आणि संपूर्ण दौरा रद्द करण्यात आला आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची प्रतिक्रिया

या सर्व घडामोडींवर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ट्विटरवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने आम्हाला सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा दिला. तसेच त्यांनी सीरिज रद्द करण्याचा एकतर्फी निर्णय घेतला. पीसीबी आणि पाकिस्तान सरकारने सामन्यासाठी सुरक्षेचा पूर्ण बंदोबस्त केला होता. पीसीबी निर्धारित सामना खेळवण्यास तयार आहे. पण त्यांनी दौराच रद्द करण्याचा निर्णय घेतला. शेवटच्या मिनिटाला अशाप्रकारे सीरिज रद्द झाल्याने पाकिस्तान आणि जगभरातील क्रिकेटप्रेमी नाराज झाले आहेत”, अशी भूमिका पाकिस्तानकडून स्पष्ट करण्यात आली आहे.

हे ही वाचा

पाकिस्तानची नाचक्की! टॉसच्या अर्धा तास आधी न्यूझीलंडकडून सा्मना रद्द, पाकिस्तानविरोधात न खेळातच तातडीनं मायदेशी परतणार, नेमकं कारण काय?

रवी शास्त्रीनंतर येणाऱ्या प्रशिक्षकासाठी ‘हे’ असेल मोठं काम, कर्णधार बदलल्यानंतर प्रशिक्षकाचं काम वाढणार

(Pakistan vs New Zealand tour canceled due to security reasons)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.