रवी शास्त्रीनंतर येणाऱ्या प्रशिक्षकासाठी ‘हे’ असेल मोठं काम, कर्णधार बदलल्यानंतर प्रशिक्षकाचं काम वाढणार

टी-20 विश्वचषकानंतर विराट कोहली टी 20 संघाचं कर्णधारपद सोडणार आहे. त्याने नुकतीच सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली. यानंतर आता संघात आणखी काय बदल होणार हेही पाहावं लागेल.

रवी शास्त्रीनंतर येणाऱ्या प्रशिक्षकासाठी 'हे' असेल मोठं काम, कर्णधार बदलल्यानंतर प्रशिक्षकाचं काम वाढणार
विराट आणि रवी शास्त्री
Follow us
| Updated on: Sep 17, 2021 | 2:10 PM

मुंबई: भारतीय क्रिकेटमध्ये गुरुवारी (16 सप्टेंबर) एक मोठा बदल होणार असल्याची घोषणा झाली. भारताचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) टी 20 विश्वचषकानंतर (T20 World Cup) टी 20 संघाचं कर्णधारपद सोडणार असल्याची माहिती एका सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली. आता या बातमीनंतर अजून एका मोठ्या बातमीची येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ती म्हणजे भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचाही कार्यकाळ संपत आला असून तेही लवकरच पदावरुन पायउतार होणार आहेत. अशावेळी त्यांच्या जागी नव्याने येणाऱ्या प्रशिक्षकासाठी एक मोठं काम म्हणजे विराट आणि रोहित यांच्यात सामंजस्याचं नातं निर्माण करणं असणार आहे.

विराटने कर्णधारपद सोडताच रोहितला ही जबाबदारी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यातच विराट आणि रोहितमध्ये वाद असल्याच्या बातम्या अधूनमधून येतच असतात. अर्थात यात तत्थ असल्याची बातमी कधीच आलेली नाही. पण दोघेही अत्यंत वरीष्ट खेळाडू असल्याने दोघांचा खेळ आणि निर्णय यांचा विचार करत संघाची रणनीती आखणं हे येणाऱ्या प्रशिक्षकसाठी मोठं काम असणार आहे हे नक्की. विराटने अचानकपणे हा मोठा निर्णय घेतला असून यावरुन अनेक चर्चांना उधाण आलं आहे. अशावेळी भारताचे मुख्य निवडकर्ता संदीप पाटील (Sandeep Patil) यांनी एक मोठा खुलासा करत कोहली आणि बीसीसीआय़ (BCCI) यांच्यात तणावपूर्ण वातावरण असल्याचा खुलासा केला आहे. पाटील हे मुख्य निवडकर्ता असतानाच कोहलीला पहिल्यांदा कर्णधारपद मिळालं होतं.

रोहित शर्माकडे टी 20 चं कर्णधारपद पक्क?

विराटनंतर संघात कर्णधारपदासाठी सर्वाधिक चर्चा ही रोहित शर्माच्याच नावाची आहे. टीम इंडियाचा स्फोटक सलामीवीर अशी रोहित शर्माची ओळख आहे. रोहित शर्माने आयपीएलमध्ये जबरदस्त कॅप्टन्सी करुन, मुंबई इंडियन्सला सर्वाधिक 5 विजेतेपदं मिळवून दिली आहेत.

रोहित शर्मा भारताकडून 43 कसोटी सामने खेळला आहे. यामध्ये एका द्विशतकासह 8 शतकं आणि 14 अर्धशतकं त्याने ठोकली आहेत. तर रोहित शर्माने 227 वन डे सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 29 शतकं आणि 43 अर्धशतकं झळकावली आहेत. 3 द्विशतकं ठोकणारा रोहित हा एकमेव आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे.

हे ही वाचा :

IPL 2021 मध्ये आणखी एक धडाकेबाज फलंदाज, 18 चेंडूत 88 धावा करणारा ‘हा’ महारथी खेळणार कोणत्या संघातून?

Virat Kohli च्या राजीनाम्यानंतर ‘या’ दोन मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना संधी, संघाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी मिळणार?

विराट आणि बीसीसीआयमध्ये तणाव, माजी मुख्य निवडकर्ता संदीप पाटील यांचा खुलासा

(To maintain good relation in rohit and virat after captaincy change is Big work for new coach)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.