Womens T20i World Cup 2024 साठी टीम जाहीर, कॅप्टन बदलला
Womens T20i World Cup 2024: यूएईमध्ये येत्या काही आठवड्यांनंतर आयसीसी वूमन्स टी 20i वर्ल्ड कप 2024 स्पर्धेच्या थराराला सुरुवात होणार आहे. त्याआधी या स्पर्धेसाठी क्रिकेट बोर्डाने 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.

आयसीसी वूमन्स टी20I वर्ल्ड कप 2024 स्पर्धेचं आयोजन हे यूएईमध्ये होणार असल्याचं काही दिवसांपूर्वी निश्चित झालं आहे. त्याआधी या स्पर्धा बांगलादेशमध्ये आयोजित करण्यात आली होती. मात्र तेथील अराजकता आणि एकूणच वातावरणामुळे आयसीसीने स्पर्धा यूएईमध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला. तसेच आयसीसीने काही दिवसांआधी स्पर्धेचं वेळापत्रकही जाहीर केलं होतं. त्यांनतर अनेक क्रिकेट चाहत्यांना वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर केव्हा होणार? याची अपेक्षा होती. आता अखेर संघ जाहीर करण्याची सुरुवात झाली आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने वूमन्स टी 20I वर्ल्ड कपसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. पीसीबीने सोशल मीडियावरुन याबाबत माहिती दिली आहे. पीसीबीने टीममध्ये मोठा बदल केला आहे. पीसीबीने थेट कर्णधार बदलला आहे. पीसीबीने निदा डार हीला कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त केलंय. तर फातिमा सना हीला नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. निदाच्या नेतृत्वात पाकिस्तानचा नुकत्याच झालेल्या आशिया कप स्पर्धेत उपांत्य फेरीत पराभव झाला होता.
फातिमा सना हीच्याबाबत थोडक्यात
फातिम सना हीने आतापर्यंत पाकिस्तानचं 41 एकदिवसीय आणि 40 टी20I सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. फातिमला कर्णधारपदाचाही अनुभव आहे. तिने पाकिस्तानच्या एमर्जिंग संघाचं नेतृत्व केलंय. तसेच तिला देशांतर्गत क्रिकेटमध्येही कर्णधारपदाचा अनुभव आहे. फातिमाच्या नेतृत्वात पाकिस्तानने 2023 साली न्यूझीलंडला त्यांच्यात घरात पराभूत केलं होतं.
वूमन्स टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर
.@imfatimasana named Pakistan captain for ICC Women’s T20 World Cup 2024 🚨
Our squad for the marquee event 🇵🇰#BackOurGirls pic.twitter.com/NWoF6RmyVH
— Pakistan Cricket (@TheRealPCB) August 25, 2024
टी 20 वूमन्स वर्ल्ड कपसाठी पाकिस्तान टीम: फातिमा सना (कॅप्टन), आलिया रियाज, डायना बेग, गुल फिरोजा, इरम जावेद, मुनीबा अली (विकेटकीपर), नशरा सुंधू, निदा डार, ओमैमा सोहेल, सदफ शमास, सादिया इकबाल (फिटनेसवर आधरित ), सिदरा अमीन, सैयदा अरूब शाह, तस्मिया रुबाब आणि तुबा हसन.
ट्रॅव्हलिंग रिझर्व्ह : नजीहा अल्वी (विकेटकीपर)
नॉन ट्रॅव्हलिंग रिझर्व्ह – रमीन शमीम आणि उम्मे हानी
