AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

U19 World Cup : भारतीय क्रिकेट सुरक्षित आणि उज्जवल हातात, पंतप्रधान मोदींनी युवा खेळाडूंची पाठ थोपटली

भारतीय संघ आतापर्यंत 8 वेळा या स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. त्यापैकी 5 वेळा भारतीय संघाने चषक उंचावला आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

U19 World Cup : भारतीय क्रिकेट सुरक्षित आणि उज्जवल हातात, पंतप्रधान मोदींनी युवा खेळाडूंची पाठ थोपटली
Indian U19 cricket team (फोटो- BCCI)
| Edited By: | Updated on: Feb 06, 2022 | 10:25 AM
Share

मुंबई : भारताचा युवा संघ पुन्हा एकदा अंडर 19 क्रिकेटमध्ये (ICC under 19 world cup) वर्ल्ड चॅम्पियन बनला आहे. अँटिंग्वाच्या सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात यश धुलच्य़ा (Yash Dhull) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या अंडर 19 टीमने इंग्लंडचा चार विकेट आणि 14 चेंडू राखून पराभव केला. इंग्लंडने भारतासमोर विजयासाठी 190 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. भारताच्या युवा टीमने कुठलाही धोका न पत्करता संयमाने फलंदाजी करत हे लक्ष्य पार केलं. 19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेवर भारतीय संघाचं नेहमीच वर्चस्व राहिलं आहे. भारतीय संघ आतापर्यंत 8 वेळा या स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. त्यापैकी 5 वेळा भारतीय संघाने चषक उंचावला आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान, युवा टीम इंडियाचं कौतुक करणाऱ्यांमध्ये आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Narendra Modi) भर पडली आहे. त्यांनीदेखील युवा भारतीय खेळाडूंचं कौतुक केलं आहे.

भारताने 19 वर्षांखालील विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवून आपला प्रवास सुरू केला. त्यानंतर आयर्लंड, युगांडा, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या संघांना पराभूत करत विजेतेपद मिळवलं. अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा 4 विकेट्सने पराभव केला. संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाने एकही सामना गमावला नाही.

भारतीय क्रिकेट सुरक्षित आणि उज्वल हातात : पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युवा भारतीय खेळाडूंचं कौतुक केलं आहे. त्यांनी ट्विट करून सर्व खेळाडूंचे विजयाबद्दल अभिनंदन केले. ट्विटमध्ये त्यांनी लिहिले आहे की, “आम्हाला आमच्या युवा खेळाडूंचा अभिमान आहे. अंडर 19 वर्ल्ड कप जिंकल्याबद्दल आम्ही त्याचे अभिनंदन करतो. संपूर्ण स्पर्धेत त्यांनी अप्रतिम कामगिरी केली. या कामगिरीच्या जोरावर त्यांनी सर्वांची मनं जिंकली. त्यांची ही कामगिरी दाखवते की भारतीय क्रिकेटचे भविष्य सुरक्षित आणि उज्वल हातात आहे.”

सहवाग म्हणाला, ‘यहां जलवा है हमारा’

पंतप्रधान नरेंद्र मोदींप्रमाणेच जगभरातील क्रिकेटपटूंनीही भारताच्या अंडर-19 संघाच्या यशाचे कौतुक केले आहे. यात पहिले नाव येते विरेंद्र सहवागचे, ज्याने एका वाक्यात संपूर्ण यशाचे वर्णन करताना म्हटलं आहे, ‘यहां जलवा है हमारा’

इयान बिशपने पाठ थोपटली

वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू इयान बिशपनेही भारताच्या अंडर-19 संघाच्या अप्रतिम कामगिरीचे कौतुक केले आहे. त्याच्या व्यतिरिक्त, क्रिकेटपटू उन्मुक्त चंद ज्याने भारताला 2012 मध्ये अंडर-19 चॅम्पियन बनवले, त्याने देखील सध्याच्या संघाला त्यांच्या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या.

इतर बातम्या

ICC U19 World Cup : संपूर्ण स्पर्धेत भारतीय गोलंदाजांचा दबदबा, प्रत्येक संघ 200 धावांच्या आत गुंडाळला

Raj Bawa : राज बावाच्या तुफानी स्पेलनं इग्लंडचं कंबरडं मोडलं, पाकिस्तानच्या खेळाडूच्या रेकॉर्डलाही मागं टाकलं

Raj Bawa Ravi Kumar : राज बावा रविकुमार यांच्या जोडीनं विजयाचा पाया रचला, निशांत सिंधूनं कळस चढवला

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.