PBKS vs RR: पंजाब किंग्सच्या अर्शदीपचा ‘पंच’, अशी कामगिरी करणारा दुसराच खेळाडू

पंजाब विरुद्ध राजस्थान यांच्यातील सामन्यात राजस्थानने उत्तम सुरुवात केली होती. पण पंजाबचा युवा खेळाडू अर्शदीपने अखेरच्या षटकात उत्कृष्ट गोलंदाजी करत राजस्थानला 185 धावांत सर्वबाद केलं.

PBKS vs RR: पंजाब किंग्सच्या अर्शदीपचा 'पंच', अशी कामगिरी करणारा दुसराच खेळाडू
अर्शदीप सिंग
Follow us
| Updated on: Sep 21, 2021 | 10:41 PM

दुबई: आयपीएलच्या स्पर्धेत दुबईमध्ये राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि पंजाब किंग्स (Punjab Kings) या दोन संघात सामना सुरु आहे. दोन्ही संघानी पर्वाची सुरुवात या सामन्याने केली आहे. सामन्यात पंजाबने नाणेफेक जिंकत गोलंदाजी निवडली. पण राजस्थानचे सलामीवीर यशस्वी जैसवाल आणि एविन लुईस यांनी उत्तम सुरुवात करत पंजाबचा निर्णय़ चूकीचा असल्याचते भासवले. पण अखेरच्या काही षटकात पंजाबचा युवा गोलंदाज अर्शदीप सिंगने (Arshdeep Singh) उत्तम गोलंदाजी करत 5 विकेट खिशात घातले. दरम्यान या सामन्यात त्याने एक उत्तम रेकॉर्डही नावे केला अशी कामगिरी करणारा तो दुसराच खेळाडू ठरला आहे.

अर्शदीपने सामन्यात 32 धावा देत 5 विकेट मिळवले. अर्शदीपने संघाला सर्वात पहिलं यश मिळवून देत एविन लुईसला बाद केलं. त्यानंतर महत्त्वाचे असे लियम लिव्हिंगस्टोन, महिपाल लोमरोर यांच्या विकेट घेत संघाला मोठं यश मिळवून दिलं. अखेर शेवटच्या षटकात साकरिया आणि कार्तिक त्यागी यांना बाद करत त्याने एका सामन्यात पाच विकेट्स मिळवण्याचा सन्मान स्वत:च्या नावे केला.

अशी कमाल करणारा दुसरा युवा गोलंदाज

अर्शदीप सिंग अशी कामगिरी करणारा दुसराच युवा भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याने ही कामगिरी करताना त्याचं वय 22 वर्ष 228 दिवस इतकं होत. त्याच्या आधी हा रेकॉर्ड जलदगतीने जयदेव उनाडकटने स्वत:च्या नावे केला आहे. जयदेवने 21 वर्ष 204 दिवस इतकं वय असताना 2013 च्या आयीपीएलमध्ये दिल्लीविरुद्ध हा रेकॉर्ड केला होता. या दोघांशिवाय अंकित राजपूत (5/14), वरुण चक्रवर्ती (5/20) आणि हर्षल पटेल (5/27) यांनीही ही कामगिरी केली आहे.

IPL 2021 मध्ये पाच विकेट पटकावणारे गोलंदाज

  • हर्षल पटेल विरुद्ध मुंबई इंडियन्स
  • आंद्रे रस्सेल विरुद्ध मुंबई इंडियन्स
  • अर्शदीप सिंग विरुद्ध राजस्थान रॉयल्स

हे ही वाचा

इंग्लंडचा पाकिस्तान दौरा रद्द झाल्याचा IPL ला फायदा, चेन्नई सुपरकिंग्सचा संघ सर्वात आनंदी

IPL 2021: धोनी-रोहितला मागे टाकत कोहलीच्या नावे नवा रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू

वीरेंद्र सेहवागने उधळली स्तुतीसुमने, एमएस धोनीचा केला उदो उदो, म्हणाला…

(Punjab kings arshdeep singh became youngest indian to take 5 wicket in an innings of ipl)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.