AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयपीएल निवृत्तीबाबत अखेर अश्विनने मौन सोडलं, खरं कारण आणि का ते सांगून टाकलं

टीम इंडियाचा माजी दिग्गज क्रिकेटपटू याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकल्यानंतर आता आयपीएल स्पर्धेतूनही निवृत्ती घेतली आहे. त्याच्या या निर्णयामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. असं अचानक निवृत्ती जाहीर करण्याचं कारण काय? असे एक ना अनेक प्रश्न समोर आले. पण त्यावरचा पडदा स्वत: आर अश्विनने दूर केला.

आयपीएल निवृत्तीबाबत अखेर अश्विनने मौन सोडलं, खरं कारण आणि का ते सांगून टाकलं
आयपीएल निवृत्तीबाबत अखेर अश्विनने मौन सोडलं, खरं कारण आणि का ते सांगून टाकलंImage Credit source: PTI
| Updated on: Aug 29, 2025 | 3:32 PM
Share

भारताचा माजी क्रिकेटपटू आर अश्विनने आयपीएल कारकिर्दीला पूर्णविराम लावला आहे. अचानकपणे त्याने सोशल मीडियावरून निवृत्तीची घोषणा केली. त्यामुळे चाहत्यांना धक्का बसला. आयपीएल स्पर्धा खेळण्यास तसा काही आर अश्विनला अडसर नव्हता. पण मागच्या पर्वात त्याची कामगिरी काही खास राहिली नव्हती. चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना त्याने 9 सामन्यात फक्त 7 विकेट घेतल्या होत्या. तसेच फलंदाजीतही काही खास करू शकला नाही. पण एका स्पर्धेच्या कामगिरीवर आर अश्विनचं मूल्यमापन करणं कठीण आहे. यावरून क्रीडाप्रेमींची चर्चा सुरु झाली आहे. असं असताना आर अश्विनने या सर्व चर्चांना पूर्णविराम लावला आहे. अचानक निवृत्ती घेण्याचं कारण त्याने स्पष्ट केलं आहे. त्याने त्याच्या युट्यूब चॅनेलवर याबाबत खुलसा केला आहे. त्यामुळे त्याच्या निवृत्तीचं खरं कारण काय ते क्रीडाप्रेमींना कळलं आहे.

आर अश्विन निवृत्ती घेण्यापूर्वी वेगळ्या चर्चांचा फड रंगला होता. तेव्हा आर अश्विनने फ्रेंचायझीकडे रिलीज करण्याची मागणी केल्याची चर्चा होती. तसेच पुढच्या पर्वात वेगळ्या फ्रेंचायझीकडून खेळताना दिसू शकतो. पण आर अश्विन त्या आधीच निवृत्ती जाहीर केली. आर अश्विनने सांगितलं की, आता तीन महिने चालणाऱ्या आयपीएल स्पर्धेत खेळू शकणार नाही. माझं शरीर आता मला तशी साथ देत नाही. आयपीएलमध्ये खेळण्यासाठी पूर्ण फिट असणं गरजेचं आहे. मी आता तितकी मेहनत करू शकणार नाही.

आर अश्विनने पुढे सांगितलं की, तीन महिन्यांची आयपीएल स्पर्धा माझ्या दृष्टीने खूप जास्त आहे. थकवणारी आहे. हेच एक कारण आहे की मी महेंद्रसिंह धोनीसारख्या खेळाडूला पाहून आश्चर्यचकीत होतो. आता आर अश्विनने भविष्याच्या दृष्टीने आपले पत्तेही ओपन केले आहेत. विदेशी लीग स्पर्धेत खेळण्यास उपलब्ध असेल असं सांगितलं. त्यामुळे आर अश्विन भविष्यात द हंड्रेड लीग आणि दक्षिण अफ्रिकन लीग स्पर्धेत खेळताना दिसू शकतो. तसे त्याने संकेत देखील दिले आहेत. आर अश्विनने सांगितलं की, एका लीगसाठी नोंदणी केली आहे. विदेशात होणाऱ्या टी20 स्पर्धेत खेळण्यास तयार आहे.

बाळासाहेबांच्या 13 व्या स्मृतीदिनी शिवाजी पार्कात शिवसैनिकांची गर्दी
बाळासाहेबांच्या 13 व्या स्मृतीदिनी शिवाजी पार्कात शिवसैनिकांची गर्दी.
भाजपनं चंद्रावर कॉलनी काढली...आदित्य ठाकरेंच्या टोमण्यावर भाजपचं उत्तर
भाजपनं चंद्रावर कॉलनी काढली...आदित्य ठाकरेंच्या टोमण्यावर भाजपचं उत्तर.
लालूंच्या घरात चाललंय काय? तेजस्वी यादव-रोहिणी आचार्य यांच्यात भांडण
लालूंच्या घरात चाललंय काय? तेजस्वी यादव-रोहिणी आचार्य यांच्यात भांडण.
भाजपचे शरद पवार दादांच्या गटात, 5 वर्षात 5 पक्ष फिरुन पुन्हा भाजपवासी
भाजपचे शरद पवार दादांच्या गटात, 5 वर्षात 5 पक्ष फिरुन पुन्हा भाजपवासी.
इंदुरीकरांचं चॅलेंज अन् गुड्डीवरून डबेवालाकडून इशारा,..तर जाब विचारणार
इंदुरीकरांचं चॅलेंज अन् गुड्डीवरून डबेवालाकडून इशारा,..तर जाब विचारणार.
माझ्या ऐवजी विरोधकांनी...; जयंत पाटलांचं मोठं विधान
माझ्या ऐवजी विरोधकांनी...; जयंत पाटलांचं मोठं विधान.
ठाकरेंनी येऊन कलादालन बघावं! प्रताप सरनाईकांचं निमंत्रण
ठाकरेंनी येऊन कलादालन बघावं! प्रताप सरनाईकांचं निमंत्रण.
त्यांची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा विखे पाटलांना टोला
त्यांची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा विखे पाटलांना टोला.
वांद्र्यातल्या किल्ल्यावर पार्टी, अखिल चित्रेंकडून व्हिडीओ टि्वट!
वांद्र्यातल्या किल्ल्यावर पार्टी, अखिल चित्रेंकडून व्हिडीओ टि्वट!.
सुप्रिया सुळे यांच्याकडून नवले पूल अपघातस्थळाची पाहणी
सुप्रिया सुळे यांच्याकडून नवले पूल अपघातस्थळाची पाहणी.