AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तू अपमान का करत आहेत? रविचंद्रन अश्विन ऋषभ पंतवर भडकला, म्हणाला…

आयपीएल 2025 स्पर्धेतील 70 व्या सामन्यात घडलेला प्रकार अजून शमताना दिसत नाही. दिग्वेश राठीने मंकडिंग अपील केल्यानंतर लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंतने ती मागे घेतली. या निर्णयावर टीम इंडियाचा माजी खेळाडू रविचंद्रन अश्विनने संताप व्यक्त केला आहे.

तू अपमान का करत आहेत? रविचंद्रन अश्विन ऋषभ पंतवर भडकला, म्हणाला...
दिग्वेश राठी आणि आर अश्विनImage Credit source: TV9 Network
| Updated on: May 29, 2025 | 4:46 PM
Share

आयपीएल 2025 स्पर्धेच्या 70व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने लखनौ सुपर जायंट्सला पराभूत करून टॉप 2 मध्ये एन्ट्री घेतली. पण या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सच्या दिग्वेश राठीने लक्ष वेधून घेतलं. आरसीबी विरुद्धचा सामना जिंकण्यासाठी त्याने नॉन स्ट्रायकर एंडला असलेल्या जितेश शर्माला मंकडिंग पद्धतीने बाद केलं. यानंतर त्याने अपील केली पण कर्णधार ऋषभ पंतने अपील मागे घेण्यास भाग पाडलं. कर्णधार ऋषभ पंतच्या या कृतीचे काही जण कौतुक करत आहेत. पण आयसीसीच्या नियमांनुसार, मंकडिंग धावबाद होऊ शकतो. इथे सगळं नियमांनुसार घडलं. यावेळी गोलंदाजाला आधार देणे हे कर्णधाराचे कर्तव्य असतं. खेळ भावनेच्या नावाखाली सर्वांसमोर एखाद्याचा अपमान करणे किती योग्य आहे असा प्रश्न माजी क्रिकेटपटू आर अश्विनने उपस्थित केला आहे. लाखो लोकांसमोर एका तरुण खेळाडूची बदनामी केली, हे सगळं थांबवा. आपण इतरांसोबत असे करतो का? गोलंदाज तुम्हाला लहान का वाटतो? अश्विनने ऋषभ पंतच्या या कृतीवर टीका केली.

दिग्वेश राठीच्या मंकडिंग रनआउट प्रकरणावर आर अश्विन त्याच्या यूट्यूब चॅनलवर व्यक्त झाला. आर अश्विनने म्हटले आहे की, “दिग्वेश राठी माझा नातेवाईक नाही, तो कोण आहे हे मला माहित नाही. पण मला असे म्हणायचे आहे की ऋषभ पंतने घेतलेल्या निर्णयाचा गोलंदाजावर वाईट परिणाम होतो.” गोलंदाजाची कोणीही पर्वा करत नाही. त्यांचे अपील का मागे घ्यावे? लाखो लोकांसमोर त्यांचा अपमान का व्हावा? दिग्वेश राठी यांनी नियमांनुसार रनआउटसाठी अपील केले होते, असा प्रश्नही आर अश्विनने उपस्थित केला.

दिग्वेश राठी आणि वाद

दिग्वेश राठी आयपीएल 2025 स्पर्धेत चर्चेत राहीला. पहिल्याच आयपीएल स्पर्धेत त्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. गोलंदाजी चांगली करतो पण विचित्र सेलिब्रेशनने सर्वांच लक्ष वेधून घेतलं. दिग्वेश राठीला तीन सामन्यात दंड ठोठावण्यात आला. त्याच्या सामना फी मधून वसुली करण्यात आली आहे. तसेच एका सामन्यासाठी बंदीही घालण्यात आली होती. दिग्वेश राठीने 13 सामन्यात 14 विकेट घेतल्या आहेत. यावेळी त्याचा इकोनॉमी रेट हा 8.25 इतका आहे.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.