Ind vs Pak : भारताच्या त्रिकुटाची शिकार, भल्या-भल्यांच्या केल्या बत्त्या गुल, आफ्रिदी ठरलाय सक्सेसफुल!

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना चांगलाच रंगलाय. भारताचा संघ पाकिस्तानवर भारी पडणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र सध्या परिस्थिती भारतासाठी अनुकूल नसल्याचे दिसतेय. कारण भारतेच अव्वल दर्जाचे तीन फलंदाज अगदीच सहज बाद झाले आहेत.

दुबई : टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होतोय. या सामन्यात कोण बाजी मारणार याची सर्वांनाच उत्सूकता लागली आहे. पाकिस्ताने श्रेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र भारताची खराब सुरुवात झाली आहे. पहिल्या दोन षटकात भारताने चक्क दोन गडी गमावले आहेत. तर एकूण पाच षटकात भारताचे चक्क तीन गडी तंबूत परतले आहेत.

रोहित शर्म शून्यावर बाद झाला

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना चांगलाच रंगलाय. भारताचा संघ पाकिस्तानवर भारी पडणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र सध्या परिस्थिती भारतासाठी अनुकूल नसल्याचे दिसतेय. कारण भारतेच अव्वल दर्जाचे तीन फलंदाज अगदीच सहज बाद झाले आहेत. रोहित शर्म शून्यावर बाद झाला आहे. तर के.एल. राहूलने फक्त तीन धावा केल्या आहेत. या दोन्ही शिलेदारांना दुहेरी आकडादेखील गाठता आलेला नाही. तसेच सूर्यकुमार यादवदेखील 11 धावांवर झेलबाद झाला आहे. भारताच्या अशा सुरुवातीमुळे सामन्यात पुढे काय होणार असा प्रश्न सर्वांनाच पडलाय. क्रिकेटच्या चाहत्यांची धाकधूक वाढली आहे.

भारतीय संघात आतापर्यंत कुणाच्या किती धावा?

भारतीय संघाची आजची सुरुवातच खराब झाली. भारताचा मातब्बर खेळाडू सलामीवीर रोहित शर्मा आज पहिल्याच षटकात शुन्यावर बाद झाला. त्यापाठोपाठ के एल राहुल हा क्लिन बोल्ड झाला. दोघांना पाकिस्तानचा गोलंदाज शाहीन आफ्रिदी याने आऊट केलं. त्यानंतर मैदानावर कर्णधार विराट कोहली आणि सुर्यकुमार यादव दोघांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे सूर्यकुमार चांगल्याच जोशात आला होता. त्याने एक चौकार आणि षटकार लगावला. पण सूर्यकुमार अखेर हसन अलीच्या चेंडूवर झेलबाद झाला. रिझवानने त्याचा झेल टिपला आणि भारताचा तिसरा गडी तंबूत परतला. सूर्यकुमारने 8 चेडूत 11 धावा केल्या. त्यानंतर भारताचा तरुण तडफदार खेळाडू ऋषभ पंत विराटला साथ देण्यासाठी मैदानावर दाखल झाला.

इतर बातम्या :

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी करणार का? हार्दिक पंड्या म्हणाला…

T20 WC, India vs Pakistan : पाकिस्तानचा आफ्रिदी भारताला खतरनाक नडला, दोन्ही सलामीवीरांना घातक ठरला, रोहित पायचित, तर राहुलचा त्रिफळा

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI