Rohit Sharma : इथेही तिच परिस्थिती, रोहितचा फ्लॉप शो कायम, रणजी ट्रॉफीतही ढेर, पाहा व्हीडिओ
Ranji Trophy Mumbai vs Jammu-Kashmir : अनुभवी फलंदाज रोहित शर्मा रणजी ट्रॉफीतही ढेर झाला आहे. रोहितला जम्मू काश्मिरविरुद्ध दुहेरी आकडाही गाठता आला नाही.

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात धावांसाठी संघर्ष करावा लागला. रोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कर्णधार आणि फलंदाज म्हणून अपयशी ठरला. टीम इंडियाच्या या मालिका पराभवानंतर बीसीसीआय डोळे वटारले आणि खेळाडूना देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्यास सांगितलं. त्यानुसार रोहित शर्मा आणि इतर खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये कमबॅक केलं. रोहितने तब्बल 10 वर्षांनंतर जम्मू काश्मिरविरुद्धच्या सामन्यातून डोमेस्टिक क्रिकेटमध्ये कमबॅक केलं. त्यामुळे रोहितकडून चाहत्यांना अनेक आशा होत्या. पण कसलं काय?रोहितने इथेही तेच केलं जे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केलं. रोहित इथेही अपयशी ठरला आणि स्वस्तात माघारी परतला. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांची घोर निराशा झाली.
रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या यंदाच्या हंगामातील दुसऱ्या टप्प्याला 23 जानेवारीपासून सुरुवात झाली. मुंबईने बीकेसी येथील मैदानात जम्मू-काश्मिरविरुद्ध टॉस जिंकला. कर्णधार अजिंक्य रहाणे याने बॅटिंगचा निर्णय घेतला. यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा हीच जोडी मुंबईसाठीही ओपनिंग करणार असल्याने चाहते उत्सूक होते. मात्र अवघ्या काही मिनिटांतच निराशा झाली. जम्मू-काश्मिरने तिसऱ्याच ओव्हरमध्ये मुंबईला पहिला झटका दिला. यशस्वी जयस्वाल 4 धावांवर आऊट झाला. यशस्वी आऊट झाल्यानंतर रोहित शर्मा काही चेंडू खेळला आणि मैदानाबाहेरचा रस्ता धरला. उमर नझीर रोहितला कॅप्टन पारस डोगरा याच्या हाती कॅच आऊट केलं. रोहित 19 बॉलमध्ये 3 रन्स करुन आऊट झाला.
रोहित शर्मा खेळणार असल्याने क्रिकेट चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती. मात्र रोहित आऊट होताच क्रिकेट चाहतेही मैदान परिसरातून निघून गेले. रोहित आऊट झाल्याने मुंबईची स्थिती 5.5 ओव्हरमध्ये 2 आऊट 12 रन्स अशी झाली.
हिटमॅन रोहित शर्मा ढेर
@itsmihir412 pic.twitter.com/PXawxTr7Wi
— stuud (@stuud18) January 23, 2025
मुंबई प्लेइंग ईलेव्हन : अजिंक्य रहाणे (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), शिवम दुबे, शार्दुल ठाकुर, शम्स मुलानी, तनुष कोटीयन, मोहित अवस्थी आणि कर्ष कोठारी.
जम्मू-काश्मीर प्लेइंग ईलेव्हन : पारस डोगरा (कॅप्टन), शुभम खजूरिया, विवरांत शर्मा, अब्दुल समद, कन्हय्या वधावन (विकेटकीपर), औकिब नबी डार, यावर हसन, युद्धवीर सिंह चरक, आबिद मुश्ताक, उमर नझीर मीर आणि वंशज शर्मा.