AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 WC, Ind vs Pak सामन्यात जाडेजा फेल, हार्दिक दुखापतग्रस्त, कोण निभावणार फिनिशरची भूमिका?

केएल राहुल आणि रोहित शर्माची सलामीची जोडी पाकिस्तानविरुद्ध काही चमत्कार करू शकली नाही. दोन्ही फलंदाज स्वस्तात बाद झाले, तेव्हा भारतीय संघाची फलंदाजी पूर्णपणे डगमगलेली दिसत होती.

T20 WC, Ind vs Pak सामन्यात जाडेजा फेल, हार्दिक दुखापतग्रस्त, कोण निभावणार फिनिशरची भूमिका?
Ravindra Jadeja and Hardik pandya
| Edited By: | Updated on: Oct 25, 2021 | 4:18 PM
Share

मुंबई : टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये (T20 World Cup 2021) भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी एकतर्फी लढाई पाहायला मिळाली. हा सामना पाकिस्तानने अगदी सहज खिशात घातला. उत्कृष्ट खेळाचं दर्शन घडवत पाकिस्तान संघाने 10 विकेट्सनी दमदार विजय मिळवला. या सामन्यात भारताची सलामीची जोडी सपशेल अपयशी ठरल्याने मधली फळी दबावात होती. तरीही विराट कोहली आणि ऋषभ पंतने कसाबसा भारताचा डाव सावरला. मात्र फिनिशर म्हणून संघात स्थान मिळवलेले हार्दिक पंड्या आणि रवींद्र जाडेजादेखील अपयशी ठरले. (Ravindra Jadeja fail and hardik pandya injured in Ind vs Pak match who will play role of finisher in squad?)

केएल राहुल आणि रोहित शर्माची सलामीची जोडी पाकिस्तानविरुद्ध काही चमत्कार करू शकली नाही. दोन्ही फलंदाज स्वस्तात बाद झाले, तेव्हा भारतीय संघाची फलंदाजी पूर्णपणे डगमगलेली दिसत होती.

हार्दिक पंड्याला पाकिस्तानविरुद्ध दुखापत झाल्याने टीम इंडिया आता संकटात आहे. फलंदाजी करताना चेंडू त्याच्या खांद्याला लागला, त्यानंतर त्याला त्याचे स्कॅन करून घ्यावे लागले. अशा स्थितीत तो पुढील सामन्यात खेळेल की नाही हे अद्याप निश्चित नाही. पण पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पंड्या कोणताही मोठा पराक्रम करू शकला नाही, जे त्याच्याकडून अपेक्षित होते.

कर्णधार विराट कोहलीने रवींद्र जाडेजाला हार्दिक पंड्याच्या आधी वरच्या क्रमांकावर खेळवले, मात्र या भूमिकेत रवींद्र जडेजा पाकिस्तानविरुद्ध अपयशी ठरला आणि अवघ्या 13 चेंडूत 13 धावा करू शकला. अशा परिस्थितीत, हा फलंदाजी क्रम योग्य होता का? असा प्रश्न उद्भवतो, कारण शेवटच्या षटकात एका फलंदाजाची गरज असते जो वेगवान धावा करू शकतो आणि सामना फिनिश करु शकतो.

दरम्यान, आता असा प्रश्न उपस्थित केला जात आहे की हार्दिक पंड्या खेळला नाही तर त्याच्या जागी इशान किशनला संधी मिळेल का? कारण इशान किशन आयपीएलमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये होता, पण तो एक सलामीवीर आहे. अशा परिस्थितीत जर विराट कोहलीला संघात फक्त स्पेशलिस्ट फलंदाज खेळवायचे असतील तर तो तळाशी स्थान मिळवू शकेल का?

भारताचा दारुण पराभव

अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात सुरुवातीलाच खराब सुरुवात आणि सुमार फलंदाजीमुळे भारतीय संघ पराभूत झाला. आधी खराब फलंदाजीमुळे केवळ 151 धावा भारताने केल्या. ज्यानंतर पाकिस्तान संघाने अप्रतिम अशी फलंदाजी करत सामना 10 विकेट्सने खिशात घातला. विशेष म्हणजे पाकच्या दोन्ही सलामीवीरांनी अर्धशतकं ठोकली.

भारताची अत्यंत सुमार फलंदाजी

सर्वात आधी पाकिस्तानने नाणेफेक जिंकली त्यामुळे जिंकणारा संघ निवडेल अशी गोलंदाजीच त्यांनी निवडली. ज्यानंतर भारतीय फलंदाज मैदानात आले. यामध्ये फलंदाजीची सर्वाधिक मदार असलेल्या सलामीवीर रोहित आणि राहुल यांनी अवघे 0 आणि 3 रन केले. संपूर्ण सामन्यात विराट आणि ऋषभने केवळ झुंज दिली. यात कोहलीने 57 आणि पंतने 39 धावा केल्या. त्यानंतर कोणालाच खास कामगिरी करत आल्याने संपूर्ण संघाचा डाव 151 धावांवर 20 ओव्हरमध्ये आटोपला.

पाकिस्तानचा दमदार विजय

152 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या पाकिस्तानने सुरुवातीपासूनच फलंदाजीमध्ये एक वेगळाच क्लास दाखवला. दोन्ही सलामीवीर बाबर आजम आणि रिजवान यांनी उत्कृष्ट अर्धशतक झळकावली. बाबरने 52 चेंडूत 68 धावा केल्या. तर रिजवानने 55 चेंडूत 79 धावा केल्या. भारताच्या एकाही गोलंदाजाला खास तर नाही किमान सुमार गोलंदाजीही करता आली नाही. एकही विकेट न घेता आल्याने भारताचा 10 विकेट्सनी लाजिरवाणा पराभव झाला आहे.

इतर बातम्या

India vs Pakistan : पाकिस्तानी खेळाडू आणि विराटच्या मिठीची जगभर चर्चा, Video तुफान व्हायरल

India vs Pakistan T20 World Cup VIDEO | रोहित शर्माच्या खेळीवरुन पत्रकाराचा खोचक प्रश्न, विराटने आधी रोखून पाहिलं, मग मान खाली घालून हसत सुटला

T20 World Cup 2021 मध्ये भारत-पाकिस्तान पुन्हा भिडू शकतात, वाचा कसा, कुठे होऊ शकतो आमना-सामना

(Ravindra Jadeja fail and hardik pandya injured in Ind vs Pak match who will play role of finisher in squad?)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.