आधी टॉपचा क्रिकेटर, आता ॲडल्ट साईटवर एन्ट्री, कोहलीच्या टीमशी नातं असलेल्या खेळाडूचा धक्कादायक निर्णय!
क्रिकेट हे असं क्षेत्र आहे, जिथे पैसाच पैसा आहे. नशीब उजडलं तर खेळात प्रसिद्धी आणि पैसा दोन्हींची अक्षरश: बरसात होते. जगभरात असे काही क्रिकेटर होऊन गेले आहेत, ज्यांच्या पायाशी श्रीमंती अक्षरश: लोळण घेते. आयपीएलच्या माध्यमातून तर अनेक क्रिकेटपटूचं नशीबच बदलून गेलं. असे असले तरी एका मोठ्या क्रिकेटरने मोठा आणि धक्कादायक निर्णय घेतला आहे.

Tymal Mills : क्रिकेट हे असं क्षेत्र आहे, जिथे पैसाच पैसा आहे. नशीब उजडलं तर खेळात प्रसिद्धी आणि पैसा दोन्हींची अक्षरश: बरसात होते. जगभरात असे काही क्रिकेटर होऊन गेले आहेत, ज्यांच्या पायाशी श्रीमंती अक्षरश: लोळण घेते. आयपीएलच्या माध्यमातून तर अनेक क्रिकेटपटूचं नशीबच बदलून गेलं. असे असले तरी एका मोठ्या क्रिकेटरने मोठा आणि धक्कादायक निर्णय घेतला आहे. त्याने थेट ॲडल्ट साईटवर आपलं खातं खोललं आहे. त्याच्या या निर्णयामुळे जगभरात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
क्रिकेटपटूचा ॲडल्ट साईटवर येण्याचा निर्णय
मिळालेल्या माहितीनुसार आयपीएलच्या रॉयल चॅलेन्जस बंगळुरू संघाचा भाग राहिलेल्या टायमल मिल्स या नावाजलेल्या क्रिकेटपटूने एका ॲडल्ट साईटवर येण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे टायमल मिल्सने या साईटवर खातेही खोलले आहे. अशा प्रकारच्या साईटवर येणारा टायमल हा जगातील पहिलाच खेळाडू ठरला आहे. विशेष म्हणजे हा निर्णय घेतल्यानंतर त्याने याबाबतचं स्पष्टीकरणही दिलं आहे. या साईटवर आल्यानंतर तो तिथं नेमकं काय करणार आहे? याबाबत त्याने स्पष्टीकरणही दिलं आहे.
टायमल मिल्सने काय स्पष्टीकरण दिलंय?
हा निर्णय घेतल्यानंतर टायमल मिल्स याने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मी या साईटवर आलो असलो तरी एक हजार टक्के सांगतो की मी इथं ग्लॅमरस असं काहीही शेअर करणार नाही. माझ्या त्या खात्यावर फक्त क्रिकेट, लाईफस्टाईल या विषयांवरील कन्टेंट शेअर केला जाईल. माझ्यासाठी हे सर्वकाही नवे असू शकते. पण मी खूप उत्साहित आहे, असं त्याने स्पष्ट केले आहे.
ॲडल्ट साईटवर टायमल नेमकं काय करणार?
तसेच, मी ज्या साईटवर येण्याचा निर्णय घेतला आहे, तिथे काय चालते याची मला पूर्ण कल्पना आहे. मात्र मी माझ्या खात्यावर तसे काहीही करणार नाही, असेही मिल्स याने स्पष्ट केले आहे. ॲडल्ट साईटवरील खात्याच्या माध्यमातून टायमल त्याच्या फॅन्शसी जोडला जाणार आहे. तिथे तो क्रिकेटविश्वाच्या गप्पा करणार आहे. क्रिकेट सामन्यानंतर तसेच सामन्याच्या अगोदर खेळाडू माध्यमांशी बोलतात. माध्यमांशी बोलताना ते गोष्टी वाढवून सांगतात. मी माझ्या नव्या खात्याच्या माध्यमातून क्रिकेटबद्दल बोलणार आहे, असेही टायमल याने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, आता टायमल याच्या या नव्या प्रयोगाला किती प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
