RCB vs SRH Score Updates, IPL 2026: विराटची चाबूक खेळी, आरसीबाचा मोठा विजय, हैदराबादवर मात
Royal Challengers Bengaluru vs Sunrisers Hyderabad Indian Premier League Score Updates and Highlights In Marathi: गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने घरच्या मदैानात अर्थात एम चिन्नास्वामी स्टेडियमध्ये सनरायजर्स हैदराबादला पराभूत करत आयपीएल स्पर्धेतील 19 व्या पर्वात विजयी सलामी दिली.

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हे 2 संघ आमनेसामने होते. उभयसंघातील सामना बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला होता. दोन्ही संघात तोडीसतोड आणि विस्फोटक फलंदाज असल्याने चाहत्यांना हायस्कोअरिंग सामना पाहायला मिळाला. मात्र आरसीबीने घरच्या मैदानात बाजी मारत हैदराबादला पराभवाची धुळ चारली. कॅप्टन इशान किशन याच्या 80 धावांच्या जोरावर हैदराबादने आरसीबीला 202 धावांचं आव्हान दिलं होतं. आरसीबीने हे आव्हान विराट कोहली नाबाद 69 तर देवदत्त पडीक्कल याच्या 61 रन्सच्या जोरावर सहज पूर्ण केलं. आरसीबीने 15.4 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 203 धावा केल्या. आरसीबीने अशाप्रकारे हा सामना 6 विकेट्सने आपल्या नावावर केला.
LIVE Cricket Score & Updates
-
RCB vs SRH Live Score Updates, IPL 2026: आरसीबीचा 6 विकेट आणि 32 चेंडू राखून विजय
आरसीबीने आयपीएल 2026 स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा 6 गडी राखून पराभव केला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने 20 षटकात 9 गडी गमवून 201 धावा केल्या. तसेच विजयासाठी 202 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान आरसीबीने15.4 षटकात फक्त 4 गडी गमवून पूर्ण केलं. आरसीबीला या विजयासह 2 गुण आणि नेट रनरेट हा +2.907 इतका झाला आहे.
-
RCB vs SRH IPL 2026 Live Score Updates : W,W, हैदराबादची कमाल, आरसीबीला सलग 2 झटके
डेव्हीड पेन याने 13 व्या ओव्हरमध्ये आरसीबीला सलग 2 झटके देत हैदराबादला सामन्यात कमबॅक करुन दिलं आहे. पेनने ओव्हरमधील दुसऱ्या आणि तिसर्या बॉलवर रजत पाटीदार आणि त्याच्यानंतर जितेश शर्मा याला आऊट केलं.
-
-
RCB vs SRH IPL 2026 Live Score Updates : आरसीबीची सामन्यावर घट्ट पकड, हैदराबाद विरुद्ध जिंकणार?
आरसीबी 202 धावांचा पाठलाग करताना मजबूत स्थितीत आहे. आरसीबीने 12 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 162 धावा केल्या आहेत. त्यामुळे आरसीबीला विजयासाठी आणखी 40 धावांची गरज आहे. मैदानात विराट कोहली 46 आणि रजत पाटीदार 31 धावांवर खेळत आहेत.
-
RCB vs SRH IPL 2026 Live Score Updates : देवदत्त इम्पॅक्ट खेळी करुन आऊट, आरसीबी मजबूत स्थितीत
हैदराबादने आरसीबीच्या देवदत्त पडीक्कल या इम्पॅक्ट प्लेअरला आऊट करुन दुसरी विकेट मिळवली आहे. मात्र देवदत्तने त्याची भूमिका चोखपणे पार पाडली आहे. देवदत्तने तिसऱ्या स्थानी येऊन 26 बॉलमध्ये 61 धावांची खेळी केली.
-
RCB vs SRH IPL 2026 Live Score Updates : क्लासेनकडून घोडचूक, सेट विराटचा कॅच सोडला
हेन्रिक क्लासेन याने सेट विराट कोहली याचा सनरायजर्स हैदराबादला विकेटची गरज असताना निर्णायक क्षणी कॅच सोडला आहे. क्लासेनने विराटला 28 धावांवर जीवनदान दिलं आहे. आता ही चूक किती महागात पडणार? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.
-
RCB vs SRH IPL 2026 Live Score Updates : देवदत्त पडीक्कलची जोरदार फटकेबाजी, आरसीबीची अप्रतिम सुरुवात
हैदराहबादने आरसीबीला फिल सॉल्ट याच्या रुपात पहिला झटका दिला. त्यानंतर इम्रपॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या देवदत्त पडीक्कल याने विराट कोहली याच्यासह कमाल केलीा. देवदत्तच्या फटकेबाजीच्या जोरावर आरसीबीने 5 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 67 धावा केल्या. देवदत्त 34 आणि विराट 18 रन्सवर नॉट आऊट खेळत आहेत.
-
RCB vs SRH IPL 2026 Live Score Updates : आरसीबीला पहिला झटका, फिलीप सॉल्ट आऊट
जयदेव उनाडकट याने आरसीबीला पहिला झटका दिला आहे. जयदेवने फिलीपला हेन्रिक क्लासेन याच्या हाती 8 रन्सवर कॅच आऊट केलं. सॉल्ट आऊट झाल्यानंतर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून देवदत्त पडीक्कल मैदानात आला आहे.
-
RCB vs SRH IPL 2026 Live Score Updates : आरसीबीची बॅटिंग सुरु, विराट-सॉल्ट मैदानात, 202 धावांचं आव्हान
आरसीबीच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. आरसीबीकडून विराट कोहली आणि फिलीप सॉल्ट सलामी जोडी मैदानात आली आहे. सनहायजर्स हैदराबादने आरसीबीसमोर 202 धावांचं आव्हान अवघड आव्हान ठेवलं आहे.
-
RCB vs SRH IPL 2026 Live Score Updates : आरसीबीसमोर 202 धावांचं आव्हान, हैदराबाद रोखणार? कोण जिंकणार?
सनरायजर्स हैदराबादने गतविजेत्या आरसीबीसमोर 202 धावांचं आव्हान ठेवलं आहे. हैदराबादने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 201 धावा केल्या. हैदराबादसाठी कर्णधार ईशन किशन याने सर्वाधिक 80 धावांची खेळी केली. त्यामुळे आता आरसीबी या विजयी धावांचा पाठलगा करण्यात यशस्वी ठरणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
-
RCB vs SRH IPL 2026 Live Score Updates : फिल सॉल्टकडून कडक कॅच, इशानच्या शतकाची संधी हुकली
फिल सॉल्टने घेतलेल्या चाबूक कॅचमुळे इशान किशन याच्या शतकाची संधी हुकली आहे. सॉल्टने बाउंड्री लाईनजवळ इशानचा अप्रतिम एकहाती कॅच घेतला. इशानने 38 बॉलमध्ये 80 रन्सची वादळी खेळी केली.
-
RCB vs SRH IPL 2026 Live Score Updates : सलील अरोरा 9 रन्सवर आऊट, हैदराबादला पाचवा झटका
आरसीबीने हैदराबादला पाचवा झटका दिला आहे. सलील अरोरा याच्या रुपात हैदराबादने पाचवी विकेट गमावली. सलीलला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. सलीलने 9 धावांचं योगदान दिलं.
-
RCB vs SRH IPL 2026 Live Score Updates : फिल सॉल्टकडून जबरदस्त कॅच, क्लासेनच्या खेळीचा शेवट, हैदराबादला चौथा झटका
फिल सॉल्ट याने सीमारेषेवर अप्रतिम कॅच घेत हैदराबादची ईशान किशन आणि हेन्रिक क्लासेन ही सेट जोडी फोडली आहे. सॉल्टने कॅच घेत क्लासेनच्या खेळीचा शेवट केला. क्लासेनने 22 बॉलमध्ये 31 रन्स केल्या.
-
RCB vs SRH IPL 2026 Live Score Updates : कॅप्टन इशानने अर्धशतकानंतर गिअर बदलला, हैदराबाद मजबूत स्थितीत
कॅप्टन इशान किशन याने अर्धशतकानंतर गिअर बदलला आहे. तसेच इशानला हेन्रिक क्लासेन हा देखील चांगली साथ देत आहे. इशान आणि क्लासेन या जोडीने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर हैदराबादने 13 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 126 धावा केल्या आहेत. इशान 72 आणि क्लासेन 31 रन्सवर खेळत आहेत.
-
RCB vs SRH IPL 2026 Live Score Updates : क्लासेन-इशान जोडी जमली, कॅप्टन अर्धशतकाच्या उंबरठ्यावर
आरसीबीने हैदराबादला ठराविक अंतराने 3 झटके दिले. त्यानंतर हेनरिक क्लासेन आणि कॅप्टन इशान किशन जोडी जमली आहे. या दोघांनी हैदराबादला 11 ओव्हरपर्यंत 92 धावांपर्यंत पोहचवलं आहे. क्लासेन 22 आणि इशान 47 रन्सवर नॉट आऊट खेळत आहेत.
-
RCB vs SRH IPL 2026 Live Score Updates : नितीश कुमार रेड्डी आऊट, हैदराबादला तिसरा झटका, आरसीबीची जबरदस्त सुरुवात
आरसीबीने हैदराबादला तिसरा झटका दिला आहे. नितीश कुमार रेड्डी हा देखील अभिषेक शर्मा आणि ट्रेव्हीस हेड प्रमाणे कॅच आऊट होऊन मैदानाबाहेर गेला आहे. नितीशने 1 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला.
-
RCB vs SRH IPL 2026 Live Score Updates : अभिषेकनंतर ट्रेव्हीस हेड आऊट, हैदराबादची ओपनिंग जोडी आऊट
सनरायजर्स हैदराबादची सलामी जोडी 19 व्या पर्वातील पहिल्या सामन्यात अपयशी ठरली आहे. अभिषेक शर्मा 7 रन्सवर आऊट झाला. त्यानंतर ट्रेव्हीस हेड 11 धावांवर कॅच आऊट झाला. दोघेही कॅच आऊट झाले. त्यामुळे हैदराबादचा स्कोअर 3 ओव्हरनंतर 2 आऊट 23 असा झाला आहे.
-
RCB vs SRH IPL 2026 Live Score Updates : अभिषेक शर्मा 7 धावांवर आऊट, हैदराबादला पहिला झटका
आरसीबीने हैदराबादला पहिला झटका दिला आहे. ओपनर अभिषेक शर्मा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्ना कॅच आऊट झाला आहे. अभिषेकने 7 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला आहे. अभिषेकनंतर कॅप्टन इशान किशन मैदानात आला आहे.
-
RCB vs SRH IPL 2026 Live Score Updates : सामन्याला सुरुवात, हैदराबादची बॅटिंग, हेड-अभिषेक मैदानात
आरसीबी विरुद्ध सनराजयर्स हैदराबाद सामन्याला सुरुवात झाली आहे. आरसीबीने टॉस जिंकून 19 व्या मोसमातील पहिल्या सामन्यात हैदराबादला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. हैदराबादकडून ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा ही सलामी जोडी मैदानात आली आहे.
-
RCB vs SRH IPL 2026 Live Updates : सनरायजर्स हैदराबाद इम्पॅक्ट प्लेअर
सनरायजर्स हैदराबाद इम्पॅक्ट प्लेअर : शिवांग कुमार, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड पायने, स्मरण रवीचंद्रन आणि साकिब हुसेन.
-
RCB vs SRH IPL 2026 Live Updates : आरसीबी इम्पॅक्ट प्लेअर
आरसीबी इम्पॅक्ट प्लेअर : देवदत्त पडिक्कल, जेकब बेथेल, रसिक सलाम दार, कनिष्क चौहान, व्यंकटेश अय्यर
-
RCB vs SRH IPL 2026 Live Updates : सनरायजर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन
सनरायजर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : अभिषेक शर्मा, ट्रेव्हिस हेड, इशान किशन (कॅप्टन आणि विकेटकीपर), हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, नितीश कुमार रेड्डी, सलील अरोरा, हर्ष दुबे, हर्षल पटेल, जयदेव उनाडकट आणि एशान मलिंगा.
-
RCB vs SRH IPL 2026 Live Updates : आरसीबी प्लेइंग ईलेव्हन
विराट कोहली, फिलिप सॉल्ट, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (डब्ल्यू), टीम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, अभिनंदन सिंग, जेकब डफी आणि सुयश शर्मा.
-
RCB vs SRH IPL 2026 Live Updates : आरसीबीने टॉस जिंकला, हैदराबाद विरुद्ध बॉलिंगचा निर्णय
गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएल 2026 मोसमातील पहिल्याच सामन्यात टॉस जिंकला आहे. आरसीबीचा कॅप्टन रजत पाटीदार याने बॉलिंगचा निर्णय घेत राक्षसी आणि विक्रमी धावा करणाऱ्या सनरायजर्स हैदराबादला बॅटिंगसाठई भाग पाडलं आहे.
-
RCB vs SRH IPL 2026 Live Updates : सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता
टॉस होणार आहे. -
RCB vs SRH IPL 2026 Live Updates : हेड टु हेड रेकॉर्ड्स
आरसीबी विरुद्ध एसआरएच या दोन्ही संघ आयपीएल स्पर्धेत एकमेकांविरुद्ध 25 सामने खेळले आहेत. हैदराबादने या 25 पैकी 14 सामने जिंकले आहेत. तर बंगळुरुने 11 वेळा हैदराबादवर विजय मिळवला आहे.
-
RCB vs SRH IPL 2026 Live Updates : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीम
विराट कोहली, फिलिप सॉल्ट, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), टीम डेव्हीड, जितेश शर्मा (विकेटकीपर), क्रुणाल पंड्या, रोमॅरियो शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, सुयश शर्मा, जेकब डफी, जोश हेझलवूड, रसिक सलाम दार, व्यंकटेश अय्यर, मंगेश यादव, विहान मल्होत्रा, विकी ओस्तवाल, अभिनंदन सिंग, जेकब बेथेल, जॉर्डन कॉक्स, स्वप्नील सिंग, कनिष्क चौहान आणि सात्विक देसवाल.
-
RCB vs SRH IPL 2026 Live Updates : सनरायजर्स हैदराबाद टीम
इशान किशन (कॅप्टन आणि विकेटकीपर), अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, लियाम लिव्हिंगस्टोन, हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, नितीश कुमार रेड्डी, हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, हर्ष दुबे, एशान मलिंगा, शिवम मावी, स्मरण रविचंद्रन, जीशान अन्सारी, सलील अरोरा, कामिंदू मेंडिस, ब्रायडन कार्स, डेव्हिड पायने, प्रफुल्ल हिंगे, साकिब हुसेन, क्रेन फुलेत्रा, अमित कुमार, ओंकार तारमळे आणि शिवांग कुमार.
-
RCB vs SRH IPL 2026 Live Updates : सनरायजर्स हैदराबादसमोर आरसीबीचं आव्हान, सलामीच्या सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात
आयपीएल 19 व्या पर्वाला शनिवार 28 मार्चपासून सुरुवात होत आहे. या हंगामातील पहिल्या सामन्यात आरसीबी विरुद्ध एसआरएच भिडणार आहेत. आरसीबी डिफेंडिंग चॅम्पियन आहे. त्यामुळे आरसीबी या मोसमात विजयी सुरुवात करण्यात यशस्वी ठरणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.