6, 4, 6, 6, 6..! गुजरात टायटन्सविरुद्ध ऋषभ पंतचा धूमधडाका, टी20 वर्ल्डकपसाठी दावा मजबूत

आयपीएल 2024 स्पर्धेतील 40वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सुरु आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने कॅप्टन इनिंग खेळली. यासह त्याने टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी आपला दावा पक्का केला आहे.

6, 4, 6, 6, 6..! गुजरात टायटन्सविरुद्ध ऋषभ पंतचा धूमधडाका, टी20 वर्ल्डकपसाठी दावा मजबूत
Image Credit source: delhi capital twitter
Follow us
| Updated on: Apr 24, 2024 | 9:54 PM

आयपीएल 2024 स्पर्धा संपल्यानंतर लगेचच टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं बिगुल वाजणार आहे. 1 जूनपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडियाची निवड 30 एप्रिल किंवा 1 मे रोज होणार आहे. यासाठी आयपीएलमधील कामगिरीवर निवड समितीचं बारीक लक्ष लागून आहे. कोणता खेळाडू कशी कामगिरी करतो. तसेच त्याचा फॉर्म कसा आहे याची चाचपणी केली जात आहे. टी20 वर्ल्डकपसाठी विकेटकीपरच्या रेसमध्ये एक दोन नव्हे तर तीन दावेदार आहेत. यापैकी कोणाला संधी मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मुंबई इंडियन्सकडून खेळणारा इशान किशन, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन आणि दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत यांच्यात शर्यत आहे. तिघंही जबरदस्त फॉर्मात आहे. पण गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात ऋषभ पंतची खेळी पाहून त्याने टी20 वर्ल्डकपसाठी आपला दावा पक्का केला आहे. ऋषभ पंतने 43 चेंडूत 5 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने नाबाद 88 धावा केल्या. त्याची ही खेळी पाहून निवड समितीला निवड करणं आता सोपं जाणार आहे.

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने शेवटच्या षटकात 30 धावा ठोकल्या. मोहित शर्माला शेवटचं षटक सोपवलं होतं. पहिल्या चेंडूवर दोन धावा घेतल्या. त्यानंतर वाइड बॉल आला. दुसऱ्या चेंडूवर षटकार मारला. तिसऱ्या चेंडूवर चौकार मारला. त्यानंतर चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर उत्तुंग षटकार मारले. यासह ऋषभ पंतने ऑरेंज कॅपच्या शर्यतीत उडी घेतली आहे. विराट कोहली 379 धावांसह पहिल्या, ऋतुराज गायकवाड 349 धावांसह दुसऱ्या आणि ऋषभ पंत 342 धावांसह तिसऱ्या स्थानवर आहे.

गुजरात टायटन्सने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी स्वीकारली. दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकात 4 गडी गमवून 224 धावा केल्या आणि विजयासाठी 225 धावा दिल्या आहेत. आता दिल्ली कॅपिटल्सने दिलेलं आव्हान गुजरात टायटन्स कसं गाठतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): पृथ्वी शॉ, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाई होप, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, खलील अहमद, मुकेश कुमार.

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): रिद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल (कर्णधार), डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, शाहरुख खान, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, नूर अहमद, मोहित शर्मा, संदीप वॉरियर.

Non Stop LIVE Update
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक.
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार.
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?.
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल.
बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?
बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?.