Video: ऋषभ पंतने कुलदीपला क्रीजवरून ढकलले आणि स्टंपिंग केलं, पण…!
आयपीएल 2025 स्पर्धेतील दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामना स्मरणात राहणारा आहे. कारण या सामन्यातील विजय अशक्यप्राय दिसत होता. मात्र दिल्ली कॅपिटल्सने विजय मिळवला. असं असताना कर्णधार ऋषभ पंत आणि कुलदीप यादव यांच्यातील मजेदार विनोद व्हायरल झाला आहे.

आयपीएल 2025 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना पार पडला. हा सामना दिल्ली कॅपिटल्सने 1 गडी आणि 3 चेंडू राखून जिंकला. खरं तर हा सामना शेवटच्या षटकात कधी येथे तर कधी तिथे अशा स्थितीत होता. पण आशुतोष शर्माने विजयाचा घास लखनौ सुपर जायंट्सच्या घशातून खेचून आणला. असं असलं तरी या सामन्यात एक मनोरंजनक प्रकार घडला. दिल्ली संघाचा कर्णधार ऋषभ पंतने कुलदीप यादवसोबत केलेला एक मजेदार प्रकार आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या सामन्याच्या शेवटच्या टप्प्यात दबाव असताना ऋषभ पंतने त्याचा सहकारी कुलदीप यादवसोबत विनोदी प्रकार करून सर्वांना हसवले.लखनौचा गोलंदाज रवी बिश्नोई १८ व्या षटकात गोलंदाजी करत असताना ही घटना घडली.
बिश्नोईने टाकलेला चेंडू कुलदीप यादव खेळण्यासाठी गेला आणि चुकला. चेंडू यष्टिरक्षक ऋषभ पंतच्या हातात गेला आणि लगेच स्टंपिंग करण्याचा प्रयत्न केला. पण कुलदीप आधीच क्रीजवर पोहोचला होता. पण मैदानात थांबेल तर ना.. पंतने खेळकरपणे कुलदीपला क्रीजबाहेर ढकलण्याचा प्रयत्न केला. हे दृश्य कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाले आणि हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
— kuchnahi123@12345678 (@kuchnahi1269083) March 24, 2025
दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मिचेल मार्श (72) आणि निकोलस पूरन (75) यांनी जबरदस्त खेळी केली. यासह, लखनौ सुपर जायंट्स संघाने 20 षटकांत 210 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले. धावांचा पाठलाग करताना दिल्ली संघाला सुरुवातीला संघर्ष करावा लागला. अवघ्या 65 धावांवर पाच विकेट गमावल्या होत्या. पण आशुतोष शर्मा (66*) ने आपल्या शानदार खेळीने संघाला विजयाकडे नेले.
