चुकीला माफी नाही..! रोहित शर्मा पुन्हा एकदा तसाच फसला आणि नुकसान केलं, जाणून घ्या काय घडलं ते
India vs New Zealand: भारत न्यूझीलंड यांच्यात दुसरा वनडे सामना राजकोटमध्ये सुरु आहे. भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली आहे. पण या सामन्यातही रोहित शर्मा काही खास करू शकला. उलट आपल्या पायावर त्याच चुकीचा धोंडा मारून घेतला.

वनडे मालिका म्हंटलं तर रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या फॉर्मकडे नजरा लागलेल्या असतात. कारण आता हे दोन दिग्गज फक्त वनडे फॉर्मेट खेळत आहेत. या दोघांचं लक्ष्य पुढील वर्षी होणाऱ्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेकडे आहे. त्या दृष्टीने या दोघांची प्लानिंग सुरु आहे. पण असं असताना रोहित शर्मा मात्र काही चुका वारंवार करताना दिसत आहे. त्याचा फटका त्याला राजकोटमधील दुसऱ्या वनडे सामन्यात बसला. त्यामुळे त्याची त्याचा डाव फक्त 24 धावांवर आटोपला. या मालिकेत सलग दुसऱ्यांदा रोहित शर्मा फेल गेला. विशेष म्हणजे सेट झाल्यानंतर रोहित शर्मा विकेट फेकून गेला. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. कारण विकेट अशा चेंडूवर फेकली की चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. खरं तर रोहित शर्मा मैदानात सेट झाला की मोठी धावसंख्या करण्याची ताकद ठेवतो. पण वडोदरा आणि राजकोटमध्ये चित्र काही वेगळं होतं.
रोहित शर्मा राजकोटध्ये 37 चेंडूंचा सामना करत 24 धावा केल्या होत्या. पण क्रिस्टिन क्लार्कच्या चेंडूवर षटकार मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू काही बॅटच्या मधोमध बसला नाही. स्वीपर कव्हर उभ्या असलेल्या विल यंगने त्याचा सोपा झेल पकडला. हा फटका पाहून रोहित शर्मालाही आश्चर्याचा धक्का बसला. रोहित शर्मा कर्णधार असताना वेगाने फलंदाजी करत होता. मात्र आता पुन्हा एकदा धीमी सुरुवात करू लागला आहे. राजकोटमध्ये 11व्या चेंडूवर खातं खोललं. त्यानंतर चार चौकार मारले पण स्ट्राईक रेट सुधारला होता. पण मोठा फटका मारण्याच्या नादात विकेट देऊन बसला. त्याचा स्ट्राईक रेट हा 63.16चा होता. त्यामुळे टीकाकारांच्या रडारवर आला आहे.
रोहित शर्माची न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक षटकार मारण्याची संधी दुसऱ्यांदा हुकली आहे. रोहितने न्यूझीलंडविरूद्द 49 षटकार मारले आहेत. न्यूझीलंडविरूद्ध सर्वाधिक षटकार मारण्याच विक्रम पाकिस्तानच्या शाहीद आफ्रिदीच्या नावावर आहे. त्याने न्यूझीलंडविरूद्ध वनडे 50 षटकार मारले आहेत. दुसरीकडे, रोहित शर्मानंतर विराट कोहलीही या सामन्यात फार काही करू शकला नाही. त्याचा डावही 23 धावांवर आटोपला. त्याने 29 चेंडूत 2 चौकार मारत या धावा केल्या. रोहित शर्मा आणि विराट कोहली स्वस्तात बाद झाल्याने टीम इंडियावर दबाव वाढला आहे. मधल्या फळीवर मोठी धावसंख्या उभारण्याचं आव्हान आहे.