AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टी20 वर्ल्डकप 2024 साठी रोहित शर्माचा बीसीसीआयला स्पष्ट संदेश, जर तसं असेल तर…

वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम सामन्यात पराभूत झाल्याने सर्व कमावलं ते गमावलं असंच झालं. कर्णधार रोहित शर्मासह कोट्यवधी भारतीयांचा हिरमोड झाला. आता टीम इंडिया पुन्हा एकदा आयसीसी स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे. जून महिन्यात टी20 वर्ल्डकप होणार आहे. पण या स्पर्धेत रोहित शर्मा खेळणार की नाही? याबाबत प्रश्नचिन्ह आहे. आता बीसीसीआयच्या गोटातून एक माहिती समोर आली आहे.

टी20 वर्ल्डकप 2024 साठी रोहित शर्माचा बीसीसीआयला स्पष्ट संदेश, जर तसं असेल तर...
टी20 वर्ल्डकप 2024 साठी बीसीसीआयमध्ये खलबतं, रोहित शर्मानेही स्पष्ट काय ते सांगून टाकलं
| Updated on: Dec 06, 2023 | 5:08 PM
Share

मुंबई : वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील पराभव कायमचा जिव्हारी लागला आहे. अंतिम सामन्यातील भलभलती जखम भरून न निघणारी आहे. असं असलं तरी पुढे जाणंही तितकंच महत्त्वाचं आहे. टीम इंडिया आता टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे. गेल्या दहा वर्षातील आयसीसी चषकांचा दुष्काळ संपवण्यासाठी पुन्हा एक संधी आहे. या स्पर्धेसाठी अवघ्या सहा महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. असं असताना कोणाच्या नेतृत्वात टी20 वर्ल्डकपला सामोरं जायचं असा प्रश्न उपस्थित होत आहे. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव की हार्दिक पांड्या या तिघांची नावं चर्चेत आहेत. रोहित शर्मा दक्षिण अफ्रिका दौऱ्यात फक्त कसोटी संघात खेळणार आहे. त्यामुळे टी20 सामन्यात खेळणार की नाही याबाबत संभ्रम आहे. असं असताना बीसीसीआयच्या गोटातून एक माहिती समोर आली आहे. बीसीसीआयच्या बैठकीत रोहित शर्माने बीसीसीआय अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितलं आहे.

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील पराभवानंतर बीसीसीआयने एका बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीत कर्णधार रोहित शर्मा, प्रशिक्षक राहुल द्रविड, बीसीसीआय सचिव जय शाह, निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर आणि राजीव शुक्ला उपस्थित होते. रोहित शर्मा सध्या लंडनमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी गेला आहे. तेव्हा त्याने तेथूनच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. मीटिंगमध्ये सरतेशेवटी टी20 वर्ल्डकपमध्ये कर्णधार कोण असेल? यावर चर्चा झाली आहे. त्यावर रोहित शर्माने आपलं स्पष्ट मत मांडलं.

“मीटिंगमध्ये रोहित शर्माने बीसीसीआय अधिकाऱ्यांना थेट विचारलं की टी20 वर्ल्डकप 2024 मध्ये कर्णधारपद देणार आहेत का? जर तसं असेल तर मला आताच काय ते सांगा. म्हणजे मला व्यवस्थितरित्या प्लानिंग करता येईल.”, असं बीसीसीआयच्या सूत्रांनी रोहित शर्मा मीटिंगमध्ये काय बोलला ते सांगितलं.

टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेचं कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवण्याबाबत बैठकीत एकमत दिसून आलं. प्रशिक्षक रोहित शर्मा यानेही या निर्णयाला पाठिंबा दिला. दक्षिण अफ्रिका दौऱ्यातही रोहितने वनडे आणि टी20चं नेतृत्व करावं असं सांगण्यात आलं. पण रोहितने बीसीसीआयकडे ब्रेक मागितला आहे. त्यामुळे टी20 चं नेतृत्व सूर्यकुमार यादव, तर वनडेचं कर्णधारपद केएल राहुलकडे सोपवण्यात आलं आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.