AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, सामन्याच्या दोन दिवसाआधी घडलं असं काही..

चॅम्पियन्स ट्रॉफीच्य 12व्या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड हे संघ आमनेसामने येणार आहे. तसं पाहिलं तर हा औपचारिक सामना आहे आणि दोन्ही संघांनी उपांत्य फेरी गाठली आहे. पण प्रोत्साहन वाढवण्यासाठी हा सामना दोन्ही संघांना महत्त्वाचा ठरणार आहे. असं असताना भारताच्या गोटातून चिंतेची बातमी समोर आली आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, सामन्याच्या दोन दिवसाआधी घडलं असं काही..
भारतीय संघImage Credit source: Twitter
| Updated on: Feb 27, 2025 | 4:28 PM
Share

चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत आणि न्यूझीलंड हे दोन दिग्गज संघ आमनेसामने येणार आहे. न्यूझीलंडने मागच्या काही वर्षात भारताचा वारंवार रस्ता अडवला आहे. त्यामुळे आयसीसी स्पर्धेत न्यूझीलंड ही भारताची डोकेदुखी ठरते. पण यावेळेस भारत आणि चॅम्पियन्स ट्रॉफीचं टेन्शन तसं नसेल. कारण दोन्ही संघांनी उपांत्य फेरीचं गणित सोडवलं आहे. भारत न्यूझीलंड यांच्यातील सामना 2 मार्चला होणार आहे. पण या सामन्यापूर्वी भारतीय संघाला वेगळ्याच चिंतेने ग्रासलं आहे. कारण कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांच्याबाबत एक बातमी समोर आली आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींचं टेन्शन वाढलं आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणाऱ्या सराव सत्रात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा गैरहजर होता. रोहित शर्माला हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे त्रास होत असून टीम इंडियाच्या सराव दरम्यान दिसला नाही.

दुसरीकडे, टीम इंडियाचा युवा फलंदाज शुबमन गिल देखील सरावाला उपस्थित राहिला नाही. शुबमन गिल आजारी आहे. शुबमन गिलला बुधवारच्या सरावातून वगळण्यात आल्याचे कळले आहे. , टीम इंडियाच्या दोन सलामीवीरांच्या सरावात अनुपस्थितीमुळे आता नवीन चिंता निर्माण झाली आहे. कारण न्यूझीलंडविरुद्धचा सामना झाल्यानंतर 4 मार्चला उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. टीम इंडियासाठी हे दोन्ही खेळाडू पूर्णपणे बरे होणे अत्यंत आवश्यक आहे. रोहित शर्मा आणि शुबमन गिल हे 4 मार्च रोजी न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात दिसतील की नाही हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे.

शुबमन गिल सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. त्याचं संघात असणं खूप गरजेचं आहे. वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेवेळीही शुबमन गिल आजारी पडला होता. पण त्यातून सावरत त्याने मैदानात हजेरी लावली होती. त्यामुळे शुबमन गिल लवकर बरा व्हावा असे त्याचे चाहते प्रार्थना करत आहेत.

भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद. शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती.

शिंदे, दादांचा मालक एकच! उद्धव ठाकरेंची शिंदेसेनेवर खोचक टीका
शिंदे, दादांचा मालक एकच! उद्धव ठाकरेंची शिंदेसेनेवर खोचक टीका.
मुंबई महापौरपदावरून भाजप-शिंदे सेना आमने-सामने; लोढांच्या दाव्याने वाद
मुंबई महापौरपदावरून भाजप-शिंदे सेना आमने-सामने; लोढांच्या दाव्याने वाद.
फडणवीसांचा मी लाडका मंत्री, त्यामुळे... ; नितेश राणे यांचं मोठं विधान
फडणवीसांचा मी लाडका मंत्री, त्यामुळे... ; नितेश राणे यांचं मोठं विधान.
टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर
टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर.
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक.
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद.
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत.
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप.
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस.
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक.