AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोहित शर्मा या दोन स्पर्धानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकणार रामराम?

कर्णधार रोहित शर्माचं टी20 जेतेपदाचं स्वप्न अखेर पूर्ण झालं आहे. मागच्या पर्वात उपांत्य फेरीतच प्रवास थांबला होता. तर वनडे वर्ल्डकप स्पर्धेत अंतिम सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. पण सहा महिन्यातच रोहित शर्माने आपलं नेतृत्व सिद्ध करून दाखवलं. पण जेतेपद मिळवताच रोहित शर्माने टी20 फॉर्मेटला रामराम ठोकला आहे. आता शेवटच्या दोन स्पर्धा खेळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची शक्यता आहे.

रोहित शर्मा या दोन स्पर्धानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकणार रामराम?
Image Credit source: BCCI
| Updated on: Jul 01, 2024 | 3:07 PM
Share

टीम इंडिया गेल्या 11 वर्षांपासून आयसीसी चषक मिळवण्यासाठी कासावीस होती. अनेक संधी चालून आल्या मात्र त्याचं सोनं करण्यात अपयश आलं. अखेर रोहित शर्माने 17 वर्षानंतर टी20 वर्ल्डकप जेतेपद मिळवून दाखवलं. तसेच 11 वर्षांपासून असलेला आयसीसी चषकांचा दुष्काळ दूर केला आहे. पण रोहित शर्माने जेतेपद मिळवताच टी20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. असं असलं तरी रोहित शर्मा वनडे आणि कसोटी सामने खेळताना दिसणार आहे. म्हणजेच रोहित शर्मा आणखी एक वर्षे कर्णधार म्हणून दिसणार आहे. बीसीसीआयने त्या पद्धतीने रणनिती आखल्याचं दिसत आहे. रोहित शर्मा आगामी चॅम्पियन ट्रॉफित टीम इंडियाचं नेतृत्व करे. तसेच 2025 मध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्येही कर्णधार म्हणून दिसेल. या दोन स्पर्धांनंतर रोहित शर्मा निवृत्ती जाहीर करण्याची शक्यता आहे. चॅम्पियन ट्रॉफीची तारीख निश्चित करण्यात आली आहे. ही स्पर्धा 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान होणार आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीचं यजमानपद पाकिस्तानकडे असून स्पर्धेसाठी लाहोर, कराची आणि रावळपिंडी ही मैदानं निश्चितक करण्यात आली आहेत. पण भारतीय संघ 2006 पासून पाकिस्तानला गेलेला नाही. त्यामुळे भारतीय संघ वनडे स्पर्धेत सहभागी होणार की नाही हा प्रश्न आहे. दुसरीकडे, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 1 जूनपासून लॉर्ड्सवर होणार आहे. भारताची कसोटीतील विजयी टक्केवारी 68.51 इतकी असून अंतिम फेरी गाठणं जवळपास निश्चित आहे. या क्रमवारीती दुसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलिया, तिसऱ्या स्थानावर न्यूझीलंड आणि चौथ्या क्रमांकावर श्रीलंका आहे.

रोहित शर्माचं वय सध्या 37 वर्षे आहे. त्यामुळे चॅम्पियन ट्रॉफी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलनंतर रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे, टी20 संघांचं नेतृत्व हार्दिक पांड्याकडे येण्याची शक्यता आहे. या दोन स्पर्धांमध्ये जेतेपद मिळवलं की रोहितच्या क्रिकेट कारकिर्दिचा शेवट गोड होईल. असं असलं तरी रोहित शर्मा आयपीएल खेळताना दिसेल. आता रोहित शर्मा मुंबईकडून खेळणार की इतर संघाकडून हे मेगा लिलावात स्पष्ट होईल. दुसरीकडे, टी20 वर्ल्डकपमध्ये हार्दिक पांड्या उपकर्णधार होता. रोहित शर्माच्या गैरहजेरीत हार्दिक पांड्याने भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. त्यामुळे हार्दिक पांड्याची निवड होणं जवळपास निश्चित आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.