Rohit Sharma : तू प्लेइंग इलेवनबाहेर का नाही गेला, रोहितला विचारण्यात आलं, रोहित काय म्हणाला…

वर्कलोड मॅनेजमेंटबाबत सतत चर्चा होत असते. टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मलिकेत दोन खेळाडूंना विश्रांती मिळू शकते.

Rohit Sharma : तू प्लेइंग इलेवनबाहेर का नाही गेला, रोहितला विचारण्यात आलं, रोहित काय म्हणाला...
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माImage Credit source: aaj tak
Follow us
| Updated on: May 18, 2022 | 3:00 PM

मुंबई :  आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये मंगळवारी मुंबई इंडियन्स (MI) आणि सनरायजर्स हैदराबादमध्ये (SRH) सामना झाला. हैदराबादचा संघ पहिले फलंदाजी करत होता. या सामन्याचा प्रभाव प्लेऑफवर पडणार, हे सर्वाना माहित होतं. त्यावेळी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) एक मोठं विधान केलंय. यावेळी क्रिकेटचं समसालोचन करणाऱ्यानं त्याल विचारलं की, तू स्वत: प्लेइंग इलेवनमधून बाहेर का नाही गेला, त्यावर रोहित शर्माने एक मोठं विधान केलंय. नाणेफेकीच्या वेळी इयान बिशपने विचारलं की मुंबई इंडियन्स आता प्लेऑफमध्ये जाऊ शकत नाहीत. मग कामाचा ताण लक्षात घेऊन तुम्ही स्वत:आणि जसप्रीत बुमराह प्लेऑफच्या मधून बाहेर का जात नाहीत, असं समालोचकानं म्हटलं. यावर रोहित शर्मा म्हणाला की, ‘संघाची मुख्य फळी खेळत राहणं महत्वाचं आहे. एक संघ म्हणून आपल्याला कोही गोष्टींसह पुढे जायचं आहे. काही खेळाडूंना विश्रांती द्यावी असं आम्हाला निश्चितच वाटलं.’

रोहित नेमकं काय म्हणाला?

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, या सामन्यानंतर आणखी एक सामना आहे. त्यामुळे आम्ही तिंथे काही नवीन खेळाडूंना संधी देऊ शकतो. सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने दोन नवीन खेळाडूंना संधी दिली आहे. या सामन्यात मयंक मार्कंडेय आणि संजय यादव खेळत आहेत. रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराहबद्दल बोलायचं झालं तर दोघेही टीम इंडियाचे वरिष्ठ आणि मत्वाचे खेळाडू आहेत. रोहित शर्मा टीम इंडियाचा कर्णधार आहे. जसप्रीत बुमराह उपकर्णधारही आहे. दोन्ही खेळाडू सतत क्रिकेट खेळत आहेत. आयपीएल 2022नंतरही टीम इंडियाचे सामने आहेत.

हे सुद्धा वाचा

विराट कोहलीला विश्रांती मिळणार?

वर्कलोड मॅनेजमेंटबाबत सतत चर्चा होत असते. टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मलिकेत दोन खेळाडूंना विश्रांती मिळू शकते. असं मानलं जात आहे. रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह यांच्याशिवाय ऋषभ पंत, विराट कोहली या खेळाडूंनाही विश्रांती मिळण्याची शक्यता आहे.

जिंकूनही परिस्थिती बदलली नाही

तेरा सामन्यांत सहा विजय मिळवून हैदराबादचे आता बारा गुण झाले असून त्यांनी या बाबतीत पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्सची बरोबरी केली आहे. असं असूनही हा संघ निव्वळ धावगतीच्या दरात खूप मगा पडला आहे. मुंबईचा विचार केल्यास रोहित शर्माच्या संघाचा तेरा सामन्यांमधला हा दहावा पराभव आहे. जी आयपीएलच्या इतिहासातील मुंबईची सर्वात खराब कामगिरी आहे. या पराभवानंतर त्यांनी दहा स्थानावर जाण्याची शक्यता जवळपास संपुषटात आली आहे. हा संघ हंगामातील सर्वात खराब संघ असल्याचं दिसतं आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.