AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ruturaj Gaikwad CSK IPL 2022: चेन्नईच्या स्टारची अपयशाची हॅट्ट्रिक, मैदानावर 4 चेंडूंपेक्षा जास्त टिकणं झालं कठीण

चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आयपीएल 2022 (IPL 2022) च्या पहिल्या तीन सामन्यांमध्ये धावा करू शकलेला नाही.

Ruturaj Gaikwad CSK IPL 2022: चेन्नईच्या स्टारची अपयशाची हॅट्ट्रिक, मैदानावर 4 चेंडूंपेक्षा जास्त टिकणं झालं कठीण
Ruturaj Gaikwad Image Credit source: IPL
| Updated on: Apr 04, 2022 | 10:34 AM
Share

मुंबई : चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आयपीएल 2022 (IPL 2022) च्या पहिल्या तीन सामन्यांमध्ये धावा करू शकलेला नाही. आतापर्यंत चेन्नईच्या तिन्ही सामन्यांत त्याला एकदाही दुहेरी आकडा गाठता आलेला नाही. त्याच्या अपयशाचा परिणाम चेन्नई सुपर किंग्जच्या खेळावरही दिसून येत आहे. चार वेळा चॅम्पियन राहिलेल्या या संघाने पहिले तीन सामने गमावले आहेत आणि हा संघ आता गुणतालिकेत तळाशी आहे. विशेष म्हणजे ऋतुराज गायकवाड जेव्हाही आयपीएल खेळला आहे तेव्हा पहिल्या तीन सामन्यात त्याने धावा केल्या नाहीत. 2020 आयपीएलमधील पहिल्या तीन सामन्यात तो अपयशी ठरला होता, 2021 मध्येदेखील त्याची पुनरावृत्ती पाहायला मिळाली. त्यानंतर यंदादेखील तीच कथा पाहायला मिळाली आहे.

चेन्नई सुपर किंग्जच्या सलामीची जबाबदारी ऋतुराज गायकवाडकडे आहे. पण या मोसमात त्याची धावसंख्या 0, 1, 1 अशी आहे. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या मोसमातील पहिल्या सामन्यात तो चार चेंडू खेळून उमेश यादवचा बळी ठरला. त्यानंतर लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध चार चेंडू खेळून तो धावबाद झाला. त्याला एक धाव करता आली. पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यातही ऋतुराज गायकवाड केवळ चार चेंडू खेळू शकला आणि एक धाव काढून परतला. योगायोग म्हणजे गायकवाडने आतापर्यंतच्या तिन्ही सामन्यांत केवळ चार चेंडू खेळले आहेत. यामुळे सीएसकेला आतापर्यंत एकाही सामन्यात सलामीला मोठी सुरुवात करता आलेली नाही.

आयपीएल 2022 मध्येदेखील खराब सुरुवात

ऋतुराज गायकवाड हा गेल्या वर्षीचा ऑरेंज कॅप विजेता होता म्हणजेच IPL 2021 मध्ये तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. पहिल्या तीन सामन्यात अपयशी ठरुनही त्याने 16 सामन्यांत 635 धावा केल्या होत्या. गेल्या मोसमातील पहिल्या तीन सामन्यांमध्ये त्याला 5, 5, 10 धावा करता आल्या होत्या. मात्र, चौथ्या सामन्यात त्याने 64 धावांची अर्धशतकी खेळी खेळली. या सामन्यानंतर त्याने खूप धावा केल्या होत्या. हीच कथा यंदा पुन्हा पाहायला मिळतेय.

पहिल्या आयपीएलची कथाही सारखीच

आपल्या पहिल्या आयपीएल हंगामातील पहिल्या तीन सामन्यांमध्ये ऋतुराज गायकवाडला दुहेरी आकडा पार करता आला नव्हात. त्याचे दोनदा खातेही उघडले नव्हते. यादरम्यान त्याचा स्कोअर 0, 5, 0 धावा असा होता. मात्र या निराशेतून धडा घेत त्याने हंगामाचा शेवट तुफानी पद्धतीने केला. गायकवाडने सीएसकेच्या शेवटच्या तीन सामन्यांमध्ये सलग तीन अर्धशतके झळकावली होती. या सामन्यानंतर त्याचे सीएसकेमधील स्थान निश्चित झाले. त्याचा परिणाम असा झाला की त्याने आयपीएल 2021 मध्ये सर्वाधिक धावा फटकावल्या.

इतर बातम्या

IPL 2022 points table : चेन्नईची पराभवाची हॅट्रिक, पंजाबचा मोठा विजय, आयपीएलमध्ये कुठला संघ कुठल्या स्थानावर जाणून घ्या…

IPL 2022 SRH vs LSG Live Streaming: जाणून घ्या लखनौ विरुद्ध हैदराबाद सामना कधी आणि कुठे पाहता येईल?

IPL 2022, Orange Cap : ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आला लिविंगस्टोन आणि शिवम, परपल कॅपमध्येही बदल

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.