Matthew Breetzke : पदार्पणाच्या सामन्यातच मॅथ्यू ब्रित्झकेने पाकिस्तानात रचला इतिहास, 47 वर्ष जुना विक्रम मोडीत
New Zealand vs South Africa, 2nd ODI Match: पाकिस्तान, न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात ट्राय सिरीज सुरु आहे. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेच्या 26 वर्षीय मॅथ्यू ब्रित्झकेने एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. 47 वर्षे जुना विक्रम त्याने आपल्या नावावर केला आहे. ब्रित्झके पदार्पणाच्या सामन्यात सर्वात मोठी खेळी करणारा फलंदाज ठरला आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तान, न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात ट्राय सिरिज सुरु आहे. या स्पर्धेत न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिका आमनेसामने आले आहेत. न्यूझीलंडने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या दक्षिण अफ्रिकेच्या मॅथ्यू ब्रित्झकेने एक विक्रम आपल्या नावे केला आहे. पदार्पणाच्या सामन्यात आपली छाप पडली पाहीजे, असं स्वप्न प्रत्येक खेळाडूचं असतं. मॅथ्यू ब्रित्झकेचा आंतरराष्ट्रीय पातळीवर पदार्पणाचा सामना होता. या सामन्यात त्याने शतक ठोकत विक्रम रचला आहे. त्याने 148 चेंडूत 11 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 150 धावा केल्या. ब्रित्झकेने यापूर्वी दक्षिण अफ्रिकेसाठी टी20 आणि कसोटा सामना खेळला आहे. पण वनडे सामन्यात खेळण्याची त्याची पहिलीच वेळ आहे.
दक्षिण अफ्रिकेकडून पदार्पणाच्या सामन्यात शतक ठोकणारा मॅथ्यू हा चौथा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी कोलिन इनग्राम (124), टेम्बा बावुमा (113), रिझा हँड्रिक्स (102) यांनी शतकी खेळी केली आहे. पण मॅथ्यू या तिघांच्या पुढे निघून गेला आहे. त्याने 150 धावा केल्या आहेत. कॉलिनने 2010 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध 124 धावा केल्या होत्या. त्यानंतर 14 वर्षांनी पदार्पणाच्या सामन्यात सर्वाधिक धावा करणारा दक्षिण अफ्रिकन खेळाडू ठरला आहे.
South Africa debutant’s century broke a 47-year old record in men’s ODIs 👀
Details 👇https://t.co/mvZHOuVYmn
— ICC (@ICC) February 10, 2025
वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाज डेसमेंड हेंस याने 1978 मध्ये पदार्पणाच्या सामन्यात 148 धावा केल्या होत्या. तेव्हापासून वनडेतील हा विक्रम अबाधित होता. आता 47 वर्षांनी हा विक्रम मॅथ्यू ब्रित्झकेने आपल्या नावावर केला आहे. त्याने 150 धावांची खेळी केली आणि या यादीत अव्वल स्थान पटकावलं आहे.
मॅथ्यू ब्रित्झकेने मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात बांगलादेशविरुद्ध कसोटीत डेब्यू केलं होतं. तेव्हा त्याला एका डावात फलंदाजीची संधी मिळाली होती. पण खातं खोलता आलं नाही. टी20 क्रिकेटमध्य दक्षिण अफ्रिकेकडून 10 सामन्यात खेळला आणि 16.77 च्या सरासरीने 11 धावा केल्या.
