AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sara Tendulkar : अर्जूनच्या साखरपुड्यानंतर सारानेही मनातलं सांगितलं, म्हणाली…

Sara Tendulkar : सचिन तेंडुलकरचा मुलगा आणि क्रिकेटर अर्जून तेंडुलकर याचा काही दिवसांपूर्वी साखरपूडा झाला. त्यानंतर आता सचिनची लेक सारा तेंडुलकरने असं काही म्हटलंय ज्याची चर्चा रंगली आहे.

Sara Tendulkar : अर्जूनच्या साखरपुड्यानंतर सारानेही मनातलं सांगितलं, म्हणाली...
Saaniya Chandok and Sara TendulkarImage Credit source: Screenshot/Instagram
| Updated on: Aug 21, 2025 | 10:14 PM
Share

भारताचा अभिमान, स्टार आणि माजी खेळाडू, क्रिकेटचा देव, भारतरत्न अशी अनेक विशेषणं सचिन तेंडुलकर याची ओळख करुन देण्यास कमी पडतील. सचिनने क्रिकेट कारकीर्दीत असंख्य विक्रम केले जे त्याच्या निवृत्तीच्या दशकानंतरही कायम आहेत. सचिनने कसोटी, वनडे आणि टी 20i क्रिकेटमध्ये विक्रमी धावा केल्या. इतकंच काय तर सचिनने आयपीएलमध्येही आपली छाप सोडली. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अर्जून तेंडुलकर यानेही करियर म्हणून क्रिकेटलाच पसंती दिली. अर्जूनने गेल्या काही वर्षात क्रिकेटच्या जोरावर सचिनचा मुलगा या पलिकडे जाऊन आपल्या स्वत:ची अशी ओळख निर्माण केली. ऑलराउंडर असलेल्या अर्जुनने मुंबईकडून पदार्पण केलं. मात्र तो सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोव्याकडून खेळतोय. तसेच अर्जून आयपीएलमध्ये मुंबईचं प्रतिनिधित्व करतो.

अर्जून आणि उद्योगपती रवी घई यांची नात सानिया चंडोक यांचा अवघ्या काही दिवसांपूर्वी साखरपुडा झाला. यानंतर अर्जून आणि सानिया या दोघांची चांगलीच चर्चा पाहायला मिळाली. आता अर्जूनच्या साखरपुड्यानंतर मोठी बहिण आणि सचिनची लेक साराने एका मुलाखतीत केलेल्या भाष्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. साराने मनात असलेलं सर्व काही सांगून टाकलं. साराने नक्की काय म्हटलं आणि कशाबद्दल म्हटलं? हे जाणून घेऊयात.मी क्रिकेटकडे कधीच करियर म्हणून पाहिलं नाही, असं साराने म्हटलं.

साराने काय म्हटलं?

“मी गल्ली क्रिकेट खेळलेय. मात्र मी क्रिकेटमध्येच करियर करायचं, असा कधीच विचार केला नाही. माझा भाऊ क्रिकेटमध्ये फार चांगला आहे”, असं म्हणत साराने क्रिकेटबद्दल जे मनात होतं ते सांगितलं. साराने इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत क्रिकेटबाबत ही प्रतिक्रिया दिली.

साराने या मुलाखतीत ऑस्ट्रेलियातील लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला. “मला चांगलं आठवतंय की आम्ही सिडनीत नववर्षातील पहिल्या दिवशी संध्याकाळ साजरी करत होतो. आम्ही दर 4 वर्षांनी तिथे जायचो. संपूर्ण टीमसह आम्ही नववर्षातील पहिल्या संध्याकाळी एका बोटीवर होतो. मी हे कधीच विसरू शकत नाही”, असं म्हणत साराने ऑस्ट्रेलियातील आठवण सांगितली.

साराची वडिलांच्या कारकीर्दीतील आठवण

साराने तिला तिच्या वडिलांची कोणती मॅच सर्वात जास्त आठवते याबाबतही सांगितलं. ” मला कोणता एक सामना निवडायचा असेल तर मी वडिलांचा वानखेडेत वेस्ट इंडिज विरुद्ध झालेला निरोप सामना निवडेन. तेव्हा हे इतकं महत्त्वाचे का आहे हे समजून घेण्याइतपत मी मोठी होते. तो दिवसही मी कधीच विसरु शकणार नाही”, अशी आठवणही साराने सांगितली.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.