AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सचिन तेंडुलकरांच्या साखरपुड्याची ती गोष्ट, काय होती ती 40 लाखांची ऑफर, त्यावेळी दोघांचे वय होते काय?

Arjun Tendulkar engaged Saaniya : अर्जुन तेंडुलकर याने सानिया चंडोक हिच्याशी साखरपुडा केला. त्याची चर्चा होत आहे. 25 व्या वर्षी अर्जुनने त्याचा जीवनसाथी निवडला. त्याचवेळी सचिन तेंडुलकराच्या साखरपुड्याची चर्चा होत आहे.

सचिन तेंडुलकरांच्या साखरपुड्याची ती गोष्ट, काय होती ती 40 लाखांची ऑफर, त्यावेळी दोघांचे वय होते काय?
सचिन तेंडुलकर
| Updated on: Aug 14, 2025 | 3:51 PM
Share

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर यांने साखरपुडा केला आहे. 25 व्या वर्षी या ऑलराऊंडरने सानिया चंडोक हिला जीवनसाथी निवडले आहेत. चंडोक ही प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात आहे. सानिया ही साराची मैत्रिण आहे. दोघांची छायाचित्र समाज माध्यमांवर खूप व्हायरल होत आहे. अर्जुन आणि सानिया हे दोघेही एकमेकांचे परिचित आहे. हा दोघांचा प्रेमविवाह आहे. पण त्याचे वडील मास्टर ब्लास्टर सचिन हा तर प्रेमाच्या पिचवर त्याच्यापेक्षा पण अनेक पावलं पुढं होता. तेव्हा सचिन तेंडुलकर अवघा 22 वर्षांचा होता. त्यावेळी त्याने डॉ. अंजलीसोबत साखरपुडा केला आणि लागलीच त्याने लग्न पण केले.

सचिन तेंडुलकर प्रेमाच्या पिचवर बोल्ड

भारताचा दमदार क्रिकेटर सचिन तेंडुलकरचे (Sachin Tendulkar) लग्न 25 मे 1995 रोजी झाले होते. सचिन आणि अंजलीचे लग्न एखाद्या चित्रपटाच्या पटकथापेक्षा कमी नाही. 90 च्या दशकात सचिनने दमदार कामगिरी बजावली होती. हळूहळू सचिन भारतीय क्रिकेटचा सुपरस्टार झाला. त्याच दरम्यान सचिनची भेट अंजलीसोबत झाली. अंजलीने पहिल्यांदा 1990 मध्ये मुंबई विमानतळावर सचिनला पाहिले होते. त्याचवेळी तिला सचिन आवडला होता. त्यावेळी सचिन हा इंग्लंडच्या दौऱ्यावरून परतला होता. अंजलीने सचिनकडे ऑटोग्राफ करण्यासाठी त्याच्या मागे गेला. पुढे अंजलीने सचिनचा नंबर मिळवला. त्यानंतर दोघांमध्ये बातचीत सुरू झाली.

5 वर्षांची प्रेमकथा, मग लग्न

5 वर्षांपर्यंत दोघांचे हे अफेअर सुरु होते. अंजली ही सचिनपेक्षा वयाने मोठी आहे. 22 व्या वर्षी सचिनने साखरपुडा पण केला आणि लग्नही केले. सचिन अत्यंत लाजाळू होता. त्याला लग्नाबाबत घरी सांगता येत नव्हतं. तेव्हा त्याने अंजलीला याविषयी पुढाकार घ्यायला सांगितलं. मग अंजलीने तिच्या घरी हा विषय काढला. 1994 मध्ये सचिन आणि अंजली या दोघांचा न्युझीलंडमध्ये साखरपुडा झाला. 25 मे 1995 रोजी दोघांनी मुंबईत लग्न केले. एका लोकल टीव्ही ऑपरेटरने तेंडुलकर कुटुंबाला लाईव्ह लग्न टेलिकास्ट करण्यासाठी 40 लाखांचा ऑफर दिली होती. पण हा लग्न सोहळा साध्या पद्धतीने करण्याचे दोन्ही कुटुंबाने सांगितले आणि ही ऑफर फेटाळली.

दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग...
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग....
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं...
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं....
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश.
Sunetra Pawar : शरद पवार यांना न सांगताच सुनेत्रा पवार मुंबईत
Sunetra Pawar : शरद पवार यांना न सांगताच सुनेत्रा पवार मुंबईत.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत काय म्हणाले शरद पवार ?
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत काय म्हणाले शरद पवार ?.
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही - शरद पवार
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही - शरद पवार.
Sharad Pawar : सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल शरद पवारांची पहिली
Sharad Pawar : सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल शरद पवारांची पहिली.
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय.
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?.
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन.