Arjun Tendulkar : टीम अडचणीत, सचिनचा मुलगा अर्जुन बॅटिंगला आला आणि त्याने…VIDEO
Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकर ऑलराऊंडर आहे. गोलंदाजीत त्याने आपल कौशल्य दाखवून दिलच आहे. पण आता फलंदाजीतही तो तितकीच स्फोटक फलंदाजी करु शकतो. टीमचे 87 रन्सवर 5 विकेट गेले होते. त्यावेळी अर्जुन 5 रन्सवर खेळत होता. अर्जुनने त्यानंतर समोरच्या गोलंदाजांना चांगलच चोपलं.

क्रिकेटच्या मैदानावर सचिन तेंडुलकरने राज्य केलं. म्हणूनच त्याला क्रिकेटचा देव म्हणतात. अनेकदा त्याने शानदार बँटिंग करुन टीमला संकटातून बाहेर काढलं. आता त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर सुद्धा स्वत:मध्ये असलेलं टॅलेंट दाखवून देतोय. अर्जुनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केलाय. यात तो फोर, सिक्सचा पाऊस पाडताना दिसतोय. त्याने फक्त चेंडू सीमारेषेपारच पाठवला नाही, त्याने अडखळणारा आपल्या टीमचा डाव सावरला. स्कोरकार्डवर दिसतय निम्मी टीम पॅवेलियनमध्ये परतल्यानंतर अर्जुनने टीमची बुडणारी नौका किनाऱ्याला लावली.
अर्जुन तेंडुलकरने इन्स्टाग्राम अकाऊंटवर जो व्हिडिओ शेअर केलाय त्यात टीमच स्कोरकार्ड सुद्धा दिसतय. टीमचे 87 रन्सवर 5 विकेट गेले होते. त्यावेळी अर्जुन 5 रन्सवर खेळत होता. पुढच्या व्हिडिओमध्ये टीमचा स्कोर 9 विकेटवर 219 झाला होता. त्यावेळी तो 47 धावांवर खेळत होता. म्हणजे त्याने शानदार फलंदाजी करुन टीमला सन्मानजनक स्थितीत पोहोचवलं. पुढच्या डावात तेंडुलकर 61 धावांवर खेळताना दिसतोय. ज्यात 7 विकेटवर 188 धावा झाल्या होत्या. हा स्कोर आणि व्हिडिओ पाहून अर्जुनने टीमची नौका किनाऱ्याला लावली हेच दिसतय. आता अर्जुनचा हाच फॉर्म कायम रहावा अशी चाहत्यांची अपेक्षा आहे.
View this post on Instagram
झहीरची आठवण झाली
अर्जुन तेंडुलकर स्थानिक क्रिकेट खेळून देशांतर्गत सीजनसाठी स्वत:ला तयार करतोय. काही दिवसांपूर्वी याच सामन्यांमधील गोलंदाजीचे व्हिडिओ त्याने शेअर केले होते. अर्जुन या व्हिडिओत घातक गोलंदाजी करताना दिसतोय. त्याने वेग, बाऊन्स आणि स्विंगने झहीरची आठवण करुन दिली. युवराज सिंगने सुद्धा अर्जुनच्या गोलंदाजीवर कमेंट केली.
