AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्रीलंकेत रवींद्र जडेजा आणि संजय मांजरेकर पुन्हा आले आमनेसामने, थेट मनाला भिडणाऱ्या प्रश्नांचा केला मारा

भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला कसोटी सामना सुरू आहे. या कसोटी सामन्यादरम्यात समालोचक संजय मांजरेकर यांनी अष्टपैलू रवींद्र जडेजाला गाठलं आणि संवाद साधला. या दोघांमध्ये एक काळ वादाचा ठरला होता. पण या दोघांना एकत्र बोलताना पाहून क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

श्रीलंकेत रवींद्र जडेजा आणि संजय मांजरेकर पुन्हा आले आमनेसामने, थेट मनाला भिडणाऱ्या प्रश्नांचा केला मारा
श्रीलंकेत रवींद्र जडेजा आणि संजय मांजरेकर पुन्हा आले आमनेसामने, थेट मनाला भिडणाऱ्या प्रश्नांचा केला माराImage Credit source: PTI
| Updated on: Aug 16, 2026 | 3:18 PM
Share

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आणि माजी क्रिकेटपटू समालोचक असलेल्या संजय मांजरेकर यांचा पुन्हा आमनासामना झाला. खरं तर या दोघांमध्ये 2019 मध्ये पहिल्यांदा वादाची ठिणगी पडली होती. तुकड्या तुकड्यांमध्ये कामगिरी करणारा खेळाडू म्हणून मांजरेकर यांनी बोचरी टीका केली होती. त्यानंतर बरंच काही घडलं होतं. ट्वीटरवर पोस्ट वॉर रंगलं होतं. पण वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान या वादावर पडदा पडला होता. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्धच्या रवींद्र जडेजाने 77 धावांची खेळी केली होती. तसेच अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं होतं. जडेजाने समालोचन करणाऱ्या बॉक्सकडे बॅट दाखवून मैदानातूनच उत्तर दिलं होतं. या कामगिरीनंतर संजय मांजरेकर यांनी आपली चूक मान्य केली होती आणि जडेजाचा उल्लेख कणखर खेळाडू म्हणून केला होता. त्यानंतर 2022 मध्ये आशिया कप दरम्यान मांजरेकर यांनी जडेजाची मुलाखत घेतली होती. माझ्याशी बोलायला तू तयार आहेस ना जड्डू?, असं मांजरेकर यांनी विचारलं होतं. त्यावर जडेजाने हसून “हो नक्कीच” असे म्हटले होते.

आता पुन्हा एकदा संजय मांजरेकर यांनी श्रीलंका कसोटी दरम्यान रवींद्र जडेजाची मुलाखत घेतली. हा व्हिडीओची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यात मांजरेकर यांनी पहिलाच प्रश्न विचारलं की, प्रामाणिकपणे सांग तुझं पहिलं प्रेम गोलंदाजी होतं की फलंदाजी? त्यावर रविंद्र जडेजाने उत्तर दिलं की, ‘रणजी ट्रॉफीत तुम्ही माझा डेटा काढाल तर माझी सरासरी 60च्या वर आहे. तीन 300 आणि दोन 250 धावा माझ्या नावावर आहेत. माझ्यात कुठे ना कुठे असं होतं की मी वर फलंदाजी करत असेल तर फलंदाजी करू शकतो. पण मी जसं सांगितलं की, मी खाली फलंदाजी करायचो तेव्हा तुमच्याकडे काहीच शिल्लक नसतं. कधी कधी असं होतं की सामना डिक्लेयर केला जातो. टेस्टमध्ये वनडे आणि टी20 सारखी स्थिती येते.’

संजय मांजरेकर यांनी पुढे विचारलं की, आता कुठे ती वेळ आली की आता नंबर 1 कसोटी फॉर्मेट खेळत आहेस. बॅटिंग तुझं पहिलं प्रेम आहे. तर अशा स्थितीत तू तुला कोणच्या कॅटेगरीत टाकशील? आता बॅटिंग अष्टपैलू आहेस की बॉलिंग अष्टपैलू? यावर रवींद्र जडेजा म्हणाला की, ‘आता तर मी अशा स्थितीत आहे की संघाला काय गरज आहे. जर चेंडू वळत असेल तर मी फ्रंट लाईन बॉलर असेन. जर फ्लॅट विकेट असेल तर बॅटरची भूमिका बजावतो.’ त्यानंतर संजय मांजरेकर यांनी विचारलं की ड्राय विकेट आहे तर किती विकेट घेशील? त्यावर रवींद्र जडेजा म्हणाला की, जे काही मिळतील, पाच सहा विकेटच्या वर मिळतील. त्यावर मी आनंदी असेल.

Follow Us
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर
नायरा एनर्जीचा ग्राहकांना झटका; पेट्रोल, डिझेल एवढ्या रुपयांनी महागलं
Nayara Energy : नायरा एनर्जीचा ग्राहकांना मोठा झटका; पेट्रोल, डिझेल तब्बल एवढ्या रुपयांनी महागलं
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा
दिशा सालियान प्रकरणी सुषमा अंधारेंचं अखेर मोठं विधान; थेट म्हणाल्या...
दिशा सालियान प्रकरणी सुषमा अंधारेंचं अखेर मोठं विधान; थेट म्हणाल्या...