AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ranji Trophy: सहा सामन्यात 928 धावा करणाऱ्या मुंबईच्या युवा सर्फराजची सौराष्ट्राविरुद्ध शानदार डब्ल सेंच्युरी

रणजी करंडक स्पर्धेत सर्फाराज खानची (Sarfaraz Khan Double-century) दमदार फलंदाजी सुरु आहे. मुंबईच्या या युवा प्रतिभावान फलंदाजाने सौराष्ट्राविरुद्ध शानदार द्विशतक झळकावलं आहे.

Ranji Trophy: सहा सामन्यात 928 धावा करणाऱ्या मुंबईच्या युवा सर्फराजची सौराष्ट्राविरुद्ध शानदार डब्ल सेंच्युरी
| Updated on: Feb 18, 2022 | 2:30 PM
Share

अहमदाबाद: रणजी करंडक स्पर्धेत सर्फाराज खानची (Sarfaraz Khan Double-century) दमदार फलंदाजी सुरु आहे. मुंबईच्या या युवा प्रतिभावान फलंदाजाने सौराष्ट्राविरुद्ध शानदार द्विशतक झळकावलं आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर मुंबई विरुद्ध सौराष्ट्र सामना सुरु आहे. सर्फराजने सौराष्ट्राच्या गोलंदाजांचा समाचार घेत चौफेर फटकेबाजी केली. त्याने खोऱ्याने धावा केल्या. सर्फराजचं (Sarfaraz Khan) मागच्या नऊ डावातील हे दुसर द्विशतक आहे. त्याने एक त्रिशतक सुद्धा झळकावलं आहे. महत्त्वाचं म्हणजे संघ अडचणीत सापडलेला असताना सर्फराज खानने फलंदाजीत चमक दाखवली. मुंबईच्या अवघ्या 44 धावांवर तीन विकेट गेल्या होत्या. कॅप्टन पृथ्वी शॉ एक रन्सवर आऊट झाला होता. त्यानंतर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि सर्फराज खानने मुंबईच्या डावाला आकार दिला. रहाणे आणि सर्फराजमध्ये 252 धावांची मोठी भागीदारी झाली.

अजिंक्य रहाणेने 290 चेंडूत 129 धावा केल्या. रहाणेने त्याच्या शतकी खेळीत 17 चौकार आणि दोन षटकार लगावले. अनुभवी रहाणेसोबत सर्फराजने सुद्धा प्रतिस्पर्ध्यांना आपल्या बॅटचा तडाखा दाखवला. सर्फराजने सुरुवात मंदगतीने केली होती. पण त्यानंतर त्याने सौराष्ट्राच्या गोलंदाजांवर जोरदार आक्रमण केलं. गुरुवारी त्याने शतक झळकावलं होतं. आज द्विशतक झळकावलं. मागच्या सीजनमध्ये सर्फराजने सहा सामन्यात 928 धावा केल्या होत्या. त्याची सरासरी 154 पेक्षा पण जास्त आहे. सर्फराजने 112 चौकार आणि 22 षटकार लगावले.

सर्फराजला मोठी खेळी खेळण्याची सवय

सर्फराज खानला मोठी खेळी करण्याची सवय लागली आहे. मागच्या रणजी सीजनमध्ये त्याने 391 चेंडूत 301 धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याने 213 चेंडूंचा सामना करताना नाबाद 226 धावा केल्या. सर्फराजने 177 धावांची खेळी सुद्धा केली आहे. इतकी दमदार फलंदाजी करुनही आयपीएल ऑक्शन 2022 मध्ये त्याच्यावर मोठी बोली लागली नाही. त्याला अवघ्या 20 लाख रुपयाच्या बेस प्राइसवर दिल्ली कॅपिटल्सने विकत घेतलं आहे. असंच प्रदर्शन कायम राहिल्यास सर्फराज खान आपल्याला लवकरच भारतीय संघात दिसू शकतो.

sarfaraz khan from mumbai smashed double century vs saurashtra in ranji trophy

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.